’ डॉ. श्रीराम गीत

मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं की, अनेक कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. मॉडेलिंग हे क्षेत्र जितकं आकर्षक तितकंच जीवनाचे अनेक पैलू सामोरे आणणारं. या क्षेत्रात काम करणाऱ्या मितूला या निसरडय़ा क्षेत्राची कल्पना देता न आल्याची घुसमट सहन करणाऱ्या तिच्या आईची व्यथा..

Why Israel compassion for Hamas war victims cost lives
युद्धग्रस्तांबाबतची सहृदयताच जीवावर बेतली, असे का व्हावे?
Womens Health Marina alternative to hysterectomy
स्त्री आरोग्य : गर्भाशय काढून टाकण्याला ‘मेरीना’चा पर्याय?
The rape victim cannot be forced to give birth to child
बलात्कारात पीडितेस अपत्य जन्माची सक्ती करता येणार नाही…
What happens to your body if you have ajwain tea on an empty stomach
झोपेतून उठताच रिकाम्या पोटी ओव्याचा चहा घेण्याचे फायदे डॉक्टरांनीच सांगितले; फक्त प्रमाण ‘इतकं’ हवं
Child molested by baiting with chocolate Nagpur
चॉकलेटचे आमिष देऊन चिमुकलीवर अत्याचार
Documentary is The art of storytelling
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : गोष्ट सांगण्याची कला…
mrunal thakur reveals she felt intimidated while working with Shahid Kapoor expert shares tips to overcome
मृणाल ठाकूरने सांगितले शाहिद कपूरबरोबर काम करताना दडपण येण्याचं कारण; वाक्यही न आठवण्याची स्थिती का आली?
Modelling Career Attractive society Career Opportunity
चौकट मोडताना: ही वाटच निसरडी

मुलं टीनएज मध्ये येतात त्यावेळी घरात वादळ घेऊन येतात. काही मोजक्याच वेळा ते वादळ घराला आणि मुलांना ऊर्जा देऊन जाते, तर बऱ्याच वेळा सारं उद्ध्वस्त करतं. माझा नवरा विश्वनाथ म्हणजे विशू आणि लाडकी लेक अमिता म्हणजे मितू यांच्याबरोबरची पंधरा वर्षे आठवताना वादळाच्याच गोष्टी आठवत राहतात. अमिता फारशी हुशार कधीच नव्हती. मात्र मी ज्याप्रमाणे छोटे-मोठे व्यवसाय सांभाळत माझे स्वत:चे विश्व निर्माण केले होते तसे ती नक्की करेल याची मला खात्री होती.

अमिता मला अनेक वेळा विचारत असे. बाबा आयटीत काम करतात. आई तू काम करतेस म्हणजे काय? त्याचे तिच्या बालवयाला समजेल असे उत्तर देणे जरा कठीणच होते. कारण मी काय करते ते भल्याभल्यांना समजत नसे. छोटय़ा छोटय़ा कंपन्यांसाठी ब्रँड बिल्डिंग, मार्केट रिसर्च, डिजिटल मार्केटिंग आणि त्याच वेळी त्यांचं ब्रोशियर तयार करून देणे अशा मल्टी टास्किंगमध्ये मी होते. अर्थात सारीच क्रिएटिव्ह टीम माझ्याबरोबर फ्रीलान्स म्हणून काम करत होती. मी सोडून इतर सगळय़ांनी दहापंधरा वर्षे नोकरी केल्यानंतर ती सोडून आता फ्रीलान्सर म्हणून कामे करत होते. माझ्या क्रिएटिव्ह टीम बद्दल विशू किंवा अमिता यांना पुरेशी माहिती नव्हती. सहसा आमच्या साऱ्या भेटीगाठी बाहेरच होत असत.

हिरू नावाचा देखणा फोटोग्राफर मात्र मी कायमचा बांधून घातला होता. दिसायला जितका देखणा तितकाच कामात उत्कृष्ट. ‘‘निरू, तू दर वेळेला बरेचदा हॉटेलमध्ये कॉफी-सँडविच देऊन आम्हाला पाठवून देतेस. यावेळी तुझ्याकडून आम्हाला झकास डिनर पाहिजे’’, असा तब्बल सहा महिने माझ्या टीमने आग्रह केल्यानंतर मी त्याला बळी पडले. त्यातूनच हे सारे रामायण उद्भवले. विशूला पूर्ण कल्पना देऊन टीमला डिनरला घरी बोलावले होते. मी नंतर तुम्हाला जॉईन होतो, तोपर्यंत तुमच्या बिझनेसचे काय ते चालू द्या असे त्याने सांगितले होते. फोटोग्राफर हिरूची सवयच अशी की फोटो काढण्याकरिता लागणारे वातावरण स्वत: पहिल्यांदा जाऊन तपासायचे, पाहायचे, नोंद करायची आणि मग कामाला लागायचे.

