scorecardresearch

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत ‘या’ पदांसाठी भरती सुरु, पदानुसार महिना २५ ते ५४ हजारांपर्यंत पगार मिळणार

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

CICR Nagpur Bharti 2023
केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर (Photo : FAcebook, CICR Nagpur)

CICR Nagpur Bharti 2023: केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथे रिसर्च असोसिएट, सीनियर रिसर्च फेलो, कॉम्प्युटर ऑपरेटर, यंग प्रोफेशनल I आणि यंग प्रोफेशनल II या पदांच्या एकूण १९ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मुलाखतीकरिता हजर राहावे लागणार आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर भरती २०२३ साठी आयोजित केलेल्या मुलाखतीची तारीख, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर</strong> भरती २०२३ –

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान

पदाचे नाव – रिसर्च असोसिएट, सीनियर रिसर्च फेलो, कॉम्प्युटर ऑपरेटर, यंग प्रोफेशनल I आणि यंग प्रोफेशनल II

एकूण पदसंख्या – १९

नोकरी ठिकाण – नागपूर

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता – ICAR – केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या संस्था, हिंदुस्तान एलपीजी डेपोट जवळ, पांजरी, वर्धा रोड, नागपूर

मुलाखतीची तारीख – २६ व २७ सप्टेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट : http://www.cicr.org.in

हेही वाचा- ITI पास उमेदवारांना NFC मध्ये नोकरीची मोठी संधी! विविध पदांच्या २०६ जागांसाठी भरती सुरु, अर्जाची पद्धत जाणून घ्या

शैक्षणिक पात्रता –

  • रिसर्च असोसिएट – Ph.D in Agreiculture
  • सीनियर रिसर्च फेलो – M.Sc Agriculture
  • कॉम्प्युटर ऑपरेटर – BCA/MCA
  • यंग प्रोफेशनल I – B.Sc Agriculture, B.Com/BBA
  • यंग प्रोफेशनल II – पदवीधर

पगार –

  • रिसर्च असोसिएट – ४९ हजार ते ५४ हजार.
  • सीनियर रिसर्च फेलो – ३१ हजार.
  • कॉम्प्युटर ऑपरेटर – २६ हजार.
  • यंग प्रोफेशनल I – २५ हजार.
  • यंग प्रोफेशनल II – ३५ हजार.

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1R6BCGtCz4nYs-jqib0ufLGIKHcBAvMgk/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-09-2023 at 09:13 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×