डॉ. मिलिंद आपटे
माझा नातू आता नववीत गेला. त्याला एनडीएमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. शारीरिक क्षमतेत तो फिट आहे. त्याचे वडील अगोदर लष्करात होते. तिथे सहा वर्षे नोकरी करून त्यांनी राजीनामा दिला आणि आता सिनियर पोस्ट मास्तर म्हणून नोकरी करतात. त्यांनाही मुलाने एनडीएत प्रवेश घेऊन करिअर करावे, असे वाटते. तर तिथे प्रवेश घेण्यासाठी आतापासून काय तयारी करावी लागेल, किती मार्क बारावीत मिळवावे लागतील, प्रवेश प्रक्रिया कधी आणि कशी असते, त्यासाठीच्या अभ्यासाला काय वाचन करावे लागेल इत्यादीबाबत मार्गदर्शन व्हावे, ही विनंती. – संजय जाधव

एनडीए ही परीक्षा अशा उमेदवारांसाठी घेतली जाते जे १२वी उत्तीर्ण झाले आहेत किंवा त्यात बसत आहेत. एनडीएच्या हवाई दल आणि नौदल शाखांमध्ये आणि १० + २ कॅडेट प्रवेश योजनेत सामील होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना १२वीते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिताचा अभ्यास करावा लागतो. एनडीएच्या निवडप्रक्रियेचे प्रमुख चार टप्पे असतात

१. लेखी परीक्षा

२. मुलाखत

३. वैद्याकीय चाचणी

४. लेखी परीक्षा

एकूण ९०० मार्कांची लेखी परीक्षा असते यात गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, चालू घडामोडी, सामान्यज्ञान, इंग्रजी इत्यादी विषयांचा ८ वी ते १२ वी पर्यंतचा अभ्यासक्रम असतो.

५. लेखी परीक्षेसाठी रोजचे वर्तमान पत्र वाचन महत्त्वाचे आहे. चालू घडामोडी, सामान्यज्ञान यांच्या तयारी बरोबरच इतरही अनेक गोष्टींची तयारी यातून होते.

लेखी परीक्षा ही अकॅडमिक स्वरुपाची असते. अभ्यासक्रम खूप जास्त असल्याने नियोजन गरजेचे आहे. पहिल्या दिवसापासूनच नियमित प्रत्येक दिवसाचा अभ्यास पुर्ण केला तर अभ्यासक्रमाचे लक्ष्य पूर्ण करता येईल. हे टारगेट पूर्ण करतानाच प्रश्न एका मिनिटात सोडवण्याचे कौशल्य देखील कमावता येईल. जुन्या प्रश्नपत्रिका सोडवायला घ्यायला लागतील बारावी त उत्तम गुण घेणाऱ्यांची एनडीए परीक्षाही पास होण्याचे जास्त शक्यता असते त्यामुळे बारावी त उत्तम मार्कांचे टार्गेट ठेवणे चांगले. खूप शुभेच्छा.

माझे वय २७ आहे. मी स्पर्धा परीक्षा (राज्यसेवा) ची तयारी करतो आहे. माझे एमएससी बायोटेक्नॉलॉजी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. सहा महिने मी हैदराबादमध्ये एका फार्मा कंपनीते QA विभागात काम केले, पण त्यात मला इंटरेस्ट नव्हता, शिफ्टमुळे अपुरी झोप, अभ्यासाला वेळ कमी पडत असल्यामुळे मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता. मला परीक्षा माझे ३० वय होईपर्यंत क्लिअर करायची आहे. काही कारणावरून घरून लग्नासाठी दबाव आहे. जर ३० वयापर्यंत परीक्षा उत्तीर्ण नाही झालो तर परत आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्यासाठी याच खासगी क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी मिळेल का? त्यासाठी वेगळे काही करण्याची गरज आहे का ? – आदित्य पाटील

तुमचा निर्णय तसा धाडसाचा आहे, पण बरेच वेळा असे निर्णय केवळ ‘आता अपयश येता कामा नये, अन्यथा काय ?’ या भीती मुळे यशस्वी होतात, त्यामुळे तुम्ही फक्त टार्गेट ठेवून आता तयारीला लागावे , लग्नाचा निर्णय हा सर्वस्वी तुमचा आणितुमच्या कुटुंबाचा आहे, आता अपयश आले तर काय याचा विचार न करता प्रयत्न करणे जास्त उत्तम नाहीतर परत एकावेळी दोन ठिकाणी प्रयत्न केल्यासारखे होईल त्यामुळे ‘हे झालेच पाहिजे’ असे विचार ठेवणे उत्तम. खूप शुभेच्छा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

careerloksatta@gmail. com