scorecardresearch

मुंबई महानगरपालिकेत जॉब हवाय? ४०,००० हुन अधिक पगार, कामाचे स्वरूप व अर्जाची पद्धत जाणून घ्या

BMC Jobs: मुंबई महानगरपालिकेत बंपर भरती! आठवड्यात सहा दिवस काम, दिवसाचे पाच तास काम आणि पगाराचा आकडा…

MCGM Bharti 2023
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) भरती मंडळ, मुंबई. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

BMC Bharti, MCGM Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेने ३५ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://www.portal.mcgm.gov.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर घोषणा २३ मार्च रोजी करण्यात आली होती तर ४ एप्रिल २०२३ पर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. रिक्त पदांची सविस्तर माहिती व अर्जाची पद्धत जाणून घेऊया…

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२३.

  • पदाचे नाव: आहारतज्ञ.
  • रिक्त पदे: 35 पदे.
  • नोकरी ठिकाण: मुंबई.
  • अर्जाची पद्धत : ऑनलाइन (ई-मेल).
  • अर्जाची अंतिम तारीख: ४ एप्रिल २०२३ .
  • अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता: NCDCELL2022@gmail.com

पात्रता निकष (Qualification Criteria)

१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातील Bsc (आहारतज्ज्ञ विभाग) पदवीधर असावा. UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून न्यूट्रिशन व डाएटिक्स मध्ये डिप्लोमा/ Msc/ पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेला असावा.

२) शासकीय संस्थेतील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

३) संगणक विषयी ज्ञान- MSCIT

४) ३१ मार्च २०२३ पर्यंत उमेदवाराचे वय ४० पेक्षा जास्त नसावे. सेवानिवृत्त उमेदवारांसाठी वयाची मर्यादा ६२ आहे.

कामाची वेळ व पगार

१) सोमवार ते शनिवार दुपारी १२ ते संध्याकाळी ५

२) प्रति भेटीस १२०० रुपये, भेटीचे दिवस (अंदाजे २५)

हे ही वाचा<< १२ वी उत्तीर्ण बेरोजगारांसाठी BMC मध्ये १३५ पदांची भरती! ३० हजार रुपये पगार, पात्रता निकष वाचून करा अर्ज

उमेदवाराने अर्जासह दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर शिक्षणाचे दाखले, MSCIT प्रमाणपत्र व अनुभवाचे पत्रक जोडावे. जर तुम्ही अर्ज करणार असाल तर ऑल द बेस्ट अन्यथा तुमच्या ओळखीतील पात्र उमेदवारांना हा लेख नक्की पाठवा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 10:03 IST

संबंधित बातम्या