● माझा मुलगा २०२६ मध्ये बारावीची परीक्षा देणार आहे. त्यानंतर तो जेईई, एमएच-सीईटी देणार आहे. त्याला एरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये करायचे आहे. या शाखेला किती वाव आहे? – मानसी जोशी, ठाणे
— एरोस्पेस अभियांत्रिकी हा कोर्स काही आयआयटीमध्ये उपलब्ध आहे. त्याकरिता जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेत उत्तम यश मिळणे आवश्यक आहे. काही एनआयटीमध्येही हा कोर्स उपलब्ध आहे. याशिवाय काही खासगी विद्यापीठांमध्येही प्रवेश मिळू शकतो. या क्षेत्रात वाव आहे, फक्त संस्था निवडताना तिचा कॅम्पस प्लेसमेंटचा गेल्या ५ वर्षांचा इतिहास बघणे अत्यंत आवश्यक आहे. कारण या क्षेत्रात कमी कंपन्या काम करत असल्याने पदवीनंतर नोकरी मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी फिजिक्स व मॅथेमॅटिक्स हे दोन विषय आवडीचे असायला हवेत.
● मी गेल्या वर्षीपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. माझे वय २१ वर्षे आहे. मी वायसीएमओयू मधून बी.ए.करत आहे. माझ्याकडे कोणतीही व्यावसायिक पदवी नाही, म्हणून मला एलएलबी करण्याचीही इच्छा आहे. प्लान बी काय असावा? – प्रशांत उजळे
— तुमचं वायसीएमओयू मधून बीए पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला राज्यसेवा परीक्षा देता येईल. मात्र आता पदवी पूर्ण करेपर्यंत पुढची दोन वर्षे राज्यसेवा परीक्षेची कसून तयारी करा म्हणजे पदवीनंतर लगेचच परीक्षा देता येईल. राज्यसेवेच्या वर्णनात्मक पद्धतीसाठी अनेक कोचिंग क्लासेस आहेत, त्यांचे गेल्या काही वर्षांचे रिझल्ट पाहून अंतिम निवड करा. लोकसत्ता करिअर वृत्तांतच्या वाचनामधूनही तुम्हाला उपयुक्त माहिती मिळेल. पदवीनंतर ३ वर्षांचा लॉ अभ्यासक्रम उपलब्ध आहे, तोच तुमचा ‘प्लान बी’ ठेवा.
करिअर मंत्र
करिअरच्या विविध वाटा निवडताना केवळ आवड असून चालत नाही, तर त्या क्षेत्रातील नोकरीच्या संधी आणि व्यावसायिक पदवीचा बॅकअप असणे महत्त्वाचे ठरते.
Written by विवेक वेलणकर

First published on: 30-01-2026 at 01:00 IST | © The Indian Express (P) Ltd
TOPICSआयआयटीIITआयआयटी जेईईएमपीएससी मार्गदर्शनMPSC GuidenceकरिअरCareerजेईई मेन्सJEE Mainस्पर्धा परीक्षाCompetitive Exam
+ 2 More
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career mantra mpsc preparation plan b llb aerospace engineering iit nit admission competitive exams professional degree strategy ocd
