ASRB Jobs Recruitment 2023: कृषी वैज्ञानिक निवड मंडळातर्फ भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेने प्रसिद्ध केलेल्या सूचनापत्रकामध्ये यासंबंधित माहिती देण्यात आली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवार १० एप्रिल २०२३ पर्यंत ASRB भरतीसाठी अर्ज करु शकतात. उमेदवार अर्ज करण्यासाठी https://www.asrb.org.in या अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृषी वैज्ञानिक निवड मंडळ (Agricultural Scientists Recruitment Board) मधील १९५ जागांसाठी भरती होणार आहे. यामध्ये स्पेशलिस्ट टेक्निकल ऑफिसर आणि सीनिअर टेक्निकल ऑफिसर अशा पदांचा समावेश आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठामधून संबंधित विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेली व्यक्ती या जागांसाठी अर्ज करु शकते. तसेच उमेदवाराचे वय २१ ते ३५ यांमध्ये असणे आवश्यक आहे. (आरक्षित वर्गांसाठी वयाच्या अटीमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे.)

अर्ज केल्यानंतर उमेदवारांच्या निवड प्रक्रियेला सुरुवात होईल. यामध्ये कंप्यूटर बेस्ड टेस्ट (सीबीटी), मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी यांचा समावेश असू शकतो. निवड प्रक्रियेद्वारे उत्तम गुणवत्ता असलेल्या योग्य उमेदवारांची निवड संस्थेकडून करण्यात येईल. रिक्त जागांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ५६ हजार ते १ लाख ७७ हजार रुपये इतके प्रति महिना वेतन दिले जाणार आहे. पदानुसार पगार ठरवण्यात येईल.

आणखी वाचा – मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदांवर बंपर भरती; BMC रुग्णालयात काम करण्याची संधी

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना १००० रुपये आकलन शुल्क म्हणून भरावे लागणार आहेत. आरक्षित वर्गाला यामध्येही सूट देण्यात आली आहे. १० एप्रिल ही अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे. https://www.asrb.org.in या अधिकृत वेबसाइटवर भरतीविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asrb recruitment 2023 apply for 195 posts at asrb org in 10 april is last date know more yps
First published on: 19-03-2023 at 09:31 IST