दीर्घकालीन करिअरचा विचार करायचा तर त्यातून कामाचं समाधान मिळायला हवं. मला समाजात मिसळायला आवडतं, सार्वजनिक धोरणं मी चांगल्या प्रकारे राबवू शकेन आणि आवडीने त्यात काम करू शकेन याची खात्री पटल्यावर मग मी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला….सांगताहेत जम्मूकाश्मीरमध्ये दीर्घ प्रशासकीय सेवेचा अनुभव आणिसध्या दीवदमणमध्ये सचिवपदी असलेले डॉ. सागर डोईफोडे.

मी मूळचा पुण्याचा. जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात लाकडी निंबोडी माझं गाव. शिकण्यासाठी मी पुण्यातच होतो. डॉ. डी. वाय. पाटील वैद्याकीय महाविद्यालयात मी डेंटल सर्जरीत पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर यूपीएससी करताना मी पॉलिटिकल सायन्समध्ये एम.ए. एम.फिल केलं. माझं स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचं कारण म्हणजे स्वत:बद्दलची माझी ओळख वा समज. विद्यार्थिदशेत आपण जेव्हा करिअर प्लानिंग करत असतो, तेव्हा आपल्याला कोणती गोष्ट आयुष्यभर करायला आवडेल हा विचार महत्त्वाचा असतो. मी डॉक्टर व्हायचं हे आईचं स्वप्न होतं. पण दीर्घकालीन करिअरचा विचार करायचा तर त्यातून कामाचं समाधान मिळायला हवं. मला समाजात मिसळायला आवडतं, सार्वजनिक धोरणं मी चांगल्या प्रकारे राबवू शकेन आणि आवडीने त्यात काम करू शकेन याची खात्री पटल्यावर मग मी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि ज्ञानप्रबोधिनी, पुणे येथून तयारीला सुरुवात केली. भूगोल आणि पॉलिटिकल सायन्स असे दोन विषय मी घेतले.

Entrance Exam JEE Mains Exam for Engineering Architecture career news
प्रवेशाची पायरी: इंजिनीअरिंग, आर्किटेक्चरसाठी जेईई मेन्स परीक्षा
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
sharad pawar retirement (1)
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
What Poona Mahajan Said About Uddhav Thackeray ?
Poonam Mahajan : “लोकसभेला तिकिट कापण्यात आलं तेव्हा उद्धव ठाकरेंनी…”, पूनम महाजन काय म्हणाल्या?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

अवघ्या एका गुणाने पहिली संधी हुकली…

२०१४ बॅचचा. त्याआधी २०१२ मध्ये माझी सीआयएसएफमध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून निवड झाली. यूपीएससीला मला चार प्रयत्न करावे लागले. पहिल्याच प्रयत्नात मी जोमाने प्रयत्न केल्यामुळे पूर्व, मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीपर्यंत मजल मारली. मुलाखतीतही त्यावेळचे राज्यातले सर्वाधिक गुणांपैकी समजले जाणारे ३०० पैकी २१० गुण होते. पण मुख्यचा स्कोअर हवा तसा नसल्याने माझं मेरिट केवळ एका गुणाने हुकली. ११११ ला मेरिट बंद झाली आणि मला १११० गुण होते. खूप चुकचुकायला झालं तेव्हा पण मी आता म्हणतो की जे झालं ते योग्य झालं. कधीकधी आयुष्यात आपल्याला मनासारखं काही मिळालं नाही तर नक्की काहीतरी चांगलं तुमच्यासाठी ठेवलेलं असतं. मला चार वर्षं लागली पण कदाचित काहीतरी शिकायचं राहिलं होतं म्हणून तितका काळ लागला असं मी समजतो. शालेय जीवनापासून पदवीपर्यंत माझं एकही वर्ष वाया गेलं नव्हतं. मला शाळेतही लवकर घातलं होतं. मी काळाच्या पुढे होतो. पण यूपीएससीसाठी मला प्रतीक्षा करावी लागली. काही गोष्टी शिकण्याच्या राहून गेल्या की तुम्हाला तेवढा काळ द्यावा लागतो, असं मला वाटतं.

