लोकेश थोरात

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेखांमध्ये आपण नागरी सेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षेतील भूगोल विषयासंदर्भात माहिती घेतली. आतापर्यंत आपण नागरी सेवा परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावरील भूगोलाचे महत्त्व, त्याची व्याप्ती व अभ्यासक्रम याबाबत माहिती घेतली. मुख्यत्वे मागील लेखामध्ये भूगोलातील प्राकृतिक भूगोलाचा सविस्तर अभ्यासक्रम व त्यासोबतच आर्थिक व मानवी भूगोलाचाही काही अभ्यासक्रम आपण पाहिला.

आजच्या लेखामध्ये आपण आर्थिक व मानवी भूगोलाचे राहिलेले जे घटक आहेत त्यांचा सविस्तर अभ्यासक्रम पाहूयात. मागील लेखात आपण आर्थिक भूगोलातील मूलभूत संकल्पना, कृषी व मानवी विकास यासंदर्भात अभ्यासक्रम पाहिला. याव्यतिरिक्त आर्थिक व मानवी भूगोलात खालील घटक अभ्यासावे लागतात.

अ) संसाधने : भूमी संसधाने, भू वापर प्रारूप व भू वापरातील बदल, भूमी संसाधनातील समस्या जसे भूमी निचयन, भूमी निचयन तटस्थेची संकल्पना, भूमी वापराचे नियोजन; जलसंसाधने – त्यांची व्याप्ती, भारतातील जलसंसाधनांची उपलब्धता, जलव्यवस्थापन व संवर्धन, आंतर-राज्यीय जलविवाद, राष्ट्रीय जल धोरण; खनिज संसाधने – त्यांचे भारतातील व जगातील वितरण, भारतातील महत्त्वाचे खजिन पट्टे, खाणकामातील समस्या व खनिजसंपत्तीचे संवर्धन व पुनर्वापर; ऊर्जा संसाधने – त्यांचे वर्गीकरण, त्यांचे वितरण व उत्पादनातील कल, पेट्रोलियम नैसर्गिक वायू व कोळसा या ऊर्जासंसाधनांचे वितरण, अपारंपरिक ऊर्जास्राोत जसे पवनऊर्जा, भूऔष्णिक ऊर्जा, सौरऊर्जा यांची निर्मिती व वितरण, आण्विक ऊर्जेतील समस्या व संभाव्यता, संसाधन संदर्भातील समकालीन मुद्दे जसे आर्थिक विकास, संसाधनांचा ऱ्हास, संसाधनांचे भूराजकारण, ऊर्जासुरक्षा इ.

हेही वाचा >>> UPSC Success Story : IIT टॉपर पण UPSC परीक्षेत चार वेळा आले अपयश, आता आहे IAS अधिकारी

ब)उद्याोग : वर्गीकरण, उद्याोगांच्या स्थान निश्चीरतीवर परिणाम करणारे घटक, महत्त्वाचे उद्याोग व त्यांचे वितरण जसे लोहपोलाद, कापडउद्याोग, वाहननिर्मिती उद्याोग, खतनिर्मिती, कृषीआधारित उद्याोग, पर्यटन इ. जगातील व भारतातील महत्त्वाचे औद्याोगिक प्रदेश/पट्टे-त्यांचे वितरण व समस्या, शासकीय योजना व धोरणे, प्रादेशिक विषमता कमी करण्यात उद्याोगांचे महत्त्व इ.

क) वाहतूक व दळणवळण : रस्ते-रस्त्यांचे वर्गीकरण, भारतमाला प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग विकास योजना, रस्ते विकासातील समस्या व उपाय; रेल्वे – भारतीय रेल्वेचे महत्त्व व समस्या, समर्पित फ्रेट कॉरीडॉर, रेल्वेचे खासगीकरण; अंतर्गत जलवाहतूक – महत्त्वाचे जलमार्ग समस्या व उपाय, सागरी जलवाहतूक – जगातील व भारतातील महत्त्वाची बंदरे, सागरमाला प्रकल्प; हवाई वाहतूक – उडान योजना, दळणवळण-यातील पायाभूत सुविधा, राष्ट्रीय दूरसंचार योजना इ.

ड) व्यापार : जगातील व्यापारातील कल, द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यापार, भारताच्या व्यापारातील कल, दिशा, घटना व प्रारुपे, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी असणाऱ्यात संस्था, प्रादेशिक व्यापारगट, भारतीय व्यापाराचा बदलता कल, आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरणाचा भारतीय व्यापारावरील परिणाम इ.

इ) लोकसंख्या भूगोल : मानवी संसाधनाची संकल्पना, जागतिक लोकसंख्येची वाढ व वितरण, लोकसंख्या सिद्धांत, इष्टतम लोकसंख्या, लोकसंख्या वाढीचे घटक व मोजमाप, लोक्संख्यात्मक लाभांश, स्थलांतर-स्थलांतराची कारणे, परिणाम, कल, स्थलांतरीतांचे प्रश्ने, लोकसंख्येची घटना-लिंग गुणोत्तर, लोकसंख्या मनोरा, शासकीय धोरणे, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण व त्यामधील सुधारणांची गरज.

फ) वसाहती भूगोल : ग्रामीण वसाहती – वर्गीकरण, प्रारूपे, प्रकार, त्यांचे कार्य व ग्रामीण वसाहतीमध्ये होणारे बदल; नागरी वसाहती – त्यांचा उगम, कार्यात्मक वर्गीकरण, भारतीय शहरांचा रूपीकीय अभ्यास; नागरिकीरण – त्याचे प्रमाण, ग्रामीण-नागरी कल, नागरीकरणाच्या समस्या, नागरीकरणासंदर्भात शासकीय योजना, झोपडपट्टी विकास इ.

