scorecardresearch

Central Bank of India मध्ये बंपर भरती; दरमहा ८०,००० पेक्षा जास्त असेल पगार

Central Bank Of India Jobs: सेंट्रल बँक ऑफ इंडियाने चीफ मैनेजर ग्रेड फोर आणि सीनियर मैनेजर ग्रेड या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. पात्रतेपासून इतर महत्त्वाच्या तपशीलांपर्यंत जाणून घ्या.

central goverment job vacancies
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

Central Bank Of India Recruitment 2023: सेंट्रल बँक ऑफ इंडियाने बँकेत नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी रोजगाराची उत्तम संधी आणली आहे. २५० विविध पदांसाठी रिक्त जागा आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे ते अंतिम तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. हे करण्यासाठी, त्यांना सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला centerbankofindia.co.in भेट द्यावी लागेल. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अर्ज फक्त ऑनलाइन असतील.

रिक्त जागा तपशील

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये एकूण २५० पदांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये चीफ मॅनेजरच्या ५० आणि सीनियर मॅनेजर ग्रेड ३ च्या पदांचा समावेश आहे. या संदर्भात, रिक्त पदांची संख्या कमी किंवा जास्त असू शकते, अशी माहिती नोटीसमध्ये देण्यात आली आहे.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय आहे

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या या पदांसाठी अर्ज २७ जानेवारी २०२३ पासून सुरू झाले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ फेब्रुवारी २०२३ आहे . या पदांवरील निवड लेखी परीक्षेद्वारे होईल. परीक्षेची तारीख अद्याप पूर्णपणे स्पष्ट नाही, परंतु परीक्षा मार्च महिन्यात म्हणजे मार्च २०२३ मध्ये आयोजित केली जाऊ शकते. निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

फी किती आहे

SC, ST, PWD आणि महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांना ८५० रुपये शुल्क भरावे लागेल.

( हे ही वाचा: इंजिनियरिंग उत्तीर्ण तरुणांना नोकरीची मोठी संधी; ५० हजार मिळेल पगार, जाणून घ्या भरतीची प्रक्रिया)

अर्ज कोण करू शकतात

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. यासोबतच त्याला PSU किंवा खाजगी बँकेत अधिकारी म्हणून किमान सात वर्षे काम करण्याचा अनुभव असावा. त्यांच्यासाठी वयोमर्यादा चीफ मॅनेजर पदासाठी ४० वर्षे आणि सिनियर मॅनेजर पदासाठी ३५ वर्षे आहे.

इतका पगार मिळेल

निवड झाल्यावर, चीफ मॅनेजर पदासाठी उमेदवारांना जास्तीत जास्त ८९,८९० रुपये वेतन मिळेल. आणि सिनियर मॅनेजर पदासाठी ७८,२३० इतके वेतन मिळेल.

मराठीतील सर्व करिअर ( Career ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 18:52 IST