scorecardresearch

भारतीय पोस्ट विभागात १० वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची मोठी संधी, ४० हजार पदांसाठी मेगा भरती; अधिकची माहिती जाणून घ्या

​India Post GDS Jobs 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

​India Post GDS Jobs 2023
भारतीय पोस्ट विभागाने इंडिया पोस्ट GDS भरती २०२३ साठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. (Photo : India Post Facebook)

​India Post GDS Jobs 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे भारतीय अलीकडेच, भारतीय पोस्ट मंत्रालयाने हजारो पदांच्या भरतीसंदर्भातील अधिसूचना जारी केली होती. आता भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करु शकतात.

भारतीय पोस्ट विभागाने इंडिया पोस्ट GDS भर्ती २०२३ साठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार ग्रामीण डाक सेवक (GDS ), शाखा या पदांसाठीच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. पोस्टमास्तर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM), आणि डाक सेवक अशा जागांसाठी देखील ऑनलाइन अर्जांची नोंदणी चालू असून ती फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत सुरु असणार आहे. GDS भरती २०२३ साठी पात्रता, जॉब प्रोफाइल आणि अर्ज कसा करायचा याबाबतची सर्व माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

हेही पाहा- अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठे बदल; सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्या नवीन नियम

भारत पोस्ट ग्रामीण डाक सेवक (GDS) यासह विविध पदांसाठी सुमारे ४० हजार ८८९ जागांवर भरती केली जाणार आहे. उमेदवार संबंधित indiapostgdsonline.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अतर अर्ज भरण्याची प्रक्रिया २७ जानेवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ती १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना त्यांचा अर्ज दुरुस्त करायचा असेल ते १७ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान अर्जात दुरुस्ती करू शकतात.

इंडिया पोस्ट ऑफिस GDS २०२३ साठी पात्रता निकष खालीलप्रमाणे –

शैक्षणिक पात्रता

हेही वाचा- ‘या’ ७ टिप्स बोर्डाच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना तणावमुक्त ठेवतील, परीक्षेचा फोबिया कसा दूर करायचा ते जाणून घ्या

  • उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा
  • स्थानिक भाषेचे योग्य ज्ञान असावे
  • काही पदांसाठी संगणकाचे ज्ञान आवश्यक

वयाची अट –

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 40 वर्ष असावं. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार, वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

वेतनश्रेणी –

या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना १० हजार ते २४ हजार ४७० रुपये प्रति महिना वेतन दिलं जाईल.

हेही वाचा- १० वी पास मुला-मुलींना नोकरीची मोठी संधी, BSF मध्ये १,४१० जागांसाठी मेगा भरती; अधिकची माहिती जाणून घ्या

अर्ज शुल्क –

भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी १०० रुपये शुल्क भरावं लागेल. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्यातून सूट देण्यात आली आहे.

असा भरा अर्ज –

  • सर्वात आधी indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • रजिस्ट्रेशन करा.
  • अर्ज भरा.
  • आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा.
  • अर्ज सबमिट करा.

काही शंका असल्यास किंवा अधिकची माहिती हवी असल्यास indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

मराठीतील सर्व करिअर ( Career ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 17:50 IST
ताज्या बातम्या