मॅनेजमेंट ट्रेनी पदे कोल इंडिया लिमिटेड (CIL)मध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी ई-१ ग्रेड’ पदांची भरती. एकूण रिक्त पदे – ६६०.

डिसिप्लिननुसार रिक्त पदांचा तपशील –

(१) सिव्हील इंजिनीअरिंग – १७८ पदे (अजा – २६, अज – १५, इमाव – ४८, ईडब्ल्यूएस – १७, खुला – ७२) (१५ पदे अपंग कॅटेगरी HH – ६, OH – ३, SLD/MD – ६ साठी राखीव)).

(२) मेकॅनिकल इंजिनीअरिंग – १४५ पदे (अजा – २१, अज – १०, इमाव – ३९, ईडब्ल्यूएस – १४, खुला – ६१) (७ पदे अपंग कॅटेगरी HH – ३, OH – २, SLD/MD – २ साठी राखीव)).

(३) इलेक्ट्रिकल (इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग) – २२१ पदे (अजा – ३३, अज – १६, इमाव – ५९, ईडब्ल्यूएस – २२, खुला – ९१) (१६ पदे अपंग कॅटेगरी HH – ७, OH – ३, SLD/MD – ६ साठी राखीव)).

(४) सिस्टीम (कॉम्प्युटर सायन्स/आयटी/MCA) – ४३ पदे (अजा – ६, अज – ३, इमाव – ११, ईडब्ल्यूएस – ४, खुला – १९) (१९ पदे अपंग कॅटेगरी LV – १५, HH – ३, OH – १ साठी पदे राखीव)).

(५) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन – ३८ पदे (अजा – ५, अज – २, इमाव – १०, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १८) (५ पदे अपंग कॅटेगरी HH – ३, SLD/MD – २ साठी पदे राखीव)).

(६) इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग – ११ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ४, खुला – ४).

पद क्र. १ ते ६ साठी पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी B.E./B.Tech. किमान सरासरी ६०टक्के गुण (अजा/अज/ अपंगांसाठी ५५टक्के गुण).

(७) जीऑलॉजी – १५ पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ७).

पात्रता – ६०टक्के गुणांसह एम.एससी./एम.टेक. (जीऑलॉजी/अॅप्लाईड जीऑलॉजी/जीओफिजिक्स/अॅप्लाईड जीओफिजिक्स).

(८) राजभाषा (हिंदी) – ५ पदे (अज – १, इमाव – १, खुला – ३) (१ पद अपंग कॅटेगरी LV साठी राखीव).

पात्रता – एम.ए. (हिंदी)

(९) कंपनी सेक्रेटरी – ४ पदे (अजा – १, खुला – ३).

पात्रता – पदवी (कोणतीही शाखा) आणि कंपनी सेक्रेटरी (अनुभवी उमेदवारांना प्राधान्य).

वयोमर्यादा – ( ३० एप्रिल २०२६ रोजी) ३० वर्षे (इमाव – ३३ वर्षे, अजा/अज – ३५ वर्षे, अपंग – ४०/४३/४५ वर्षे).

निवड पद्धती – कॉम्प्युटर बेस्ड् ऑनलाइन टेस्ट, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीसाठी ई-मेल द्वारे आणि CIL च्या वेबसाईटवरसूचित केले जाईल. निवडलेल्या उमेदवारांची अंतिम यादी सीबीटीमधील गुणवत्तेनुसार बनविली जाईल, जी CIL वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.

अर्जाचे शुल्क – रु. १,०००/- जीएसटी रु. १८०/- असे एकूण १,१८०/-.

वेतन – निवडलेल्या उमेदवारांना मॅनेजमेंट ट्रेनी E-१ ग्रेड (वेतन श्रेणी ६०,००० – १,८०,०००) मधील मूळ वेतन रु. ६०,०००/- वर ट्रेनिंग दरम्यान नेमणूक दिली जाईल. १ वर्षाचे ट्रेनिंग कम प्रोबेशन यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर त्यांना E-१ ग्रेडवर संबंधित डिसिप्लिनमधील ऑफिसर पदावर सामावून घेतले जाईल.

नोकरीचे ठिकाण – देशभरातील CIL कंपनी आणि CIL च्या उपकंपनीमध्ये नेमणूक दिली जाईल. ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या पसंतीच्या ३ पोस्टींग्जसाठी पसंतीक्रम द्यावयाचा आहे.

शंकासमाधानासाठी उमेदवारांनी CIL वेबसाईटवरील Frequently Asked Questions (FAQs) सेक्शनला भेट द्यावी.

ऑनलाइन अर्ज http://www.coalindia.in या संकेतस्थळावर ११ जून २०२६ (१८.०० वाजे)पर्यंत करावेत.