Government Jobs After 12th : सरकारी नोकरी मिळावी, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. अनेक जण पदवीधर झाल्यानंतर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात पण तुम्हाला माहिती आहे. तुम्ही बारावीनंतर सरकारी नोकरीसाठी परीक्षा देऊ शकता. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी बारावीनंतर विद्यार्थी कोणत्या स्पर्धा परीक्षा देऊ शकतात, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

एसएससी सीएचएसएल परीक्षा (SSC CHSL Exam)

एसएससी सीएचएसएल परीक्षा (SSC CHSL Exam) स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे केंद्र सरकारच्या विविध विभाग आणि संस्थांमध्ये उमेदवारांची भरती करण्यासाठी घेतली जाते.

guidance from ifs officer anand reddy for career planning anand reddy preparation for upsc
माझी स्पर्धा परीक्षा : पदवी अभ्यासक्रम संपताना  स्पर्धा परीक्षेची तयारी करणे योग्य
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
tiss Bans students participation in anti establishment unpatriotic discussions
राजकीय चर्चा, आंदोलने यांत सहभागी होण्यास टीसच्या विद्यार्थ्यांना मनाई; ‘टीस’कडून विद्यार्थ्यांसाठीच्या नियमावलीमध्ये बदल
seven standard girl molested by teacher in school
सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीला अश्लील चित्रीकरण दाखविल्याप्रकरणी शिक्षक अटकेत
Monthly scholarship on behalf of Barty to promote research scholarship of Scheduled Caste students
५९ दिवसांचे आंदोलन, सरकार नरमले, १०० टक्के अधिछात्रवृत्ती
college boy died in swimming competition
जलतरण स्पर्धेवेळी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू शार्दुल पोळ मूळ पुण्याचा रहिवासी
Vasai, complaint boxes, Vasai Schools,
वसई : शाळा महाविद्यालयांची उदासीनता, तक्रार पेट्या बसविण्याचा निर्णय कागदावरच
student protest in pune
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुण्यात ठिय्या आंदोलन; नेमकं कारण काय?

भारतीय सैन्य भरती परीक्षा ((Indian Army Recruitment Exams)

भारतीय लष्कर सैनिक, तांत्रिक पदे इत्यादी अनेक पदांवर उमेदवारांना नेमण्यासाठी भरती परीक्षा घेतात. या परीक्षा पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवारांसाठी घेतल्या जातात.

भारतीय हवाई दलाच्या परीक्षा (Indian Air Force Exams)

भारतीय हवाई दल गट X (तांत्रिक), गट Y (नॉन-टेक्निकल), आणि एअरमेन यांसारख्या पदांवर उमेदवार नेमण्यासाठी परीक्षा घेतात. 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार भारतीय हवाई दलाच्या ग्रुप X आणि ग्रुप Y च्या परीक्षेला बसू शकतात.

हेही वाचा : SBI Recruitment For Sportspersons: बँकेत खेळाडूंसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ६४ हजार रुपयांपर्यंत पगार; ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज

रेल्वे आरआरबी परीक्षा (Railway RRB Exams)

भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांवर उमेदवार नेमण्यासाठी ही परीक्षा RRB (Railway Recruitment Board) घेतात. यामध्ये कनिष्ठ अभियंता, नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (NTPC), ग्रुप डी इत्यादी अनेक पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात.

भारतीय नौदलाच्या परीक्षा (Indian Navy Exams)

भारतीय नौदल सेलर, आर्टिफिसर अप्रेंटिस आणि सिनिअर सेकंडरी (SSR) सारख्या विविध पदांसाठी भरती परीक्षा घेतात. १२वी उत्तीर्ण उमेदवार भारतीय नौदलाच्या SSR या परीक्षेला बसू शकतात

इंटेलिजन्स ब्युरो सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी परीक्षा (IB Security Assistant/Executive Examination)

ही परीक्षा इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी पदाच्या भरतीसाठी घेतली जाते.

हेही वाचा : Success Story: कर्करोगाने झाले वडिलांचे निधन; हार न मानता UPSC क्रॅक करून बनले IAS ऑफिसर; पाहा त्यांचा प्रेरणादायी प्रवास

सीआरपीएफ कॉन्स्टेबल (जीडी) परीक्षा (CRPF Constable (GD) Examination)

ही परीक्षा केंद्रीय राखीव पोलीस दलात कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदासाठी घेतली जाते.

बीएसएफ कॉन्स्टेबल (जीडी) परीक्षा (BSF Constable (GD) Examination)

सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदासाठी घेतली जाते.

एसएसबी कॉन्स्टेबल (जीडी) परीक्षा (SSB Constable (GD) Examination)

ही परीक्षा सशस्त्र सीमा दल मध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदासाठी घेतली जाते.