scorecardresearch

७ वी पास असणाऱ्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या सविस्तर

अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

BHC Recruitment 2023
या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Bombay High Court Recruitment 2023: मुंबई उच्च न्यायालयात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे मुंबई उच्च न्यायालयात काही पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतील. मुंबई उच्च न्यायालय भरती २०२३ साठी आवश्यक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

हेही पाहा- MCA Recruitment 2023: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदासाठी भरती प्रक्रिया सुरु

मुंबई उच्च न्यायालय भरती २०२३ अंतर्गत शिपाई /हमाल पदांसाठी १६० पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल २०२३ असणार आहे.

एकूण रिक्त पदे – १६०

पदाचे नाव – शिपाई/ हमाल.

शैक्षणिक पात्रता – ७ वी पास

वयोमर्यादा –

हेही पाहा- RBI Pharmacist Recruitment 2023: रिझर्व्ह बँकेत फार्मासिस्ट पदांसाठी भरती, प्रति तासासाठी मिळणार ४०० रुपये पगार; जाणून घ्या डिटेल्स

खुला प्रवर्गासाठी – १८ ते ३८ वर्षे.

मागासवर्गीयांसाठी – ५ वर्ष सूट देण्यात आली आहे.

अर्ज शुक्ल –

अर्ज करण्यासाठीचे शुल्क – २५ रुपये.

नोकरी ठिकाण – मुंबई.

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २७ मार्च २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ एप्रिल २०२३

जाहिरात पाहण्यासाठी https://drive.google.com/file/d/15uFzh02qAR0RmARdqVSiQYGAjg0MtYTg/view या लिंकला भेट द्या.

भरतीबाबतच्या इतर माहितीसाठी https://bombayhighcourt.nic.in/index.php या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 09:44 IST

संबंधित बातम्या