BARC Mumbai Recruitment 2024 : भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई येथे सध्या वैद्यकीय अधिकारी आणि ऍडमिनिस्ट्रेटर या पदांवर भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी एकूण किती जागा रिक्त आहेत याची नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारांनी माहिती पाहावी. तसेस, या नोकरीसाठी अर्ज कसा करायचा, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया काय असेल या सगळ्या महत्त्वाच्या बाबी जाणून घ्या.

BARC Mumbai Recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एकूण १० रिक्त जागांवर नोकरीची भरती करण्यात येणार आहे.

ऍडमिनिस्ट्रेटर या पदासाठी एकूण १ रिक्त जागेवर नोकरीची भरती करण्यात येणार आहे.

अशा एकूण ११ रिक्त पदांवर भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभागात नोकरीची भरती करण्यात येणार आहे.

BARC Mumbai Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे.

ऍडमिनिस्ट्रेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एमबीबीएसह मान्यताप्राप्त विद्यापीठातुन हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशनचा डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : IIIT Nagpur Recruitment 2024 : नागपूर शहरात नोकरीची संधी! भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये होणार भरती!

BARC Mumbai Recruitment 2024 : वेतन

वैद्यकीय अधिकारी या पदावर निवड झालेल्या उमेदवारास दरमहा १ लाख ४ हजार ९९८/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.

ऍडमिनिस्ट्रेटर या पदावर निवड झालेल्या उमेदवारास दरमहा १ लाख ४ हजार ९९८/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.

BARC Mumbai Recruitment 2024 – भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग अधिकृत वेबसाईट लिंक –
https://www.barc.gov.in/index.html

BARC Mumbai Recruitment 2024 – अधिसूचना लिंक –
https://www.barc.gov.in/careers/vacancy12.pdf

BARC Mumbai Recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वरील कोणत्याही पदासाठी उमेदवारास अर्ज करायचा असल्यास त्यांनी तो ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
या नोकरीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखती घेण्यात येणार आहे.
उमेदवारांनी नोकरीच्या अधिसूचनेत दिलेला फॉर्म भरावा.
तसेच फॉर्मसह आपले सर्व शैक्षणिक आणि नोकरीच्या अनुभवाचे प्रमाणपत्र जोडावे.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ५० वर्षे अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
उमेदवारांनी या नोकरीच्या मुलाखतीसाठी वेळेवर हजर असणे अनिवार्य आहे.
या पदासाठी मुलाखतीची तारीख २० जून २०२४ अशी आहे.
मुलाखतीची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ६ अशी ठेवण्यात आली आहे.

वरील नोकरीसंदर्भात उमेदवारांना अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाईट आणि अधिसूचना यांची लिंक वर नमूद केलेली आहे.