Success Story of Dilip Shanghvi: अनेकदा उच्च शिक्षण घेऊन, मोठ्या पगाराच्या नोकरीची ऑफर येऊनही काही लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतात. बऱ्याचदा हा प्रयत्न फसतो. पण, काही जण समोरील आव्हाने स्वीकारून पुढे जाताना येणाऱ्या अडीअडचणींवर यशस्वीपणे मात करतात. 'ज्याची इच्छाशक्ती प्रबळ, त्याच्या कामाला येई बळ' असे म्हटले जाते. जर तुमच्यात काही करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला ते करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जर तुम्ही हार मानली नाही आणि सतत प्रयत्न करत राहिले तर यश निश्चित आहे. यश मिळवण्यासाठी जोखीम घेणे आवश्यक आहे. तसेच प्रचंड कष्ट करण्याबरोबरच सातत्य ठेवले तर एक दिवस तुम्ही नक्कीच यशाच्या शिखरावर पोहोचता. आज आपण अशाच एका उद्योगपतीची गोष्ट पाहणार आहोत, ज्यांनी आपल्या मेहनतीनं यशाचं शिखर गाठलं आहे. देशातील सर्वात मोठी फार्मा कंपनी सन फार्मास्युटिकलचे संस्थापक आणि एमडी दिलीप संघवी यांनी असेच काहीसे केले आहे. पायपीट करत औषधं विकली एक काळ असा होता, जेव्हा दिलीप संघवी हे औषध वाटपाचे काम करायचे. ते फिरून-फिरून औषध कंपन्यांची औषधं विकायचे. एके दिवशी अचानक त्यांच्या मनात विचार आला की, जर मी इतरांनी बनवलेली औषधं विकू शकतो, तर माझी स्वतःची का नाही. २००० उधार घेऊन सुरू केली कंपनी दिलीप संघवी यांचा जन्म गुजरातमधील अमरेली येथे झाला होता. १९८२ मध्ये त्यांनी वडिलांकडून दोन हजार रुपये कर्ज घेतले आणि त्यांच्या मित्रासोबत गुजरातमधील वापी येथे त्यांची फार्मास्युटिकल कंपनी सन फार्मा सुरू केली. सुरुवातीला कंपनीने अनेक प्रकारची औषधं तयार करण्याऐवजी चांगल्या दर्जाच्या औषधांवर भर दिला. कंपनीच्या मार्केटने चांगली कामगिरी केली. हेही वाचा >> Success Story: पुणेकर जगात भारी! परदेशातील अडीच लाखांची नोकरी सोडून सुरु केला स्वत:चा व्यवसाय; आता करोडोंची उलाढाल त्यानंतर १५ वर्षांनंतर, १९९७ मध्ये दिलीपने तोट्यात चालणारी अमेरिकन कंपनी कार्को फार्मा विकत घेतली, जेणेकरून ते अमेरिकन बाजारात पोहोचू शकतील. यानंतर २००७ मध्ये कंपनीने इस्रायली कंपनी तारो फार्मा खरेदी केली. २०१२ मध्ये संघवी यांनी चेअरमन आणि सीईओ पदाचा राजीनामा दिला होता. या युनिटमध्ये ते मानसोपचाराशी संबंधित औषधे बनवत असत. एक क्षण असाही होता, जेव्हा ते देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक बनले. २०१५ मध्ये फोर्ब्सच्या यादीत दिलीप संघवी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकून देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले होते.