● ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ( AIIMS), नवी दिल्ली आपल्या २० सहयोगी संस्था आणि इतर ६ सरकारी संस्थांमधील ग्रुप-बी आणि ग्रुप-सी मधील रिक्त पदांच्या भरतीसाठी सामायिक भरती परीक्षा (CRE-४) २२ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत घेणार आहे. गटनिहाय रिक्त पदांच्या पात्रतेच्या अटी आणि रिक्त पदांचा तपशील जाहिरातीच्या Annexure- I मध्ये उपलब्ध आहे.

रिक्त पदांचा गटनिहाय तपशील – (सुरूवातीला ग्रुप कोड नंबर दिलेला आहे.)

(१) असिस्टंट डाएटिशियन/ डाएटिशियन – १७ पदे.

पात्रता – (दि. २ डिसेंबर २०२५ रोजी) एम.एससी. (फुड व न्यूट्रिशियन) आणि २३ वर्षांचा अनुभव.

(२) असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर/असिस्टंट इ. ३९ पदे.

पात्रता – पदवी कोणतीही शाखा आणि संगणकाचे ज्ञान.

(३) ज्यु. अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट/लोवर डिव्हीजन क्लर्क इ. १२७ पदे.

पात्रता – १२ वी उत्तीर्ण आणि कॉम्प्युटर स्किल टेस्ट निकष – संगणकावर टायपिंग इंग्रजी – ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी – ३० श.प्र.मि.

(११) टेक्निशियन ओटी/टेक्निकल असिस्टंट अॅनेस्थेशिया/ओटी इ. १९२ पदे.

पात्रता – बी.एससी. (ओटी टेक्नॉलॉजी) किंवा १२ वी (विज्ञान) आणि ५-८ वर्षांचा अनुभव.

(१२) फार्मासिस्ट/फार्मासिस्ट ग्रेड- II/ स्टोअर किपर (ड्रग) – ३५ पदे.

पात्रता – फार्मासिस्ट डिप्लोमा आणि फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन.

(१४) असिस्टंट स्टोअर्स ऑफिसर/ज्यु. स्टोअर ऑफिसर/स्टोअर किपर इ. १०२ पदे.

पात्रता – पदवी उत्तीर्ण आणि मटेरियल्स मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदवी/पदविका किंवा मटेरियल मॅनेजमेंटमधील पदवी.

(१६) मॉर्चरी अटेंडंट/हॉस्पिटल अटेंडंट/ऑफिस, स्टोअर्स अटेंडंट इ. ५४ पदे.

पात्रता – १० वी/१२ वी आणि अनुभव किंवा हॉस्पिटल सर्व्हिसेस सर्टिफिकेट कोर्स.

(१७) लॅब अटेंडंट ग्रेड- II/ लॅब टेक्निशियन इ. – ८० पदे.

पात्रता – १२ वी विज्ञान (पी.सी.बी.) आणि मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन डिप्लोमा.

(१८) लायब्ररी अँड इन्फॉरमेशन असिस्टंट/लायब्ररियन इ. १९ पदे.

पात्रता – बी.एससी. (लायब्ररी सायन्स/लायब्ररी अँड इन्फॉरमेशन सर्व्हिस) किंवा बी.एससी. आणि लायब्ररी सायन्समधील पदव्युत्तर पदविका.

(१९) मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर/ मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन इ. ७६ पदे.

पात्रता – बी.एससी. (मेडिकल रेकॉर्ड) किंवा १२ वी (विज्ञान) आणि मेडिकल रेकॉर्ड कीपिंग सर्टिफिकेट कोर्स/डिप्लोमा आणि अनुभव.

(२०) ज्यु. स्केल स्टेनो (हिंदी)/स्टेनोग्राफर/पर्सोनल असिस्टंट/प्रायव्हेट सेक्रेटरी इ. ७१ पदे.

पात्रता – १२ वी किंवा पदवी आणि स्टेनोग्राफी स्किल टेस्ट हिंदी – ६४ श.प्र.मि. किंवा इंग्रजी – १००-१२० श.प्र.मि.

(२१) मेडिकल सोशल वर्कर/मेडिकल सोशल सर्व्हिस ऑफिसर इ. २२ पदे.

पात्रता – एम.ए. (सोशल वर्क)/एमएसडब्ल्यू (मेडिकल सोशल सर्व्हिस स्पेशलायझेशनसह) आणि अनुभव.

