BMC Recruitment 2024 : आज म्हणजे २० फेब्रुवारी २०२४ पासून बृहन्मुंबई महानगर पालिकेंतर्गत मोठ्या प्रमाणावर भरती सुरू होणार आहे. एकूण १३ रिक्त जागांवर उमेदवारांची भरती होणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरावयाचा आहे. नेमक्या कोणत्या पदांवर भरती सुरू आहे, तसेच अर्ज करायची अंतिम तारीख आणि वेतनश्रेणी काय आहे या सगळ्याची माहिती पाहा.

BMC Recruitment 2024 : रिक्त पदे आणि पदसंख्या

अतिदक्षता बालरोग तज्ज्ञ – रिक्त जागा – १
विकृती शास्त्रज्ञ – रिक्त जागा – १
मानद बालरोग शल्यक्रिया तज्ज्ञ – रिक्त जागा – १
मानद भूलतज्ज्ञ – रिक्त जागा – १
मानद बीएमटी फिजिशियन – रिक्त जागा – १
मानद त्वचारोग तज्ज्ञ – रिक्त जागा – १
श्रवणतज्ज्ञ – रिक्त जागा – १
सहायक वैद्यकीय अधिकारी – रिक्त जागा – १
माहिती तंत्रज्ञ – रिक्त जागा – १
डाटा मॅनेजर – रिक्त जागा – १
भांडार सहायक – रिक्त जागा – १
नोंदणी सहायक – रिक्त जागा – १
डाटा एंट्री ऑपरेटर – रिक्त जागा – १

sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
BMC jobs opening news in marathi
BMC Recruitment 2024 : मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी मोठी भरती! पदासंबंधीची माहिती पाहा
Mumbai city jobs in BMC
BMC recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी होणार भरती
Brihanmumbai Mahanagarpalika Bharti For 38 Human Resource Coordinator location for this recruitment is Mumbai
BMC Bharti 2024: पदवीधरांना नोकरीची संधी; BMC अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरू, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

हेही वाचा : Mumbai jobs 2024: सेंट बँक होम फायनान्स लिमिटेडमध्ये भरती सुरू! अर्जाची अंतिम तारीख पाहा

BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका – अधिकृत वेबसाइट –
https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका -अधिसूचना-
https://drive.google.com/file/d/1Gbk0ebSN0LPQ90lEU6rqQ3O8ENHgFtvG/view

वेतन

मानद बालरोग शल्यक्रिया तज्ज्ञ – २०,०००/- रुपये
मानद भूल तज्ज्ञ – २०,०००/- रुपये
मानद बीएमटी फिजिशियन – २०,०००/- रुपये
मानद त्वचारोग तज्ज्ञ – २०,०००/- रुपये
श्रवणतज्ज्ञ – २०,०००/- रुपये
अतिदक्षता बालरोग तज्ज्ञ – १,५०,०००/- रुपये
विकृती शास्त्रज्ञ – १,१२,०००/- रुपये
सहायक वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस [MBBS] – ९०,०००/- रुपये, तर एनडी [ND] – १,००,०००/- रुपये
माहिती तंत्रज्ञ – ३३,०००/- रुपये
डाटा मॅनेजर – १९,०००/- रुपये
डाटा एंट्री ऑपरेटर – १८,०००/- रुपये
भांडार सहायक – १६,८००/- रुपये
नोंदणी सहायक – १६,८००/- रुपये

BMC Recruitment 2024 : अर्ज कसा करावा? आणि अर्जाची अंतिम तारीख

वरील कोणत्याही पदांसाठी इच्छुक उमेदवारास ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्जामध्ये सर्व आवश्यक माहिती अचूक आणि पूर्णपणे भरलेली असावी.
माहिती अपूर्ण असल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज अंतिम तारखेआधी नोकरीच्या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ही २९ फेब्रुवारी २०२४ अशी आहे.

वरील कोणत्याही पदाच्या भरतीबद्दल उमेदवारांना अधिक माहिती हवी असल्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा बृहन्मुंबई महानगरपालिकेची नोकरीसंबंधीची अधिसूचना वाचावी. अधिकृत वेबसाइट आणि अधिसूचना त्यांच्या लिंकमध्ये नमूद केलेल्या आहेत.