आत्मविश्वासाची कसोटी

पहिल्या प्रयत्नात यश मिळालं नाही हे माझ्यासाठी धक्कादायक होतं कारण मी केवळ उत्तीर्ण नाही तर चांगला रँक मिळवेन अशी मला खात्री होती. माझ्यापेक्षा सहअध्यायी मित्रांना जास्त खात्री होती. दुसऱ्या प्रयत्नात १७ मार्कांनी मेरिट हुकली. तिसऱ्या प्रयत्नात माझी मुख्य परीक्षाच क्लिअर झाली नाही. मी प्रगतीऐवजी अधोगतीकडे निघालो होतो. शिवाय मुख्य परीक्षा का क्लिअर झाली नाही त्याचं कारण पण विचित्र होतं. मराठीचा पेपर केवळ क्वालिफाइंग असतो, त्याचे गुण ग्राह्य धरत नाहीत. पण मी मातृभाषा मराठी असूनही त्यात पात्र झालो नाही. तिथे माझा आत्मविश्वास ढळला. आधीच्या दोन प्रयत्नात मी आशा सोडली नव्हती. पण तिसऱ्या प्रयत्नात जे झालं तिथे माझी आशा संपली. आयएएस तर राहूच द्या कोणतंही पद मिळणार नाही असं चित्र दिसू लागलं. खरं तर ती माझी खरी परीक्षा होती. प्रयत्न सोडून द्यायचा विचार केला. तोपर्यंत सर्व मित्रही परीक्षा उत्तीर्ण झाले होते. माझ्यासमोर काही भविष्यच दिसत नव्हतं. तो माझ्यासाठी जीवनमरणाचा प्रश्न होता. आईने प्रोत्साहन दिलं. इथपर्यंत येऊन हार मानू नकोस असं सांगितलं. मग मी सीएपीएफची असिस्टंट कमांडंट परीक्षा दिली. यूपीएससीच्या तयारीमुळे ती लेखी परीक्षा मला कठीण नव्हती. पण तिथे एक समस्या होती ती शारीरिक चाचणीची.

असाध्य ते साध्य…

यूपीएससीची तयारी करत असताना मी मेडिटेशन करत असतो तरी माझा शारीरिक फिटनेस नव्हता. वजन ८६ किलोंपर्यंत गेलं होतं. परीक्षेसाठी वजनात पात्र होण्यासाठी मला ६६ किलोपर्यंत वजन आणायचं होतं. म्हणजे तब्बल २० किलो वजन घटवायचं होतं आणि तेही अवघ्या अडीच महिन्यांमध्ये.

मी कित्येक न्यूट्रिशनिस्टचा सल्ला घेतला. अडीच महिन्यांमध्ये २० किलो वजन घटवणं अशक्य असल्याचं सर्वांनी सांगितलं. मला आता ही परीक्षादेखील अयशस्वी होतेय की काय अशी भीती वाटू लागली. पण दृढनिश्चय केल्यावर असाध्य गोष्टही साध्य होते. मी माझा स्वत:चाच एक डाएट प्लान बनवला, वर्कआऊट प्लान बनवला आणि अडीच महिन्यात माझं वजन ६६ नव्हे तर ६४ किलोंवर आलं. शारीरिक चाचणी तर यशस्वीपणे पार पडलीच, पण भारतात मी १२ व्या रँकला आलो. राज्यातून तेव्हा ही परीक्षा फारजण देतही नव्हते. मग आम्ही पुढील वर्षीपासून मुलांना ही परीक्षा देण्याचे प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. तेव्हा महाराष्ट्रातली मुलं या परीक्षेकडे वळत नव्हते. आता मोठ्या संख्येने ही परीक्षा देतात.

निरपेक्ष भावनेनं केलेला प्रयत्न फळाला

सीएपीएफ कमांडंट झालो. आता हाताशी शासकीय नोकरी होती. आता हेच पूर्ण करायचं, क्लास वन पोस्ट आहे. मी आनंदी होतो. पण आता एक प्रयत्न शिल्लक होता, तो देऊन बघू अशा विचाराने मी एक औपचारिकता म्हणून आणि अतिशय निरपेक्ष भावनेनं परीक्षा दिली आणि त्यात मी सिलेक्ट झालो. मला जम्मू-काश्मीर केडर मिळालं. नंतर जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे आमचं एजीएमयूटी (अॅगमूट) केडर झालं. आता याच केडरमध्ये दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशात फॉरेस्ट, अॅग्रीकल्चर, स्पोर्ट्स, सोशल वेल्फेअर अशा विभागांच्या मी सचिवपदी आहे.

प्लान बी हवाच

सुरुवात करतानाच खूप विचारपूर्वक धोरणात्मक पद्धतीने (स्ट्रॅटेजाइज) करायला हवी. ही परीक्षा कोणीही देऊ शकतो. तुम्ही पॅशनेटली प्रयत्न केला तर परीक्षा यशस्वी होऊ शकता. प्लान बी मात्र तुमच्याकडे तयार हवा. कारण येथे स्पर्धा खूप आहे. आणि कोणत्याही टप्प्यावर तुम्ही स्पर्धेबाहेर फेकले जाऊ शकता. नागरी सेवा करण्याची तुमची खूप दुर्दम्य इच्छा असेल, तुम्हाला सामाजिक सेवेचा ध्यास असेल तरच या असा मी सल्ला देईन. मुलांना पालक ते आयुष्यात सेट होतील, अशा विचाराने नागरी सेवेच्या तयारीला पाठवतात. पण ते चुकीचं आहे. तसा सेटल होण्याचा विचार केला तर अनेक खासगी क्षेत्रातही संधी आहेत. म्हणूनच तुम्हाला खरेच नागरी सेवेची आवड असेल तर तुम्ही यूपीएससी द्यायला हवी. नागरी सेवेला जीवन-मरणाचा प्रश्न करू नका, हे मी माझ्या अनुभवाने सांगेन.

स्मार्ट वर्क प्लस हार्ड वर्क

अभ्यासाचे काटेकोर नियोजन आणि धोरण हवे. फक्त पुस्तकं घेतली आणि वाचायला सुरुवात केली तर नागरी परीक्षेचा अभ्यास होत नाही. काय नाही वाचायचं हेही कळलं पाहिजे. स्मार्ट वर्क प्लस हार्ड वर्क तसेच सातत्य हवे. सतत वर्षभर दहा तास अभ्यास. चांगली दिनचर्या. परीक्षेच्या वेळी स्ट्रॅटेजी महत्त्वाची. परीक्षा समजून घेणं महत्त्वाचं असतं. परीक्षेच्या प्रकारानुसार काय आवश्यकता आहे. अभ्यासासोबत ताणतणावांना सामोरे जाण्यासाठी ध्यानधारणाही करायला हवी. सेल्फ इंटरोगेशन हवं. अनेक प्रश्नांची उत्तरं बाहेर मिळत नाहीत, ती आपल्या स्वत:मध्ये दडलेली असतात.

प्रशासनात काम करत असतानाही ताणतणाव, आव्हाने संपत नसतात. त्यासाठी तुम्हाला तयार व्हावंच लागतं. तुम्ही समोरच्या घटनेला प्रतिसाद कसा देता त्यावरही गोष्टी अवलंबून असतात. नागरी सेवेची तयारी करताना तुम्ही या सर्वांसाठी बऱ्यापैकी प्रगल्भ होता. भावनिक होऊ नका असा सल्ला अनेकजण देतात. पण मी तर म्हणेन की तुम्ही भावनिक होऊन पाहिलं तर उलट तुम्ही रिस्पॉन्सिव्ह होता.

अनुभवांची शिदोरी

२०१६ ला जम्मू काश्मीरमध्ये उरी हल्ला झाला होता. आणि त्यानंतर लगेचच माझी पहिली पोस्टिंग उरीमध्ये प्रांताधिकारी झालो. मला डिसेंबर, जानेवारीत कडाक्याच्या थंडीत जॉइनिंग करायचं होतं. पहिला दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. बर्फाळ वाटेवारून जाताना मला असा विचार येत होता की काश्मीर स्वर्ग आहे पण स्वर्गात येण्यासाठी तुम्हाला मरावं लागतं. सगळीकडे धुकं, बर्फ, निष्पर्ण वृक्ष बघून त्या रात्री मला तेथून निघून जाण्याचा विचार सातत्याने येत होता. पण मला केवळ आणि केवळ त्या रात्रीच ही सर्व भावना होती. दुसऱ्या दिवशी सकाळपासून ज्या पद्धतीने जम्मू-काश्मीरमध्ये मला प्रेम मिळालं, कामाचा आनंद मिळाला. पुढील १० वर्षे अनेक संवेदनशील भागात मी काम केलं. भारत-पाकिस्तान व्यापार मोहिमेचे काम सुमारे दीड वर्षे मी सांभाळले. नार्कोटिक्स विभागामध्ये काम केले. श्रीनगरचा अतिरिक्त महासंचालक होतो. दोडाचा जिल्हाधिकारी म्हणून काम केलं. कलम ३७० हटवतानाच्या परिस्थिती वेळी, कोविड १९ च्या वेळी मी जम्मू-काश्मीरमध्येच होतो. अखेरच्या पोस्टिंगच्या वेळी कुपवाडा जिल्ह्यात होतो. कुपवाड्यात जिल्हाधिकारी असताना मी शिक्षण क्षेत्रात १५०० शाळांवर काम केले. हा कोणताही सरकारी कार्यक्रमाचा भाग नव्हता. भारतातल्या चांगल्या स्वयंसेवी संस्थांना हाताशी घेऊन एक कार्यक्रम तयार केला. त्याला निधीही नव्हता. सहा महिने या कार्यक्रमामुळे शाळांमध्ये आमूलाग्र बदल झाले. शाळांसाठी १००च्या आसपास निकष आम्ही तयार केले होते. या सर्व अनुभवांची मोठी शिदोरी जमा झाली जी मला आयुष्यभर पुरणार आहे.

शब्दांकन : मनीषा देवणे

Story img Loader