scorecardresearch

DRDO पुणे येथे नोकरीची मोठी संधी! ‘या’ १०० पदांसाठी भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर

DRDO ARDE Pune 2023: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे येथे १०० जागांसाठीची भरती जाहीर.

ARDE Pune 2023
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था. (Photo : DRDO, Wikipedia)

ARDE Pune 2023: DRDO ARDE पुणे म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना येथे ITI, पदवीधर आणि पदविका धारक शिकाऊ पदांसाठीच्या काही रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांना https://www.drdo.gov.in/ या वेबसाइटद्वारे अर्ज सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. DRDO ARDE Pune (DRDO – शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना) भरती मंडळ, पुणे द्वारे २०२३ च्या जाहिरातीत एकूण १०० रिक्त पदांची घोषणा केली असून या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव –

  • पदवीधर अभियंता अप्रेंटिस
  • डिप्लोमा अप्रेंटिस
  • ITI अप्रेंटिस

एकूण पद संख्या – १००

हेही वाचा- NTPCमध्ये ‘या’ पदावर ३० जागांसाठी भरती जाहीर! प्रति महिना ३० हजार पगार, जाणून घ्या कसा पाठवावा अर्ज

वयमर्यादा – १८ ते २७ वर्षांपर्यंत.

अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

अर्जाची करण्याची पद्धत – ऑनलाइन

हेही वाचा- ‘या’ बॅंकेत १००० हून अधिक पदांची बंपर भरती, पदवीधारकांना नोकरीची मोठी संधी; आजच अर्ज करा

नोकरी ठिकाण – पुणे</p>

महत्त्वाच्या तारखा –

  • नोंदणी प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख – २० मे २०२३
  • नोंदणी करण्याची अंतिम तारीख – ३० मे २०२३

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-05-2023 at 10:20 IST

संबंधित बातम्या