scorecardresearch

ग्रॅज्युएशननंतर पुढे काय? हे कोर्स करा अन् कमवा बक्कळ पैसा, करिअरही होणार सेट

तुमचं करिअर सेट होण्याबरोबरच भरपूर पैसा कमवण्याची संधी तुम्हाला मिळू शकते, या कोर्सबद्दल जाणून घ्या सविस्तर.

ग्रॅज्युएशननंतर पुढे काय? हे कोर्स करा अन् कमवा बक्कळ पैसा, करिअरही होणार सेट

Career Opportunities After Graduation : डिजीटल युगात शिक्षण पद्धतीही दिवसेंदिवस बदलताना दिसत आहेत. ग्रज्युएशन झाल्यानंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावं, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. दिवसेंदिवस काही क्षेत्रात अभ्यासक्रमही बदलत असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. बदलत्या काळानुसार प्रत्येकाने करिअरची वाटचल करताना स्वत:ला अपडेट ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे. ग्रॅज्युएशनचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर करिअरच्या बाबतीत कोणते निर्णय घ्यावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण काळजी करण्याची आता गरज नाहीय. कारण ग्रॅज्युएशननंतर प्रोफेशनल कोर्स तुम्ही करु शकता. आम्ही तुम्हाला अशा कोर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांना पूर्ण केल्यावर तुमचं करिअर सेट होण्याबरोबरच भरपूर पैसा कमवण्याची संधी तुम्हाला मिळू शकते.

आर्टिफिशियल इंटेलिजेंस

बदलत्या काळाचा विचार करुन तुम्ही जर आर्टिफिशियल इंटेलिजेंस क्षेत्राशी संबंधित कोर्स केला, तर तुमचं करिअर सेट होऊ सकत. तंत्रज्ञान क्षेत्रात एआय तज्ज्ञांना मोठी मागणी असते. तुम्ही या क्षेत्रात डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्स करु शकता. तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्या हे कोर्स ऑफर करतात.

डेटा सायन्स

तुम्हाला चांगली नोकरी मिळवायची असल्यास तुम्ही डेटा सायन्सचा कोर्सही करु शकता. या कोर्सच्या अभ्यासक्रमात डेटा सायन्स, मशीन लर्निंग कौशल्ये आणि तंत्रे काशी वापरायची, याबाबत शिकवलं जातं. डेटा सायन्सच्या कोर्सला मोठी मागणी आहे. कारण या कोर्सच्या माध्यमातून डेटा सायन्सच्या समस्या सोडवता येतात. या कोर्सला खूप मागणी असल्यामुळं चांगली नोकरा शोधणं अधिक सोपं होईल.

पीएमपी सर्टिफिकेशन

पीएमपी कोर्सलाही वाढती मागणी असल्यामुळं हा कोर्स करणं करिअरबाबतीत फायदेशीर ठरू शकतं. पीएमपी म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल. या सर्टिफिकेशन कोर्सचा अभ्यासक्रम खूप महत्वाचा आहे. या अभ्यासक्रमानुसारच तुम्हाला संधी प्राप्त होतात. या प्रमाणपत्रात मॅन्युफॅक्चरिंग, फायनान्स,आयटी, हेल्थ केअर आणि अन्य काही महत्वाच्या क्षेत्रात नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होतात.

डिजीटल मार्केटिंग

मार्केटिंगमध्ये करिअर करणं काही क्षेत्रात फायदेशीर ठरू शकतं. विशेषत: डिजीटल मार्केटिंगला खूपच मागणी आहे. तुम्हाला आवड असेल तर तुम्ही या डीजीटल कोर्स करण्याला प्राधान्य देऊ शकता. हा कोर्स करिअर सेट होण्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. यामध्ये एसइओ ऑडिटिंग, पीपीसी, सोशल मीडिया स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग, मोबाईल अॅडव्हर्टायझिंग अशाप्रकारच्या गोष्टी अनेक गोष्टी शिकायला मिळतात. तसेच या व्यवसायाला प्रचंड मागणी आहे.

मराठीतील सर्व करिअर ( Career ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 20:09 IST
ताज्या बातम्या