डॉ. श्रीराम गीत

मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं तर या चारीचे कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. दर महिन्याला एक आगळीवेगळी करिअर घेऊन त्यातील हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. या लेखात गेमिंगमधील करिअरबद्दल समाज काय म्हणतो त्याबद्दल..

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Carrer Modeling area Brand building Digital Marketing
चौकट मोडताना: दुरावलेली नाती
Occultists who do modeling work career
चौकट मोडताना: मितूचं मॉडेलिंग
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

एखादा मुलगा ज्या वेळेला मोबाइल हातात घेतो तेव्हा पहिल्यांदा त्यामध्ये कोणकोणते गेम भरलेले आहेत यावर त्याची नजर असते. एखाद्या कट्टय़ावर बसलेली एकएकटी मुलंमुली अलीकडे रील्स बघण्यात मग्न असतात. पण या आधी मात्र गेम खेळत गुंग होणे हे सार्वत्रिक दृश्य असे. याची एकदा चटक लागली की ती जाणे कठीणच. त्याचे व्यसनात रूपांतर कधी होतं याचा पत्ताही लागत नाही. एक प्रत्यक्ष अनुभवलेलं उदाहरण येथे मुद्दाम देत आहे. लांबच्या प्रवासात मी रेल्वेने येत होतो. रात्रीच्या वेळी अकरा वाजता सारा डबा शांतपणे झोपलेला असताना एक पस्तीशीतला तरुण घाईघाईने एका स्टेशनवर गाडीत चढला आणि माझ्या समोरच्या बर्थवर त्याने हातातील सामानाची बॅग टाकली. पाठीवरच्या सॅकमधून मोबाइल काढला आणि कानामध्ये ‘बुच्चे’ घालून तो काहीतरी करण्यात गर्क झाला. पाचच मिनिटांनी आलेल्या टीसीने हाक मारली तरी त्याचे लक्ष नव्हते. खांद्यावर थापटूनही काहीच फरक पडला नाही. नाईलाजाने टीसीने हातातल्या मोबाइल वर हात ठेवला, तर माझ्या गेममध्ये व्यत्यय आणला म्हणून त्याने नकळत टीसी वर हात उगारला. पुढे काय काय झाले असते किंवा होऊ शकले असते याची सुजाण वाचक कल्पना करू शकतात.

आपण काय करत आहोत? वेळ कोणती आहे? जागा कोणती आहे? समोर कोण व्यक्ती आहे? या साऱ्याचे भान वयाच्या ३५ मध्ये सुद्धा सुटू शकते तर विशीच्या आतल्या मुलांना याचा विळखा कसा आणि किती पडला असेल? असेच प्रश्न घरोघरच्या पालकांना पडत असल्यामुळे एकंदरीत गेिमग या विषयाकडे पाहण्याचा मनोरंजनाऐवजी ‘मनस्तापाचा’ विषय म्हणून समाजाचा दृष्टिकोन बनला आहे. त्यातच रमी सर्कल नावाच्या खेळाने अलीकडे घातलेला धुडगूस व त्यातून अनेकांचे निघालेले दिवाळे याच्या चित्तर कथा पेपरमध्येही छापून येताना दिसतात.

