BMC Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मेगाभरतीचे आयोजन केले जामार आहे. बीएमसीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला २७ मे रोजी सुरुवात झाली आहे. भरतीसाठी शैक्षणिक पात्रता महत्त्वपूर्ण ठरणार आहे. संबंधित क्षेत्रातील अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. बीएमसीच्या अधिकृत वेबसाइटवर भरतीशी संबंधिक सविस्तर माहिती मिळवू शकता. तसेच अपडेट्स मिळवण्याकरिता MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुपची मदत घेऊ शकता.

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक कार्यकारी पदाच्या एकूण ११७८ जागांसाठी भरती केली जाणार आहे. २७ मे ते १६ जून या कालावधीमध्ये इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करु शकणार आहेत. थोडक्यात १६ मे ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वयाचे कमाल वयाचे बंधन नाही असे म्हटले जात आहे. अर्ज केल्यानंतर ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. त्यातून पुढे योग्य उमेदवाराची निवड केली जाईल. बीएमसीमध्ये सहाय्यक कार्यकारी म्हणून काम करणाऱ्या उमेदवारांना २१,७०० ते ६९,१०० रुपये वेतन मिळणार आहे.

TCS Recruitment 2024
TCSमध्ये होणार पदवीधर उमेदवारांची भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख अन् प्रक्रिया
Pawan Hans released notification for Associate Helicopter Pilot posts Check Details Here
Pawan Hans Bharti 2024: पवन हंस अंतर्गत ‘या’ पदासाठी होणार भरती; चार लाखांपर्यंत मिळणार पगार, असा करा अर्ज
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर
Mazago Mazagaon Dock Ship Builders Mumbai Bharti for various vacant post Till Three April
Mazagon Dock Bharti 2024: माझगाव डॉकमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ विविध पदांसाठी भरती सुरू, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

शैक्षणिक पात्रता

i) उमेदवार मान्यता प्राप्त मंडळाची शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
ii) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला विधी किंवा समतुल्य शाखांचा पदवीधर असावा.
iii) टंकलेखन आणि MSCIT परीक्षा उत्तीर्ण असावा.

प्रवेश शुल्क

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्जासह ठराविक रक्कम प्रवेश शुल्क म्हणून भरावी लागेल. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १,००० रुपये प्रवेश शुल्क भरावे लागेल. तर मागास प्रवर्गाचा भाग असलेले उमेदवार ९०० रुपये भरुन अर्ज करु शकतात. भरतीशी निगडीत अपडेटेड माहिती वेबसाइटच्या मदतीने मिळवता येतील.

आणखी वाचा – कुस्तीपटू बनण्यासाठी काय करावे लागते? National आणि State Level कुस्तीपटू म्हणून करिअर करण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागतात?

(टीप – वरील माहिती https://megabharti.in/ वेबसाइटवरुन घेतलेली आहे.)