(२४) टेक्निशियन (रेडिओग्राफी) २१ पदे.

पात्रता – बी.एससी. (रेडिओग्राफी/रेडिओलॉजी) किंवा डिप्लोमा (रेडिओग्राफी/रेडिओलॉजी) आणि २ वर्षांचा अनुभव.

(२५) टेक्निशियन (रेडिओलॉजी)/एक्स-रे टेक्निशियन (रेडिओग्राफी) इ. १७ पदे.

पात्रता – बी.एससी. (रेडिओग्राफी) किंवा रेडिओग्राफी/रेडिओलॉजी डिप्लोमा आणि १ किंवा २ वर्षांचा अनुभव.

(२६) पर्फ्युशनिस्ट – १९ पदे.

पात्रता – बी.एससी. आणि पर्फ्युजन टेक्नॉलॉजी डिप्लोमा. इष्ट पात्रता – क्लिनिकल पर्फ्युशन कामाचा अनुभव.

(३०) फिजिओथेरपिस्ट/ज्यु. फिजिओथेरपिस्ट इ. ४३ पदे.

पात्रता – फिजिओथेरपी पदवी आणि २ वर्षांचा अनुभव किंवा फिजिओथेरपीमधील पदव्युत्तर पदवी.

(३३) ज्यु. वॉर्डन (हाऊस किपर)/हॉस्टेल वॉर्डन इ. २३ पदे.

पात्रता – पदवी आणि हाऊस किपिंग/मटेरियल मॅनेजमेंट/पब्लिक रिलेशन्स/इस्टेट मॅनेजमेंटमधील डिप्लोमा/सर्टिफिकेट कोर्स किंवा २ वर्षांचा अनुभव.

(३४) सिनियर नर्सिंग ऑफिसर/स्टाफ नर्स इ. १२२ पदे.

पात्रता – बी.एससी. (नर्सिंग)/बी.एससी. (नर्सिंग पोस्ट बेसिक) आणि अनुभव.

(३५) सॅनिटरी इन्स्पेक्टर/सॅनिटरी इन्स्पेक्टर ग्रेड- I, ग्रेड- II – ३३ पदे.

पात्रता – १२ वी आणि हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स आणि २ वर्षांचा अनुभव.

(५१) असिस्टंट रिसर्च ऑफिसर/ रिसर्च असिस्टंट – ३१ पदे.

पात्रता – एम.एससी. (मेडिकल मायक्रोबायोलॉजी/मेडिकल फार्माकॉलॉजी/मेडिकल बायोकेमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/अॅप्लाईड मायक्रोबायोलॉजी इ.) किंवा बी.ई./बी.टेक. (बायोमेडिकल/ फार्मास्युटिकल इंजिनीअरिंग) किंवा बी.फार्मसी. किंवा बी.एससी. (मायक्रोबायोलॉजी/बायोकेमिस्ट्री इ.) आणि २ वर्षांचा अनुभव.

आणि ज्यु. इंजिनीअर/ज्यु. फोटोग्राफर/प्रोग्रामर/हिंदी ट्रान्सलेटर/फायर टेक्निशियन इ. पदे.

वयोमर्यादा – (दि. २ डिसेंबर २०२५ रोजी) पद क्र. १, ११, १४, २१, २४, २५, २६, ३४ ३५ वर्षे.

पद क्र. २, ३, १६, १८, १९, २०, २९, ३०, ३३, ५१ ३० वर्षे.

पद क्र. १२, १७ २७ वर्षे.

पद क्र. ३५ २५/३५ वर्षे.

अंदाजे वेतन दरमहा – पद क्र. १, २, ११, १२, १८, २०, २१, २४, २५, २६, ३०, ५१ रु. ७०,०००. पद क्र. ३, १६, १७, १९, ३३ रु. ३८,०००/-.

पद क्र. १४ रु. ८७,०००/-. पद क्र. ३४ रु. ९२,०००. पद क्र. ३५ रु. ५६,०००.

अर्जाचे शुल्क – खुला/इमाव – रु. ३,०००/-; अजा/अज/ईडब्ल्यूएस – रु. २,४००/-; अपंग – फी माफ आहे. एकापेक्षा अधिक ग्रुपसाठी वेगवेगळे अर्ज करावेत. ऑनलाइन अर्ज www.aiimsexams.ac.in या संकेतस्थळावर २ डिसेंबर २०२५ पर्यंत करावेत.