कोणत्याही क्षेत्रात निर्णय, नियोजन आणि अंमलबजावणी याची सांगड घालता आली पाहिजे, तेव्हाच तुमच्यातील कौशल्य हे समोरच्याला दिसू शकेल. निर्णय, नियोजन आणि अंमलबजावणी हे तीन घटक कौशल्य विकासाची त्रिसूत्री आहे. अनेकदा तुमच्या समोर दोन पर्याय उपलब्ध असतात. परंतु, त्या दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडण्यापेक्षा तुम्हाला त्यातून तिसरा पर्याय शोधता आला पाहिजे.

विद्यार्थी जेव्हा करिअर निवडत असतात तेव्हा त्या क्षेत्रात अधिक पैसा आहे किंवा त्या उद्याोगात असणारे काम हे चांगले आहे, असा विचार करून क्षेत्राची निवड करतात, हे चुकीचे आहे. एखादा व्यक्ती यूट्यूबर झाला म्हणून मी देखील यूट्यूबर होऊ शकतो, अशा पद्धतीने विचार करून निर्णय घेणे चुकीचे आहे. म्हणजेच एकाने कुणीतरी हे केले म्हणून मी पण ते करू शकतो या उद्देशाने विद्यार्थ्यांनी क्षेत्र निवडू नये.

जेव्हा विद्यार्थ्यांना एखाद्या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा असतो तेव्हा प्रवेश परीक्षा घेण्यात येते. ती प्रवेश परीक्षा ही प्रामुख्याने गणित आणि इंग्रजी भाषेवर आधारलेली असते. म्हणजेच क्षेत्र निवडतानाचे पहिले महत्त्वाचे विषय हे गणित आणि भाषा या विषयावर आधारलेले आहेत. त्यामुळे क्षेत्र निवडत असताना तुम्हाला कोणत्या विषयात आवड आहे, त्याच्या आधारावर पुढचे क्षेत्र निवडायचे. त्यानुसार आपली दिशा ठरावावी.

हेही वाचा >>> डिजिटल क्षेत्रात आत्मविश्वास महत्त्वाचा – केतन जोशी

सगळ्यात सोपे करिअर आणि पैसे मिळवून देणार करिअर कोणते हा प्रश्न नेहमी विचारला जातो. कोणत्याही विद्यार्थ्यासाठी सोपा मार्ग नाही. ज्याप्रमाणे हिरा तयार होत असताना त्यावर अनेक कठीण प्रक्रिया केल्या जात असतात त्यातून हिऱ्याची निर्मिती होते, तेच करिअर बाबत होत असते. त्यामुळे करिअरमध्ये सोपा मार्ग नाही.

प्रत्येक व्यक्तीमध्ये जडत्व असते. ते जडत्व तुम्हाला काहीही करू देत नाही. जितके जास्त जडत्व तितका जास्त आळस येतो. मग तो आळस घालवण्यासाठी बाह्य दबाव येण्यास सुरुवात होते. तो बाह्य दबाव देणारे आई-वडील असतात. विद्यार्थ्याला करिअर करताना संस्था (इन्स्टिट्यूट) ही महत्त्वाची असते. कारण तर तेथे स्पर्धा असते. त्या स्पर्धेमुळे शिस्त लागते. त्याचप्रमाणे जर विद्यार्थ्यांनी ठरवले की मला दिवसातून इतके तास अभ्यास करायचा आहे, तर कोणत्याही दबावाशिवाय दररोज अभ्यास ठरवलेल्या वेळात अभ्यास करता यायला हवा. यासाठी शिस्त महत्त्वाची आहे. तसेच जे विषय तुम्हाला आवडतात, जे उद्याोग क्षेत्र तुम्हाला आवडते त्यात करिअर करत असताना त्यात काही कौशल्य असतात. ती कौशल्य सरावाने विकसित होणार आहेत. त्यामुळे त्यांचा सराव करणे महत्त्वाचे आहे. आरोग्य आणि संपत्तीसाठी आपण शिक्षण घेत असतो. पण पैसा हा सगळीकडे आहे. त्यामुळे काहीतरी तयार करण्याची क्षमता तुमच्यातच असायला हवी.

मुख्य प्रायोजक : आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड

सहप्रायोजक : सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी, द सिव्हिलियन अकॅडमी, संकल्प आय ए एस फोरम, डी वाय पाटील युनिव्हर्सिटी, सिंहगड इन्स्टिट्यूट्स

बँकिंग पार्टनर : युनियन बँक ऑफ इंडिया

●पॉवर्ड बाय : ज्ञानदीप अकॅडमी फॉर यू.पी.एस.सी. अँड एम.पी.एस.सी., पुणे, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, एस आर एम युनिव्हर्सिटी, एपी, मंथन आर्ट स्कूल, आदित्य स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट

आपल्या प्रतिक्रियांसाठी आमचा ई-पत्ता : careerloksatta@gmail.com