ॲड प्रवीण निकम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आपले माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी आपल्या एका भाषणात असे म्हटले होते की २०२० हे शतक भारताचे शतक आहे कारण या शतकात भारतात सर्वाधिक तरुण पिढी असणार आहे जी प्रगतशील भारताचे नेतृत्व करेल. परंतु हे नेतृत्व करण्यासाठी या तरुण पिढीला शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजना ध्येय, धोरणे याबाबत पुरेशी कल्पना असणे देखील आवश्यक आहे. जे मी तुम्हाला असं म्हटलं की हे सर्व तर तुम्ही शिकाच आणि हे शिकण्यासाठी तुम्हाला मानधन सुद्धा मिळेल तर!
हो हे शक्य आहे एका फेलोशिपच्या माध्यमातून. देशाच्या महत्त्वपूर्ण धोरण आणि विकास समस्या समजून घेण्याची फेलोशिप म्हणजेच ‘LAMP Fellow’. अशी फेलोशिप ज्यामध्ये संसद सदस्य (MP) संसदीय कामकाजाबद्दल मार्गदर्शन करतात. ज्यात ठराविक वर्षात नियुक्त केलेल्या खासदारासोबत पूर्णवेळ काम करतात, संसदेच्या पावसाळी अधिवेशनापासून ते अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत फेलो काम करतात. लॅम्प फेलोशिप (LAMP) ही तरुण भारतीयांसाठी कायदा बनवणे आणि सार्वजनिक धोरण शिकण्याची एक अनोखी संधी देते.
एलएएमपी फेलोशिप (LAMP) १०-११ महिन्यांच्या कालावधीसाठी संसद सदस्याद्वारे मार्गदर्शन करण्याची संधी प्रदान करते. फेलोशिप दरम्यान, फेलोना विविध क्षेत्रातील तज्ञांशी संपर्क साधण्याची आणि देशाच्या महत्त्वपूर्ण धोरण आणि विकासांतील समस्या समजून घेण्याची संधी मिळेल. एलएएमपी फेलो संरक्षण, अन्न सुरक्षा, पर्यावरण, अर्थशास्त्र आणि परराष्ट्र व्यवहार यासारख्या विविध विषयांवर संशोधन करतात. संशोधन कार्यांचा समावेश असू शकतो. लॅम्प फेलोची ( LAMP) प्राथमिक भूमिका खालील मुद्द्यांवर काम करण्याची असते.
हेही वाचा >>> UPSC ची तयारी : सद्गुणांवर आधारित नैतिक मांडणी
संसदेतील डेटा विश्लेषण म्हणून काम करणे.
संसदीय प्रश्नांची मांडणी करणे.
संसदीय वादविवाद याविषयी पार्श्वभूमी संशोधन करणे.
स्थायी समितीच्या बैठकांसाठी संशोधन करणे.
खासगी सदस्य विधेयकांचा मसुदा तयार करणे
मीडिया-संबंधित काम ज्यात प्रेस रिलीजचा मसुदा तयार करणे.
वरील माहिती वाचल्यावर तुमच्या हे सहज लक्षात येईल की, संसदेतील कामकाजामध्ये या निमित्ताने नवी पिढी प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेऊ शकणार आहे. यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतात.
१) शैक्षणिक गुणपत्र/ग्रेड (अंडरग्रॅज्युएट आणि वरच्या)
२) कामाचा अनुभव/ इंटर्नशिप/ स्वयंसेवक कामाचा तपशील
३) ( LAMP Fellowship ) एलएएमपी फेलोशिपसाठी तुमच्या उमेदवारीचे समर्थन करणारा ५०० शब्दांचा निबंध
४) धोरण किंवा कायद्यावर ५०० शब्दांचा निबंध
या फेलोशिपसाठी पात्रतेचे निकष झाल्यास
भारतीय नागरिक ज्यांच्याकडे कोणत्याही शैक्षणिक विषयात किमान पदवी आहे ते एलएएमपी फेलोशिपसाठी पात्र आहेत
केवळ २५ वर्षांपेक्षा कमी वय असलेले उमेदवार एलएएमपी फेलोशिपसाठी पात्र आहेत.
या फेलोशिपसाठी रु. २३,००० प्रति महिना इतके मानधन दिले. या फेलोशिप साठी तुम्ही lampfellowship@prsindia.org या मेल आयडी वर अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ डिसेंबर २०२४ आहे. अधिक माहिती साठी तुम्ही https://prsindia.org/lamp या संकेतस्थळाचा वापर करू शकता. तेव्हा आपल्या पॉलिसी कशा बनतात?, संसदेतील मुद्दे प्रश्न कसे मांडले जातात?, तेथील कामकाज नक्की कशा प्रकारे चालते याविषयी उत्सुकता असणाऱ्या प्रत्येकाने व भविष्यात खरोखरीच Policy वर काम करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या प्रत्येकाने नक्कीच या फेलोशिपचा अनुभव घ्या असे मी नक्की सांगेन.