Do you take work stress : हल्ली दररोजच्या धापवळीच्या आयुष्यात अनेक जण आरोग्याकडे लक्ष देत नाही. नोकरी हा आयुष्याचा भाग आहे पण नोकरी म्हणजे आयुष्य नाही, हे समजून घेणे, खूप महत्त्वाचे आहे. कामाच्या वेळी काम आणि इतर वेळी मनसोक्तपणे आयुष्य जगता आले पाहिजे.

अनेक लोक ९ ते ५ नोकरीमुळे त्यांचे वैयक्तिक आयुष्य सुद्धा विसरतात आणि सतत कामामुळे तणावात राहतात. तु्म्ही सुद्धा कामाचा स्ट्रेस घेता का? किंवा सतत कामाचे टेन्शन घेता का? कामामुळे तणावात राहण्याचे खालील लक्षणे दिसून येतात. आज आपण त्या लक्षणांविषयी जाणून घेऊ या.

Use of plastic will be dangerous for agriculture
प्लास्टिकचा भस्मासूर शेतांना गिळंकृत करू पाहतोय…
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
bike taking petrol fire
पेट्रोल भरताना बाईकचालकाच्या कोणत्या चुकीमुळे आग लागते? अशा दुर्घटना टाळण्यासाठी ‘या’ महत्त्वाच्या टिप्स ठरतील फायदेशीर
Commercial Pilot License Holder ppl Cpl airplan career news
चौकट मोडताना: अनुभवानंतरचे शहाणपण
EY Pune employee death
अतितणावामुळे पुण्यात तरुणीचा मृत्यू? अतिताणाचा एखाद्या व्यक्तीवर कसा परिणाम होऊ शकतो?
Itishri Expanding Horizons and Obstructing Frames
इतिश्री: विस्तारणारं क्षितिज आणि अडवणाऱ्या चौकटी
loksatta analysis two kids die in gadchiroli due to superstition
विश्लेषण : गडचिरोलीतील दोन भावंडांच्या मृत्यूची चर्चा का? अंधश्रद्धेमुळे मृत्यू झाल्याचा संशय?
hindu names of hijackers controversy
भावना दुखावून घेण्याची साथ आली आहे का? आयसी-८१४ वरील वाद हे त्याचंच लक्षण…

कामाविषयी सतत बोलणे

जरी तुमचे काम सात वाजता संपले असेल तरी तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर, कुटुंबातील सदस्यांबरोबर तसेच शेजाऱ्यांबरोबर तुमच्या कामाविषयी बोलत असता. ऑफिसमध्ये घडणाऱ्या गोष्टी त्यांच्याबरोबर शेअर करता तसेच मॅनेजर किंवा बॉसविषयी सतत चर्चा करता.

तुमच्या मित्रांना तुमच्या ऑफिसच्या गोष्टी ऐकण्यात रस नसणे

जरी तुमचे मित्र मैत्रिणी तुमच्या ऑफिसमध्ये काम करत नसले तरी त्यांना तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी घडलेल्या छोट्या छोट्या गोष्टी सांगत असाल तर त्यांना या गोष्टी ऐकण्यात अजिबात रस नसतो.

सुट्टीच्या दिवशी मेल तपासणे

कामापासून ब्रेक घेण्यासाठी सुट्टी असते ज्यामुळे आपण स्वत:ला वेळ देऊ शकतो पण सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्ही मेल तपासत असाल, तर हे चुकीचे आहे. तुम्हाला एखादी महत्त्वाची गोष्ट चुकवू नये, म्हणून सतत भीती असते त्यामुळे तुम्ही अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करता.

इच्छा नसताना ऑफिस वेळेच्या पलीकडे काम करणे

तुम्हाला अति काम करायची इच्छा नसते. परंतु काही कारणांमुळे तुम्ही बोलत नाही आणि प्रत्येक जण त्याचा फायदा घेत तुमच्यावर काम सोपवतात. इच्छा नसताना तुम्ही ऑफिस वेळेच्या पलीकडे काम करता.

ऑफिसचे काम घरी करणे

अनेक जण डेडलाइन पूर्ण करण्याच्या नादात ऑफिसवरून घरी आल्यानंतर पुन्हा काम करतात. जो वेळ कुटुंबाबरोबर घालवणे अपेक्षित असते किंवा स्वत:ला वेळ देणे अपेक्षित असते तेव्हा तुम्ही ऑफिसचे काम करता.

सुट्टीवर असताना तुम्ही ऑफिसचा ग्रुप बंद ठेवत नाही

आठवड्याची सुट्टी असो किंवा तुम्ही चार पाच किंवा त्यापेक्षा जास्त दिवस सुट्टीवर असाल तर तुम्ही ऑफिसचे ग्रुप बंद ठेवत नाही आणि त्यामुळे तुम्हाला सतत मेसेज येतात आणि तुम्ही नीट सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकत नाही.

सतत ऑफिस पॉलिटिक्सविषयी चर्चा करणे

जरी तुमचे काम संपले तरी तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांबरोबर ऑफिस पॉलिटिक्सविषयी चर्चा करता. ऑफीसमध्ये काय घडत आहे, काय सुरू आहे यावर तुमचा वैयक्तिक वेळ घालवता.