या लेखात आपण यूपीएससी मुख्य परीक्षेतील भारतीय समाज या विषयाविषयी जाणून घेणार आहोत. जीएस १ मध्ये इतर विषयांच्या तुलनेत गेल्या काही वर्षात सर्वाधिक गुणांसाठी या विषयावर प्रश्न विचारले जातात. या विषयात तुमचे भारतीय समाजाविषयीचे आकलन व त्यासंबंधीच्या संकल्पना या दोघांचा विचार अपेक्षित आहे. भारतीय समाजाची वैशिष्टे व त्यात काळानुरूप होणारे बदल आपण समजून घ्यायला हवेत.

नमस्कार विद्यार्थीमित्रांनोया लेखात आपण यूपीएससी मुख्य परीक्षेतील भारतीय समाज या विषयाविषयी जाणून घेणार आहोत. जीएस १ मध्ये इतर विषयांच्या तुलनेत गेल्या काही वर्षात सर्वाधिक गुणांसाठी या विषयावर प्रश्न विचारले जातात. केवळ पुस्तकी ज्ञान इथे अपेक्षित नसून तुम्ही आपल्या समाजाला कसे समजून घेता हे महत्त्वाचे आहे.

भारतातील सामाजिक रचना, तिची विविधता आणि संबंधित समस्यांबद्दल उमेदवारांच्या समजुतीचे मूल्यांकन आयोगाद्वारे इथे केले जाते. यात समाजाची मुख्य वैशिष्ट्ये जसे की भारतीय समाजातील विविधता, महिलांची भूमिका, लोकसंख्येची गतिशीलता, दारिद्र्य व त्याचे परिणाम, शहरीकरण व शहरीकरणाचे परिणाम, जागतिकीकरणाचा भारतीय समाजावर प्रभाव, सामाजिक सक्षमीकरण, सांप्रदायिकता, प्रादेशिकवाद, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक समस्या यांचा समावेश होतो.

या बाबींचे विस्तृत वर्णन खालीलप्रमाणे आपणास करता येईल –

● भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये :

विविधता – धर्म, भाषा, जाती-जमाती आणि सांस्कृतिक प्रथा इ. धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, आर्थिक, लिंगाधारित विविधता महत्त्वपूर्ण आहेत. यातील बारकावे समजून घेणे आवश्यक आहे. या विविधतेतील एकता हे आपल्या समाजाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

बहुवाद – भारतात आपण विविध श्रद्धा, जीवनशैली, आणि भाषांना स्वीकारतो व सहअस्तित्वास प्रोत्साहन देतो. बहुसंस्कृतीवाद – भारतात आपण अनेक संस्कृतींच्या जतन आणि संवर्धनाला प्रोत्साहन देतो. प्रत्येक समुदायाला आपली सण साजरे करण्याची, परंपरा, कला आणि लोकजीवन जपण्याचीआणि राष्ट्रीय ओळखीमध्ये स्वत:चा ठसा उमटवण्याची मुभा आहे.

भारतीय समाजातील महिलांची भूमिका: भारतीय समाजातील लिंग असमानता, महिला संघटना आणि महिला सक्षमीकरणासंबंधीची धोरणे यांचा अभ्यास. महिलांसंबंधी कार्यरत असणाऱ्या संस्था व बिगर शासकीय संस्था (एनजीओ) यांचे कार्य. २०२४ च्या यूपीएससी मुख्य परीक्षेत लिंगभाव समानता, लिंगभाव निष्पक्षता व महिला सक्षमीकरण अशा संकल्पनांवर प्रश्न विचारलेला आहे. पुढील प्रश्न बघा –

प्र. लिंगभाव समानता, लिंगभाव निष्पक्षता आणि महिला सक्षमीकरण यातील फरक ओळखा. यासंबंधीच्या कार्यक्रमाची रचना आणि अंमलबजावणी करताना लिंगभावाच्या समस्या विचारात घेणे का महत्त्वाचे आहे?

