BAVMC Pune Recruitment 2024 : पुणे शहरातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल अंतर्गत विविध रिक्त पदांवर नोकरीची भरती करण्यात येणार आहे. या नोकरीच्या भरतीसाठी नेमकी किती आणि कोणती पदे उपलब्ध आहेत याची इच्छुक उमेदवारांनी माहिती पाहा. तसेच, नोकरीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता आणि नोकरीचा अर्ज पाठवण्याच्या प्रक्रियेसह त्याच्या अंतिम तारखेबद्दल जाणून घ्यावे. नोकरीचा अर्ज पाठवण्याआधी उमेदारांनी नोकरीची अधिसूचना वाचून मगच नोकरीचा अर्ज पाठवावा.

BAVMC Pune Recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल अंतर्गत विविध विषयांसाठी प्राध्यापक आणि निवासी यांची भरती खालीलप्रमाणे करण्यात येणार आहे.

  • प्राध्यापक [Professor] या पदासाठी एकूण ५ पदे रिक्त आहेत.
  • सहयोगी प्राध्यापक [Associate Professor] या पदासाठी एकूण ११ पदे रिक्त आहेत.
  • सहायक प्राध्यापक [Assistant Professor] या पदासाठी एकूण १६ पदे रिक्त आहेत.
  • कनिष्ठ निवासी [Junior Resident] या पदासाठी एकूण २४ पदे रिक्त आहेत.
  • वरिष्ठ निवासी [Senior Resident] या पदासाठी एकूण २२ पदे रिक्त आहेत.

अशा एकूण ७८ रिक्त पदांवर नोकरीची भरती करण्यात येणार आहे.

हेही वाचा : AIESL Recruitment 2024 : एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये होणार ‘मेगा’ भरती! पाहा माहिती

BAVMC Pune Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

प्राध्यापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित विषयांमधील MD/MS/DNB असे शिक्षण असणे आवश्यक आहे.
सहयोगी प्राध्यापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित विषयांमधील MD/MS/DNB असे शिक्षण असणे आवश्यक आहे.
सहायक प्राध्यापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित विषयांमधील MD/MS/DNB असे शिक्षण असणे आवश्यक आहे.
कनिष्ठ निवासी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त मेडिकल विद्यापीठामधून MBBS विषयातील शिक्षण असणे आवश्यक आहे.
वरिष्ठ निवासी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित विषयांमधील ब्रॉड स्पेशालिटीमध्ये MD/MS/DNB पोस्ट ग्रॅज्युएशन असे शिक्षण असणे आवश्यक आहे.

BAVMC Pune Recruitment 2024 : वेतन

प्राध्यापक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १,८५,०००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.
सहयोगी प्राध्यापक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १,७०,०००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.
सहायक प्राध्यापक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १,००,०००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.
कनिष्ठ निवासी या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ६४,५५१/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.
वरिष्ठ निवासी या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ८०,२५०/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.

BAVMC Pune Recruitment 2024 – भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल अधिकृत वेबसाईट लिंक –
https://www.bavmcpune.edu.in/

BAVMC Pune Recruitment 2024 – अधिसूचा लिंक –
https://www.bavmcpune.edu.in/wp-content/uploads/2024/06/Recruitment_Advt_-07.06.2024.pdf

BAVMC Pune Recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वरील कोणत्याही पदासाठी उमेदवाराची निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
उमेदवारांनी अधिसूचनेत दिलेला फॉर्म भरून त्यासह सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून, मुलाखतीला २ तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही अधिसूचनेत नमूद केलेली आहे त्याची अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नोंद घ्यावी.
वरील नोकरीसाठीचे वॉक इन इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखतींच्या तारखा या खालीलप्रमाणे आहेत.

  • प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या पदांसाठीची मुलाखत ही १३ जून २०२४ आणि २७ जून २०२४ रोजी दुपारी ३ वाजता ठेवण्यात आली आहे.
  • कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी या पदांसाठीची मुलाखत ही १३ जून २०२४ आणि २७ जून २०२४ रोजी सकाळी ११ वाजता ठेवण्यात आली आहे.

वरील नोकरीसंबंधी उमेदवारांना अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. अधिसूचना आणि वेबसाईट लिंक ही वर नमूद केली आहे.