बेल वाजली तेव्हा खरे तर मीच त्याला दार उघडायला जायला पाहिजे होते. पण काय झाले कुणास ठाऊक नेमकी अमिता त्याला सामोरे गेली. माझे दोन घरी येणारे कलीग तिला ‘मितू’ म्हणतात हे त्याला माहिती होते. कोणाशीही सहजगत्या जवळीक साधण्याचा त्याचा स्वभाव असल्याने काही सेकंदातच हिरू तिला घेऊन गॅलरीत गेला. तिचे बरेच फोटो काढल्याचे मला कळले तरी ते कुठे छापू नकोस हे सांगायला मी पण विसरले. तसं तो काही करेल असं मला वाटलंही नव्हतं. त्याने ते मुद्दाम केले असे आजही मला वाटत नाही. पण छापून आलेले पोरीचे फोटो पाहून विशूचे डोके इतके बिथरले की हाच माझा विशू काय? असा विचार मनात यावा.

नाते दुरावले 

जेमतेम आठवीत गेलेली अमिता यानंतर मनाने माझ्याजवळ कधीच आली नाही. त्या धक्क्यातून सावरणे आजही मला कठीण जाते. अमिता त्या प्रसंगानंतर अभ्यासा पासून फारच दुरावत गेली. अभ्यासाबाबत तिला सातत्याने सांगणाऱ्या विशूलाही ती टाळू लागली. अर्थातच परिणाम ती नापास होण्यात झाला. आपली मुलगी नापास होते हा धक्का विशूला सहन झाला नाही. त्याच वेळी तिने एका अ‍ॅड करता मान्यता देऊन ५० हजार रुपये घरात आणले हे सांगितल्यावर मोठीच ठिणगी पडली. नंतरचे काही महिने विविध मीडियामध्ये तिचे छापून आलेले फोटो पाहून विशू व माझ्यातली भांडणे वाढत गेली. अमिताशी संवाद साधणे दोघांनाही जमले नाही. पतंगाचा दोरा कापला गेल्यावर तो जसा भरकटतो तशी ती पाहता पाहता भरकटली आणि एका दिवशी स्फोट होऊन तिने घर सोडले.

स्वत:च्या कोशात सारे

मित्रांकडून नातेवाईकांकडून अमिता बद्दल अधेमध्ये काही ऐकू येत असे. पण ते सारे समजून न घेण्याइतपत माझी सारासार बुद्धी डिप्रेशनच्या औषधांमुळे झाकोळलेली होती. ज्या अर्थी अमिता पैसे मागत नाही त्या अर्थी तिचे बरे चालले असावे अशी मी भाबडी समजूत करून घेतली होती. फेसबुक व इन्स्टाग्राम वरचे तिचे अनेक फोटो पाहिले तर हीच माझी अमिता का? असा प्रश्न मला कायम पडत असे आणि मी डोळे गच्च मिटून घेत असे. विशू आणि मी या दोघात अमिता हा शब्द सुद्धा उच्चारला जात नव्हता. एकच चांगली गोष्ट म्हणजे तिनेही आडनाव लावणे सोडून दिले होते व ती ‘मितू’ म्हणूनच प्रसिद्ध झाली होती. मॉडेलिंग करण्याकरता अभिनयाची गरज असते हे मला पक्के माहिती होते. पण ते आता तिला पटणे वा सांगणे कोण करणार?

माझी मानसिक स्थिती बरी नाही मी औषधे घेत आहे हे तिच्यापर्यंत पोहोचून सुद्धा तिला कधी माझी दखल घ्यावी असे वाटले नाही. तिचा फोन नंबर माझ्याकडे नसल्यामुळे मनात येऊनही मी तिच्याशी संपर्क साधू शकले नाही. पाहता पाहता अशीच काही वर्षे मध्ये गेली. आणि एके दिवशी एका मराठी मालिकेच्या एका मॉब सीनमध्ये ती मला अचानक समोर दिसली. दोनच मिनिटाचा तो सीन होता. पण त्यात ती चमकली असे मला वाटले. जाहिरातीसाठी गरजेचा असलेला स्पार्क आता तिने अभिनयातून थोडासा कमावला होता असे माझे त्यावेळी मत झाले. त्याहीपेक्षा काहीतरी ती कमवत आहे याचाच मला जास्त आनंद झाला. या साऱ्या निसरडय़ा क्षेत्राची चांगली कल्पना असल्यामुळे यानंतर तिची वाटचाल कुठेतरी स्थिरावेल असे वाटत राहिले.

देवाच्या कृपेने का होईना अमिता आता मराठी मालिका विश्वात तिसऱ्या किंवा चौथ्या दर्जाच्या पण वारंवार लागणाऱ्या भूमिका मध्ये स्थिरावली आहे. टीव्ही वरती ती दिसल्यानंतर रागाने तो चॅनेल बंद करण्याचेही विशूने आता बंद केले आहे. शेवटी मुलगी कुठेही असली तरी सुखा समाधानातच असावी असे आई-बाबांना वाटते ना?