मुख्य परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम पाहिल्यावर आता प्रश्न पत्रिकेचे स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे आहे. गेल्या ५ ते ६ वर्षांच्या प्रश्नतपत्रिकांचे विश्लेमषण केल्यावर लक्षात येते की, भूगोलामध्ये येणारे प्रश्नत १० किंवा १५ गुणांसाठी विचारले जातात. अभ्यासक्रम व प्रश्नांची सांगड घातल्यास खालील विभागांवर बहुतांशी प्रश्नभ आलेले दिसतात.

१. प्राकृतिक भूगोल : फिर्यार्ड (२०२३), प्राथमिक खडक (२०२२), तपांबर (२०२२), सागरी प्रवाह (२०२२), ज्वालामुखी (२०२१), पर्वतरांगा व त्यांचा स्थानिक हवामानावरील परिणाम (२०२१)

२. संसाधनाचे वितरण : गोड्या पाण्याची उपलब्धता (२०२३), भारतीय किनारपट्टीवरील संसाधनांची संभाव्यता (२०२३), दख्खन पठाराची संसाधन संभाव्यता (२०२२), भारतातील पवनऊर्जा संभाव्यता (२०२२), जगातील खनिज तेलाचे वितरण (२०२१).

३. उद्याोगांचे वितरण : रबर उत्पादक प्रदेश (२०२२), खाणकाम उद्याोगाचा ॅऊढ मधील हिस्सा (२०२१), कृषी आधारीत उद्याोग (२०१९).

४. भूभौतिक घटनादृश्ये : आवर्त पूर्व सूचना (२०२२), ज्वालामुखीय उद्रेक (२०२१), भूस्खलन (२०२१), परिपॅसिफिक क्षेत्र (२०२०), वाळवंटीकरण (२०२०)

५. नागरीकरण : जलस्रोतांची नागरी भूवापरामध्ये पुनर्रचना (२०२१), दशलक्ष शहरातील पूरपरिस्थिती (२०२०)

६. हवामानातील बदल : हवामान बदल व उष्णकटीबंधीय प्रदेशातील अन्नसुरक्षा (२०२३), आर्क्टीक व अंटार्क्टिक हिमनद्यांचे वितळणे (२०२१), हवामान बदल व भारतातील वनसंपत्ती (२०२०), हिमालयातील हिमनद्यांचे वितळणे व भारतातील जलसंसाधने (२०२०)

७. मानवी भूगोल व इतर : भारतातील मानवी विकास व आर्थिक विकास (२०२३), खाड्या व संयोगभूमींचे आंतरराष्ट्रीय व्यापारातील महत्त्व (२०२२), भारत: एक उपखंड (२०२१), संसाधन आधारित उद्याोग व भारतातील रोजगार (२०१९)

अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी जर अभ्यासक्रम व प्रश्नांचे स्वरूप समजून घेतल्यास अभ्यास करताना अभ्यासाची दिशा व केंद्र जपण्यास मदत होईल. मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना वेगवेगळ्या घटकांचा सहसंबंध समजणे गरजेचे आहे. उदा. कृषी व हवामान बदल, मान्सून व स्थानिक संस्कृतीवरील परिणाम, हवामान बदल व संसाधनावरील परिणाम इ. तसेच उत्तरे लिहिताना प्राकृतिक भूगोलाची मानवी भूगोलाशी सांगड घालता येणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास करणे गरजेचे आहे.

अभ्यासक्रम व प्रश्नसपत्रिकांचे विश्लेषण केल्यावर आता आपण संदर्भ साहित्याकडे वळूयात. पहिली गोष्ट म्हणजे खूप सारी संदर्भ पुस्तके वाचण्यापेक्षा आवश्यक पुस्तकेच वारंवार वाचून उजळणी करणे महत्त्वाचे आहे. मुख्य परीक्षेसाठी खालील संदर्भ पुस्तके वाचावीत.

1. NCERT ची पुस्तके :

६ वी ते १० भूगोलाच्या मूलभूत संकल्पना समजण्यासाठी

११ वी व १२ वी प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल व भारताच्या भूगोलातील संकल्पनांच्या सखोल अभ्यासासाठी

प्राकृतिक व मानवी भूगोल – युनिक अॅकॅडमी प्रकाशन

२. संदर्भ साहित्य :

Certificate Physical and Human Geography – Goh Cheng Leong

प्राकृतिक व मानवी भूगोल – युनिक अॅकॅडमी प्रकाशन

भूगोल व पर्यावरण – ए. बी. सवदी

भारताचा भूगोल – माजीद हुसेन (निवडक पाठ अभ्यासावेत)

३. चालू घडामोडी

The Hindu, The Indian Express, लोकसत्ता इत्यादी वृत्तपत्रे

मासिके – Down to Earth, Geography and You, योजना, कुरुक्षेत्र इ. वरील अभ्यास साहित्य वाचताना त्यातील स्थिर घटकांची चालू घडामोडींशी सांगड घालून अभ्यासणे गरजेचे आहे. पुढील लेखामध्ये आपण भूगोलाच्या तयारीची रणनिती, उत्तरलेखन अशा मुद्द्यांची चर्चा करू.