अनेकांना बिझनेस सुरू करायचा असतो पण खर्चासाठी हवे तेवढे पैसे नसतात अशा वेळी कोणता बिझनेस सुरू करावा, हा प्रश्न पडतो. पण असे अनेक बिझनेस आहेत, जे अगदी कमी खर्चात तुम्ही सुरू करू शकता आणि बक्कळ पैसा कमावू शकता. आज आपण अशा काही हटके बिझनेस आयडिया जाणून घेऊ या.

१) इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्त करणे.

इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्त करणे हा बेस्ट बिझनेस आहे. या बिझनेसमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याची काहीही आवश्यकता नसते. विशेष म्हणजे या व्यवसायाला खूप मागणी आहे.
हल्ली प्रत्येकाच्या घरी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरली जातात आणि ही उपकरणे इतकी महाग असतात की एकदा बिघडली तर पुन्हा घेणे अवघड जाते. अशा वेळी ही इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्त करणे, हाच एक पर्याय शिल्लक असतो. त्यामुळे शून्य खर्चामध्ये हा व्यवसाय तुम्ही करू शकता.

a lift stained due to paan spitting at bhopal Madhya Pradesh railway station photo goes viral on social media
“कधी सुधारणार लोकं?” पान थुंकून रेल्वे स्टेशनवरील लिफ्ट केली अस्वच्छ, फोटो पाहून नेटकरी संतापले…
Patient Sexually Harassed Indian Nurse She Shuts Him Down Saying I love India Vulgar Remarks Make Netizens Angry Over Viral Video
“भारत बेडवर चांगला नाही, जर मी..”, नर्ससमोर अश्लील भाषेत बोलणाऱ्या रुग्णाचा Video व्हायरल; नर्सने शेवटी..
Kitchen Jugaad Video
Jugaad Video: बटाटा सिलिंडरला एकदा घासून पाहा; ‘या’ मोठ्या समस्येतून होईल सुटका
mini electric chili crusher machine viral video
Video : वाह! ‘दाढीच्या ब्लेडने’ बनवला ‘मिनी मिरची कटर’! जुगाड पाहून नेटकरी विचारतात, “आता…”

हेही वाचा : SSC CHSL Recruitment 2023: कर्मचारी निवड आयोगातर्फे ४५२२ पदांवर होणार भरती, जाणून घ्या किती मिळेल पगार?

२ ब्लॉग लिहिणे (Blogging)

हल्ली स्मार्टफोन हा प्रत्येकाकडे असतो. क्वचितच कोणी असेल की ज्याच्याकडे स्मार्टफोन नाही. जर तुम्हाला लिहायला आवडत असेल तर तुम्ही ब्लॉग सुरू करू शकता आणि घरबसल्या कमावू शकता. कोणत्याही विषयावर ब्लॉग लिहून तुम्ही लाखो रुपये कमावू शकता. हा व्यवसायही तुम्ही खूप कमी खर्चात सुरू करू शकता.

हेही वाचा : MSTC Recruitment: मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये होतेय ‘या’ जागांसाठी भरती; ११ जूनपूर्वी करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर

३. नाश्त्याचा स्टॉल

जर तुम्हाला खाण्यामध्ये किंवा स्वयंपाकामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही नाश्त्याचा स्टॉल लावू शकता. सुरुवातीला जास्त खर्च करू नका. खूप कमी प्रमाणात सुरू करा पण क्वालिटी चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. जर लोकांना तुमचा फूड मेन्यू आवडायला लागला की तुम्ही तुमचा बिझनेस आणखी वाढवू शकता. सुरुवातीला तुम्ही कमी खर्चात बिझनेस सुरू करायची ही एक उत्तम आयडिया आहे.