बारावीनंतर ‘नीट’ परीक्षा देऊन मेडिकल शाखेत करिअर करण्याची लाखो विद्यार्थ्यांची मनीषा असते. मात्र यामध्ये त्यांचा कल मुख्यत्वे ?लोपॅथी / दंतवैद्याक / आयुर्वेदिक/ होमिओपॅथिक/ पशुवैद्याकीय डॉक्टर किंवा फार तर फिजिओथेरपी / स्पीच थेरपी या कडे असतो. आज संपूर्ण जगात अनुभवी, प्रशिक्षित नर्सेसचा तुटवडा आहे आणि त्यांना प्रचंड मागणी आहे मात्र तरीही आपल्याकडे मात्र वैद्याकीय क्षेत्राचे अविभाज्य भाग असलेल्या नर्सिंग क्षेत्रात करीअर करण्याबाबत मात्र उदासीनता आहे. आज भारतात जगातील सर्वात जास्त म्हणजे ऐंशी कोटी लोकांचे करोना लसीकरण करण्याचे शिवधनुष्य देशभरातील नर्सेस नी पेलले. बारावीनंतर नर्सिंग मध्ये करिअरच्या दोन संधी उपलब्ध होतात.

१) बीएससी नर्सिंग : बारावीनंतर चार वर्षांचा हा पदवी अभ्यासक्रम आहे.

flesh eating bacteria in japan
जपानमध्ये मांस खाणार्‍या जिवाणूचा उद्रेक, ४८ तासांत माणसाचा मृत्यू; हे जीवाणू जगभरात थैमान घालणार?
It is necessary to keep developing the skills in oneself Dr Apoorva Palkar
स्वत:मधील कौशल्ये विकसित करत राहणे गरजेचे- डॉ. अपूर्वा पालकर
Tukaram mundhe
तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, ‘या’ खात्याचा पदभार स्वीकारण्याचे मंत्रालयाकडून आदेश!
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
IAS Officer Ram Bhajan Kumhara achieving 667th rank in the UPSC exam Who Ones Worked For Rs 10 Must read Success Story
Success Story: एकेकाळी नव्हतं राहायला घर; दगड फोडण्याचंही केलं काम; पाहा IAS अधिकार राम यांचा प्रेरणादायी प्रवास
Rape case Story
१२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!
Saurabh Netravalkar Straight Answer About Working After T20 World Cup
सुपर ८ फेरी गाठताच सौरभ नेत्रावळकरने कंपनीत केला कॉल; मॅचनंतर काम करण्याबाबत स्पष्टच म्हणाला, “मला कुणी त्रास..”
Indian Air Force Agniveervayu Bharti 2024 iaf announces agniveer vayu 2024 recruitment for 02 2025 intake registration starts july 8 read more details
भारतीय हवाई दलात नोकरीची मोठी संधी! १२ वी उत्तीर्ण उमेदवार ‘या’ पदांसाठी करू शकतात अर्ज

२) जी एन एम अर्थात डिप्लोमा नर्सिंग :बारावीनंतर साडेतीन वर्षांचा हा डिप्लोमा कोर्स असून अनेक शासकीय व खासगी वैद्याकीय महाविद्यालये, रुग्णालये यामध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

या दोन्ही कोर्सच्या प्रवेशासाठी एक राज्यस्तरीय सीईटी घेतली जाते. या सीईटी मध्ये १२ वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्न असतात. ज्यात फिजिक्स विषयाचे वीस मार्कांसाठी वीस प्रश्न, केमिस्ट्री विषयाचे वीस मार्कांसाठी वीस प्रश्न, बायोलॉजी विषयाचे वीस मार्कांसाठी वीस प्रश्न, इंग्रजी विषयाचे वीस मार्कांसाठी वीस प्रश्न व नर्सिंग अॅप्टिट्यूड या विषयाचे वीस मार्कांसाठी वीस प्रश्न असतात. परीक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने घेतली जाते व त्यासाठी फक्त दीड तासाचा वेळ असतो. या परीक्षेतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नर्सिंग डिग्री व डिप्लोमाला प्रवेश मिळू शकतो.

आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये बीएससी नर्सिंग व जी एन एम हे दोन्ही कोर्सेस चालवले जातात. यासाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध होते. हे दोन्ही कोर्सेस या महाविद्यालयात मोफत शिकवले जातात व त्यानंतर विद्यार्थ्यांना भारतीय लष्करी सेवेत सामावून घेतले जाते.

नर्सिंग क्षेत्रात जसे उच्च शिक्षणही घेता येते तसेच बालरोग, मनोरुग्ण, सार्वजनिक आरोग्य यांसारख्या विषयांमध्ये विशेष प्रशिक्षण घेता येते. बीएससी नर्सिंग किंवा जी एन एम या दोन्ही कोर्सेस नंतर दोन तीन वर्षे अनुभव घेतल्यानंतर मध्यपूर्वेतील देश, आफ्रिका खंडातील देशात नोकरीच्या उत्तम संधी आहेत, कएछळर ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या नर्सेस ना युरोप, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये ही उत्तम संधी उपलब्ध आहेत. परदेशात भारतीय नर्सेस ना उत्तम पगाराबरोबरच सामाजिक प्रतिष्ठा ही मिळते. जर्मनीमध्ये सध्या शास्त्र शाखेतून फक्त बारावी उत्तीर्ण व ज्यांना उत्तम जर्मन भाषा येते अशा विद्यार्थिनींना स्टायपेंडसह तीन वर्षे मोफत नर्सिंग शिक्षण व त्यानंतर हमखास नोकरी मिळते. भारतातही नर्सेसची जरुरी दिवसेंदिवस वाढतच आहे. ज्या क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार आणि परदेशात जाण्याच्या संधी या गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत अशा काही थोड्या क्षेत्रात नर्सिंग क्षेत्राची गणना होते. मुलींबरोबरच मुलांनाही या क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य आहे. नर्सिंग करिअर विषयी जनमानसातील गैरसमज व उदासीनता यामुळे गुणवान व कष्टाळू विद्यार्थी या क्षेत्राकडे कमी प्रमाणात आकर्षित होतात ही मात्र दुर्दैवाची गोष्ट आहे.