मोठा बदल ऑनलाइनमुळे

जेव्हा स्मार्टफोन नव्हते त्या वेळेला ऑनलाइन नावाचा प्रश्नच नव्हता. मोबाइलमध्ये डाउनलोड केलेले वा करून दिलेल्या खेळांवर समाधान मानणे भाग होते. तेच तेच गेम खेळण्याचा काहीसा कंटाळा येत असे तर काहींना त्यातील वेग वाढवून खेळण्याची झिंग चढत असे. काही श्रीमंत घरात घेतलेल्या स्मार्ट टीव्हीवर व्हिडिओ गेम प्लेयर बसवून ‘बाप भी खेलेगा बच्चा भी खेलेगा’, अशा पद्धतीत आरडाओरडा करत काही ‘गेम एन्जॉय’ केले जात. यासाठीचा वेळ स्वाभाविकपणे नेमून दिलेला ठरावीक असे. मात्र मुले मोठी होत तसतसे यावरचे नियंत्रण सुटत जाई. आई बाबा कामावर असताना, घरात कोणी नसताना, या साऱ्याचे नियंत्रण सुटत जाणे याची सुरुवात दशकापूर्वीच झाली होती. दरमहा नवीन गेम विकत घेणे हा प्रकार अगदी मोजक्या घरांना परवडत होता. या साऱ्याला छेद बसला तो ऑनलाइन स्मार्टफोन आणि वाय-फाय मुळे. महा साथीच्या दोन अडीच वर्षांत या साऱ्यांनी ताळतंत्र सोडला होता. कोंडलेल्या घरात संवाद तरी काय करणार? किंवा एकटय़ाच असलेल्या घरात दुसरे तरी काय करणार? अशा प्रश्नाने साऱ्यांनाच सतावून सोडले.

वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून बटणे दाबून समोर काहीतरी हालते त्याचा आनंद घेणे याची सुरुवात होते. तो आनंद सहजपणे कोणालाही कसाही घेता येईल अशा पद्धतीचे साधे सुटसुटीत गेम बनवणे हे आव्हान जगभरातील नामवंत गेम कंपन्या स्वीकारतातच. गेिमग या साऱ्या प्रकाराबद्दल उत्सुकता प्रचंड असली तरी या क्षेत्रात प्रवेश कसा करायचा, याबद्दल खूप मोठे अज्ञान अगदी जाणकार किंवा माहीतगार व्यक्तींमध्ये सुद्धा सापडते. ऐकीव माहिती वर चर्चा करणे किंवा गॉसिप करणे आणि हे सारे वाईटच आहे असे समजणे यातून निर्माण होत जाते. अनेक देशात शैक्षणिक खेळ या पद्धतीमध्ये मुलांचे प्रबोधन करणारे सुंदर सुंदर गेम्स तयार केले जातात. मात्र सरसकट ९० टक्के गेम्स हे माणसातील आदिम प्रवृत्तींना खतपाणी घालणारे असतात यात शंका नाही. आदिम प्रवृत्ती मध्ये हिंसा हा प्रमुख घटक असल्यामुळे अशा गेम्स ना फार मोठय़ा प्रमाणावर मागणी असते.

अगदी साध्या सुध्या सात्विक, सुसंस्काराच्या घरातील मुलगा सुद्धा रायफल हातात घेऊन ठोठो करत गोळय़ा मारत खेळताना जेमतेम वयाच्या चार ते सहा दरम्यान सहज सापडतो. तसेच हे गेम्सचे मार्केट साऱ्या बालचमूच्या मनावर गारुड करते. याचाच एक अगदी टोकाला गेलेला धोकादायक भाग म्हणजे पब्जी हा खेळ. अखेर अनेक देशांना बंदी घालून तो थांबवण्याची वेळ आली. एकदा का हिंसेला खेळातून सुरुवात झाली की त्यातील क्रूरता वाढवत नेणे हे गेम कंपनीवरील मानसिक दडपणाचे एक उद्दिष्ट बनून राहते. त्याशिवाय पुढचे गेम विकले जाणार नाहीत याची त्यांना खात्री पटलेली असते. एका अंदाजा नुसार गेम्स तयार करणारी कंपनी चालवणे हे खूप कठीण बनत चालले आहे कारण त्यासाठी लागणारे विविध पद्धतीचे सर्वोच्च दर्जाचे ‘क्रिएटिव्ह प्रोडय़ुसर’, मिळत नाहीत. गेम कंपनी तज्ज्ञ मानसशास्त्रज्ञांना सुद्धा भलामोठा पगार देऊन नोकरीत ठेवते, हे पण अनेकांना नवीन असते.

आज तरी अजून भारतात फारसे घडत नाही. मात्र पुण्यातीलच एक गेमिंग कंपनी जागतिक दर्जाचा एक गेम जगभर विकत आहे हे पण फारसे कोणाला माहीत नसते. त्याबद्दल सविस्तर पुढच्या लेखात आपण वाचणार आहोत..   

क्रमश: