scorecardresearch

Cochin Shipyard Recruitment 2024: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महिन्याचा पगार लाखाच्या घरात, वयोमर्यादा किती? वाचा सविस्तर

Cochin Shipyard Recruitment 2024: कोचीन शिपयार्ड भरती २०२४ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या

Cochin Shipyard Recruitment 2024
कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती (फोटो सौजन्य -cochinshipyard )

Cochin Shipyard Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी म्हणावी लागणार आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) अंतर्गत भरती केली जाणार आहे. यासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशिक करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि अर्ज फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

कोणत्या पदांसाठी भरती?

Narayan Range Manoj Jarange
“इथून पुढे धुवून काढेन”, नारायण राणेंच्या ‘त्या’ टीकेला मनोज जरांगेंचं उत्तर; निलेश राणेंना म्हणाले, “तुमच्या वडिलांना…”
Pune jobs 2024 DIAT Pune Bharti
DIAT Pune recruitment 2024 : पुणे शहरात नोकरीच्या संधी उपलब्ध; ‘या’ रिक्त पदांवर भरती सुरू…
India Post Jobs 2024 Bumper Recruitment
१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात बंपर भरती! थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी, ना परीक्षा ना मुलाखत
Ministry of Defense recruitment 2024 how to apply
MOD recruitment 2024 : संरक्षण मंत्रालय मुंबई येथे विविध पदांवर भरती सुरु; अर्जासाठी पात्रता निकष पाहा
 • कोचीन शिपयार्ड २०२४ ही भरती सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक अभियंता आणि लेखापाल या पदांसाठी होत आहे.

वयोमर्यादा –

 • कोचीन शिपयार्ड २०२४ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे

महत्वाच्या तारखा –

 • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ७ फेब्रुवारी २०२४
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ मार्च २०२४

Cochin Shipyard Recruitment 2024: अर्ज कसा करावा

 • उमेदवारांनी CSL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
 • पेजवर उपलब्ध नोंदणी लिंकवर क्लिक करा.
 • मुख्यपृष्ठावर जा आणि “ऑनलाइन अर्जावर क्लिक करा.
 • सूचना काळजीपूर्वक वाचा.
 • अर्ज भरा आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कागदपत्रे अपलोड करा.
 • पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.

हेही वाचा >> १०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात बंपर भरती! थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी, ना परीक्षा ना मुलाखत

Cochin Shipyard Recruitment 2024: परीक्षा शुल्क

 • या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ४०० रूपये फिस ही लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि तिथूनच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागेल.

Cochin Shipyard Recruitment 2024: वेतन –

 • कोचीन शिपयार्ड भरती २०२४ साठी निवडलेल्या उमेदवारांना रु.११०००० पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Csl recruitment 2024 salary up to rs 110000 check vacancies posts age qualification and other vital details srk

First published on: 12-02-2024 at 11:30 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×