National Housing Bank Recruitment 2023: नॅशनल हाऊसिंग बँकेतर्फे ३५ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. नॅशनल हाऊसिंग बँक (NHB) मध्ये अर्थशास्त्रज्ञ, अधिकारी आणि व्यवस्थापन पदांच्या नियुक्तीसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आहे. आपणही बँकेत नोकरीसाठी इच्छुक असल्यास खालील तपशील नीट काळजीपूर्वक वाचा.

NHB भरती रिक्त पदांची माहिती

पदाचे नावरिक्त पदांची संख्या
मुख्य अर्थतज्ज्ञ1
प्रोटोकॉल अधिकारी1
जनरल मॅनेजर (स्केल – VII)1
जनरल मॅनेजर (स्केल – VI)2
असिस्टंट जनरल मॅनेजर (स्केल V)5
रिजनल मॅनेजर (स्केल IV)8
मॅनेजर (स्केल III)6
डेप्युटी मॅनेजर (स्केल II)10

NHB भरती वयोमर्यादा: (01/01/2023 रोजी पर्यंत)

  • डेप्युटी मॅनेजर (स्केल – II): २३ वर्षे ते ३२ वर्षे
  • मॅनेजर (स्केल – III): २३ वर्षे ते ३५ वर्षे
  • रिजनल मॅनेजर (स्केल IV): ३० वर्षे ते ४५ वर्षे
  • असिस्टंट जनरल मॅनेजर (स्केल – V): ३२ वर्षे ते ५० वर्षे
  • डेप्युटी जनरल मॅनेजर (स्केल – VI): ४० वर्षे ते ५५ वर्षे
  • जनरल मॅनेजर (स्केल – VII): ४० वर्षे ते ५५ वर्षे
  • मुख्य अर्थशास्त्रज्ञ: ६२ वर्षे
  • प्रोटोकॉल ऑफिसर: ६४ वर्षे

NHB पोस्टनुसार सॅलरी

  • असिस्टंट जनरल मॅनेजर (स्केल I): ३६,००० रुपयांपासून पुढे
  • रिजनल मॅनेजर (स्केल IV): ७६,००० रुपयांपासून पुढे
  • डेप्युटी जनरल मॅनेजर (स्केल – VI): १ लाखांपासून पुढे
  • मुख्य अर्थशास्त्रज्ञ: 5 लाख प्रति महिना
  • पर्यवेक्षणासाठी अधिकारी: 1 लाख प्रति महिना
  • प्रोटोकॉल ऑफिसर: 0.75 लाख प्रति महिना

NHB भरती पात्रता निकष:

  • CA सह कोणत्याही शाखेतील पदवीधर.
  • संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी.
  • लॉ पदवी.
  • संगणक / MCA मध्ये पदवी.
  • इंजिनियरिंग पदवी.
  • एमबीए.

NHB भरती निवड प्रक्रिया:

शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

Recruitment for assistant professor post
मुंबईच्या TISS मध्ये ‘या’ पदासाठी भरती होणार! २८ एप्रिलआधी करा अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष
Sainik School Satara Bharti 2024
Sainik School Satara Bharti : सैनिक स्कूल सातारामध्ये नोकरीची संधी, महिन्याला मिळेल ३८ हजार रुपयांपर्यंत पगार
ssc je recruitment 2024 for 968 junior engineer
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ‘या’ पदांसाठी मेगा भरती! १८ एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज
penalty for car washes in bangalore
तहानलेल्या बंगळूरुमध्ये वाहने धुणाऱ्यांना दंड

हे ही वाचा<< Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2023: मराठी भाषिकांसाठी सुवर्णसंधी; कुठे व कसा कराल अर्ज?

NHB भरती अर्ज फी:

  • SC/ST/PwBD श्रेणीतील उमेदवारांसाठी: १७५/- रुपये (केवळ सूचना शुल्क)
  • जनरल / OBC श्रेणीतील उमेदवारांसाठी: ८५०/- रुपये
  • फी ऑनलाइन पेमेंट मोडद्वारे करावी.

NHB भरती अर्ज कसा करावा?

➢ पात्र उमेदवार केवळ NHB अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
➢ उमेदवारांनी मूलभूत तपशील, फोटो, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा, लिखित घोषणा आणि आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी.
➢ ऑनलाइन अर्जांची नोंदणी करण्याची अंतिम तारीख ०६/०२/२०२३ मध्यरात्रीपर्यंत आहे.