देशातील सार्वजनिक क्षेत्रातील ११ बँकांमध्ये तरुण तरुणींना प्रोबेशनरी ऑफिसर या पदावर नोकरीच्या संधी साठी आयबीपीएससी संस्था एक परीक्षा घेते. या बँका पुढीलप्रमाणे – बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बॅंक, पंजाब ॲन्ड सिंध बँक. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी मिळवलेले २० ते ३० वर्षांदरम्यान वय असलेले विद्यार्थी/ विद्यार्थिनी यासाठी पात्र असतात. आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादा ५ वर्षांनी शिथिल केली आहे.
आय बी पी एस ही एक स्वायत्त संस्था असून बॅँकांमधील सर्व प्रकारच्या भरतीसाठी काम बघते – जेणेकरून बँकांचा वेळखाऊ भरती प्रक्रियेचा वेळ वाचावा आणि विद्यार्थ्यांनाही प्रत्येक बँकेसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा देण्यापेक्षा सर्व बॅंकांसाठी एकच प्रवेश परीक्षा देता यावी. प्रोबेशनरी ऑफिसरच्या भरतीसाठी आयबीपीएस एक प्रवेश परीक्षा राबवणार आहे. याची जाहिरात नुकतीच त्यांच्या ्रुस्र्२. ्रल्ल या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. यासाठी या संकेतस्थळावरुन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै आहे.
निवड प्रक्रिया तीन टप्प्यात होते. पहिल्या टप्प्यातील परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना एक तासात १०० प्रश्न सोडवावे लागतात. यात रिझनिंग ॲबिलिटी व सामान्य गणित या दोन विषयांवर प्रत्येकी ३५ प्रश्न असतात तर इंग्रजी विषयावर ३० प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असतो, तर सामान्य गणिताला ३० गुण व रीझनिंग ॲबिलिटीला ४० गुण आहेत. चुकीच्या उत्तरासाठी पाव गुण वजा केला जातो. ही पहिल्या टप्प्याची परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात होणार्याच दुसर्यान टप्प्यातील परीक्षेत ऑब्जेक्टिव्ह व डि्क्रिरप्टिव्ह असे दोन विभाग असतात. ऑब्जेक्टिव्ह विभागात चार सेक्शन असतात. पहिल्या सेक्शन मध्ये रिझनिंग वर आधारित प्रत्येकी दीड गुणाचे ४० प्रश्न असतात. चुकीच्या उत्तरासाठी पाव गुण वजा केला जातो. दुसर्याा सेक्शनमध्ये जनरल अवेअरनेस , इकानॉमी व बँकींग ज्ञानाची परीक्षा घेतली जाते. यामध्ये ३५ मिनिटांत ५० प्रश्न सोडवावे लागतात. चुकीच्या उत्तरासाठी पाव गुण वजा केला जातो. तिसर्याक सेक्शन मध्ये विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेची परीक्षा घेतली जाते. ज्यात ३५मिनिटांत ४० प्रश्न सोडवावे लागतात. चुकीच्या उत्तरासाठी पाव गुण वजा केला जातो. चौथ्या सेक्शन मध्ये डाटा ॲनॅलिसिस व इंटरप्रिटेशन वर आधारित ४० प्रश्न ४५ मिनिटांत सोडवावे लागतात, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी पाव गुण वजा केला जातो.
डि्क्रिरप्टिव्ह विभागात इंग्रजी निबंध लेखन व उतार्यावरील प्रश्न या स्किल्स ची पंचवीस मार्कांची परीक्षा घेतली जाते. यामध्ये तीस मिनिटांत दोन प्रश्न सोडवावे लागतात. या दुसर्याव टप्प्यातील मुख्य परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या विद्यार्थ्यांना तिसर्याा टप्प्यातील परीक्षेला सामोरे जावे लागते जी नोव्हेंबर महिन्यात होईल. यामध्ये विद्यार्थ्यांची व्यक्तिमत्त्व चाचणी घेण्यात येते.
या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी पुढील दोन महिने भरपूर पेपर सोडवण्याचा सराव करावा लागेल कारण या परीक्षेचा सगळ्यात अवघड भाग म्हणजे २५/ ३० सेकंदात एक प्रश्न सोडवणे हा आहे.
vkvelankar@gmail.com
(लेखक बीई, एमबीए असून गेली २५ वर्षे करिअर मार्गदर्शन करतात.)
