BARC Mumbai Recruitment 2024 : भाभा अणुसंशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत ‘डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स (DipRP) या पदासाठी नोकरीची भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी किती जागा रिक्त आहेत याची माहिती उमेदवारांनी माहिती घ्यावी. तसेच, या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख या सर्वांबद्दल जाणून घ्या.

BARC Mumbai Recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

भाभा अणुसंशोधन केंद्र कार्मिक विभाग येथे डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स या पदासाठी एकूण ३० रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.

BARC Mumbai Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराकडे आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

भौतिकशास्त्र विषयात ६०% गुणांसह B.Sc. शिक्षण असावे.
भौतिकशास्त्र विषयात ६०% गुणांसह M.Sc. शिक्षण असावे.
अथवा
भौतिकशास्त्रात ६०% गुणांसह इंटिग्रेटेड M.Sc. चे शिक्षण असावे.
तसेच उमेदवारांकडे सरकारी संस्थेच्या रेडिओथेरपी विभागात किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : BECIL Recruitment 2024 : ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया येथे नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती

BARC Mumbai Recruitment2024 : वेतन

डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २५,०००/- रुपये वेतन देण्यात येईल.

BARC Mumbai Recruitment2024 – भाभा अणुसंशोधन केंद्र कार्मिक विभाग अधिकृत वेबसाईट –
https://www.barc.gov.in/

BARC Mumbai Recruitment 2024 – अधिसूचना लिंक –
https://www.barc.gov.in/careers/vacancy9.pdf

BARC Mumbai Recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वरील पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी नोकरीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा खालीलप्रमाणे :
सामान्य / जनरल श्रेणीतील उमेदवारांसाठी वयोमर्यादा २६ वर्षे अशी ठेवण्यात आली आहे.
ओबीसी श्रेणीतील उमेदवारांसाठी वयोमर्यादा २९ वर्षे अशी ठेवण्यात आली आहे.
एससी – एसटी श्रेणीतील उमेदवारांसाठी वयोमर्यादा ३१ वर्षे अशी ठेवण्यात आली आहे.

तसेच या पदासाठी अर्ज पाठविताना उमेदवारांना ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
नोकरीचा अर्ज भरताना उमेदवारांनी अर्जामध्ये आपली संपूर्ण आणि अचूक माहिती भरणे आवश्यक आहे.
तसेच, उमेदवारांनी नोकरीचा अर्ज अंतिम तारखेआधी भरणे अपेक्षित आहे.
नोकरीचा अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ही ४ जून २०२४ अशी आहे.

वरील नोकरीच्या पदासंबंधी उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास उमेदवारांनी भाभा अणुसंशोधन केंद्र कार्मिक विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचना यांची लिंक वर नमूद केलेली आहे.