Bank of Maharashtra recruitment 2024 : तुम्हाला व्हॉलीबॉल खेळायला आवडते किंवा तुम्ही त्यात अव्वल आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.आता व्हॉलीबॉल खेळाडूंना नोकरीची संधी मिळू शकते आणि ते ही बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये. हो, बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत “व्हॉलीबॉल” पदांसाठी भरती सुरू आहे. एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्ही जर उत्तम व्हॉलीबॉल उत्तम खेळाडू असाल तर वेळ न घालवता लगेच अर्ज करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या १२ रिक्त जागा महिलांसाठी आहे. या भरतीसाठी कसा अर्ज करायचा, वयोमर्यादा, अर्जपद्धत इत्यादी विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या. (Bank of Maharashtra recruitment 2024 vacancies for Volleyball posts)

 • पदाचे नाव – बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत “व्हॉलीबॉल” पदांसाठी भरती सुरू आहे.
 • पदसंख्या – बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत १२ रिक्त जागांसाठी “व्हॉलीबॉल” पदांकरीता भरती सुरू आहे.
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .
 • अर्ज पद्धती – “व्हॉलीबॉल” पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.
 • वयोमर्यादा – “व्हॉलीबॉल” पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षे असावीत.
 • नोकरी ठिकाण – निवड झालेल्या उमेदवाराच्या नोकरीचे ठिकाण पुणे आहेत.
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – तुम्ही खालील पदांसाठी अर्ज पाठवू शकता. जनरल मॅनेजर, HRM” बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, १५०१, शिवाजीनगर, पुणे ४११००५,

हेही वाचा : Success Story: दुखापतीमुळे अर्धवट राहिलं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न; UPSC परीक्षा देण्यासाठी सोडली नोकरी अन्… पाहा IPS अधिकाऱ्याचा हा अनोखा प्रवास

 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत “व्हॉलीबॉल” या पदासाठी तुम्ही ०८ जुलै २०२४ पर्यंत अर्ज करू शकता.
 • अधिकृत वेबसाईट – या भरती प्रक्रियेविषयी जाणून घ्यायच्या असेल तर तुम्ही खालील अधिकृत वेबसाइटला भेट द्या. https://bankofmaharashtra.in/
 • पगार – पात्र उमेदवाराला या पदासाठी २४,०५० रुपये वेतन मिळेल.
 • अधिकृत अधिसुचना –
 • अर्ज करण्यापूर्वी खालील अधिसुचना नीट वाचावी.

Click to access 06de871c-4b95-437c-93df-d934d42459d4.pdf

हेही वाचा : Success Story: जिद्दीला सलाम! ऑटोरिक्षा चालवण्यापासून ते ८०० कोटींची कंपनी उभारण्यापर्यंत… लोकप्रिय ब्रँडच्या व्यावसायिकाचा प्रेरणादायी प्रवास

अर्ज कसा करावा?

 • अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात घेऊन त्यापूर्वी अर्ज करावा.
 • वरील पत्त्यावर अर्ज पाठवावा.
 • अर्ज भरण्यापूर्वी अधिसुचना नीट वाचावी.
 • अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे नीट जोडावी.