AAI Recruitment 2023: तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airport Authority of India) ने अलीकडे AAI भरती २०२३ साठी अधिसूचना जाहीर केली आहे. या भरती मोहिमेचा उद्देश १४ सल्लागार पदे भरणे आहे, जी सध्या रिक्त आहेत. तुम्हाला इच्छा असल्यास, AAI साठी अर्ज भरा आणि १६ एप्रिल २०२३ पर्यंत दिलेल्या ईमेल आणि पत्त्यावर पाठवा. येथे आम्ही तुम्हाला पात्रता निकष, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि पगार यासारखी सर्व आवश्यक माहिती दिली आहे.. याशिवाय, उमेदवार aai.aero च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज तपासू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकूण पद संख्या

कंसल्टेंट- १४ पद

शैक्षणिक पात्रता

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे.

वेतन

या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार म्हणून ७५००० रुपये दिले जातील.

वयोमर्यादा

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांची वयोमर्यादा ७० वर्षांपेक्षा जास्त नसावी.

कसे होईल सिलेक्शन

AAI Bharti साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड केवळ मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

येथे सूचना आणि अर्ज लिंक पहा

अधिसूचना – https://images.news18.com/ibnkhabar/uploads/2023/03/AAI-Recruitment-2023-Notification-2.pdf
अर्ज पाठविण्यासाठी लिंक – https://www.aai.aero/

AAI Bharti साठी इतर माहिती

उमेदवार संबंधित कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रतींसह भरलेला अर्ज gmhrwr@aai.aero वर ईमेल करू शकतात. तसेच, हार्ड कॉपी जनरल मॅनेजर (एचआर), भारतीय विमानतळ प्राधिकरण, प्रादेशिक मुख्यालय, पश्चिम क्षेत्र, एकात्मिक ऑपरेशन कार्यालय, न्यू एअरपोर्ट कॉलनी, विले-पार्ले (पूर्व) मुंबई- ४०००९९ येथे पाठवावी लागेल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai recruitment 2023 airport authority of india announced consultant job 70000 salary apply at aai aero selection without exam snk
First published on: 31-03-2023 at 10:05 IST