या संकल्पना आपण समजून घेऊयात : सर्वप्रथम आपणास इथे ‘लिंग’ व ‘लिंगभाव’ ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. लिंग ही नैसर्गिक वा जैविक बाब असून लिंगभाव ही सांस्कृतिक बाब आहे. तसेच समानता व न्याय (इक्व्यालिटी व इक्विटी) या संकल्पना समजून घेण्यासाठी खालील चित्र बघा.

लिंगभाव समानता : सर्व लिंगभावांना समान हक्क, जबाबदाऱ्या आणि संधी मिळणे इथे अपेक्षित असते. उदा. एकाच कामासाठी पुरुष, महिला व तृतीयपंथी याना समान संधी व वेतन देणे.

लिंगभाव निष्पक्षता वा लिंगभाव न्याय : वेगवेगळ्या लिंगभावांच्या गरजा लक्षात घेऊन न्याय्य वागणूक देणे म्हणजे लैंगिक न्याय होय. यात ऐतिहासिक आणि सामाजिक अन्याय दूर करून सर्वांना समता साधण्यास योग्य आधार देणे अपेक्षित आहे. उदा. मुली आणि मुलांसाठी दर्जेदार शिक्षणाची समान संधी.

महिला सक्षमीकरण : महिलांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, संसाधनांवर हक्क आणि समाजात सक्रिय सहभाग घेण्याची क्षमता देणे म्हणजे महिला महिला सक्षमीकरण होय. इथे महिलांचा आत्मविश्वास, नेतृत्वक्षमता आणि स्वायत्तता वाढविणे अपेक्षित आहे. उदा : महिलांना व्यवसाय सुरू करण्याचे प्रशिक्षण देणे किंवा राजकीय नेतृत्व भूमिकांसाठी तयार करणे व त्यांना संधी उपलब्ध करून देणे.

वरील प्रश्नाच्या दुसऱ्या भागात, कार्यक्रमाची रचना आणि अंमलबजावणी करताना लिंगभावाच्या समस्या विचारात घेणे का महत्त्वाचे आहे असे जे विचारले आहे त्यासाठी खालील टेबल बघा –

लोकसंख्या : लोकसंख्या वाढ व नियंत्रण उपाय आणि लोकसंख्या लाभांश इथे महत्त्वाचे आहेत. भारतासारख्या देशासाठी लोकसंख्या लाभांश महत्त्वाची भूमिका बजावतो.

दारिद्र्य आणि विकास: दारिद्रयाची कारणे आणि प्रकार, गरिबी निर्मूलन कार्यक्रम व त्यांचे परिणाम.

शहरीकरण : ग्रामीण-शहरी स्थलांतर, झोपडपट्टी वाढ आणि गृहनिर्माण समस्या याबाबतचे विश्लेषण. जागतिकीकरण: सांस्कृतिक मूल्ये, परंपरा आणि जीवनशैलीवर त्याचा प्रभाव.

सामाजिक सक्षमीकरण : वंचित समुदायांचे सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायासाठी कायदेशीर उपाय.

सामाजिक समस्या : जातीय भेदभाव, एलजीबीटीकयू समुदायाचे अधिकार आणि इतर समकालीन सामाजिक समस्या.

सामाजिक चळवळी : भक्ती आणि सुफी चळवळी, दलित आणि सुधारणा चळवळी व वर्तमानातील चळवळी.

भारतीय डायस्पोरा : परदेशात राहणाऱ्या भारतीय समुदायाला आणि त्यांच्या प्रभावाला समजून घेणे.

जातीयवाद, प्रादेशिकवाद आणि धर्मनिरपेक्षता : जातीय हिंसाचाराची कारणे आणि परिणाम, प्रादेशिकवादाचा राजकीय आणि सामाजिक प्रभाव आणि भारतातील धर्मनिरपेक्षतेची संकल्पना.

वरील सर्व घटक हे आपणास वर्तमान संदर्भात अभ्यासायचे आहेत. उत्तरात चालू घडामोडींचे संदर्भ असतील तरच आपण चांगले गुण मिळवू शकतो. हे लक्षात ठेवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sushilbari10@gmail.com