’ मला दहावीला ७७ टक्के व बारावीला ५६ टक्के आहेत. सध्या बीएससी ॲग्रीच्या चौथ्या वर्षात शिकत आहे. मी एमपीएससी राज्यसेवा परीक्षेचाही अभ्यास चार महिन्यांपासून करत आहे. तसेच एमएससी एन्ट्रन्सचा देखील अभ्यास सुरू आहे. तर मी पुढे काय करू?- प्रशांत माहिपती पाटील , कराड
एमपीएससी किंवा एमएससी यातील एकाचीच तयारी करणे फायद्याचे ठरेल. एमपीएससीची तयारी करणार असाल तर आत्तापासूनच यासाठी भरपूर वाचन व पेपर सोडवण्याचा सराव आवश्यक आहे. याचबरोबरीने स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंग, इन्शुरन्स, रेल्वे या स्पर्धा परीक्षांचाही विचार करावा. कारण या सर्व परीक्षांची तयारी एकच असून एमपीएससीच्या प्रिलीमच्या अभ्यासात ती होऊन जाते.
’ मी बीएससी दुसर्या वर्षाचा विद्यार्थी आहे. मला भविष्यात यूपीएससी परीक्षा द्यायची आहे, त्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करते आहे. योग्य मार्गदर्शनासाठी कोणत्याही एआयवर विश्वास ठेवावा असे मला वाटत नाही. तरी कृपया आपण मला मार्गदर्शन करावे.- दुर्गा अनिल सोनी, लातूर</p>
तुम्ही यूपीएससीसाठी तयारी सुरू केली आहेच, यासाठी कोचिंग क्लास लावलाच पाहिजे असे नाही पण लावला तर अभ्यासाची दिशा मिळण्यासाठी मदत होते. भरपूर वाचन , पेपर सोडवण्याचा सराव करणे आवश्यक आहे. यूपीएससीमध्ये अत्यंत तीव्र स्पर्धा असल्याने यशाची शक्यता अत्यल्प असते. म्हणून स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंग, रेल्वे यासाठीच्या विविध स्पर्धा परीक्षांचाही जरूर विचार करावा.
(लेखक बीई , एमबीए असून गेली २५ वर्षे करिअर मार्गदर्शन करत आहेत.)
