सुहास पाटील

डॉकयार्ड ॲप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड, मुंबई – ४०० ०२३. किमान ८ वी/१० वी/आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना ॲप्रेंटिसेस ॲक्ट १९६१ अंतर्गत जुलै २०२४ पासून सुरू होणाऱ्या ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंग ( Designated Trades IT-२६) करिता प्रवेश. एकूण प्रवेश – ३०१. उमेदवारांना नियमानुसार दरमहा स्टायपेंड दिले जाईल.

Indian entrepreneurs prerna jhunjhunwala
सिंगापूरमध्ये उभारली शाळा, सुरू केला ‘३३० कोटी’ रुपयांचा स्टार्टअप! जाणून घ्या कोण आहे ही भारतीय इंटरप्रेन्योर?
trouble in CET exam due to server down
मुंबई : सर्व्हर डाऊन झाल्याने सीईटी परीक्षेत गोंधळ
career
शिक्षणाची संधी: आयआयटी, मद्रासमधील ऑनलाइन कोर्सेस
A hilarious answer written by a 5th student
विद्यार्थी जोमात, शिक्षक कोमात! पाचवीतल्या विद्यार्थ्याने लिहिलं हटके उत्तर; उत्तरपत्रिका वाचून येईल हसू
Gujarat student gets 212 out of 200 in primary exam
गुजरातमधील प्राथमिक शाळेच्या निकालात मास्तरांचा प्रताप; विद्यार्थ्याला २०० पैकी २१२ गुण; उत्तरपत्रिका पाहून व्हाल लोटपोट
NEET UG Exam, National Testing Agency, NEET UG Exam 2024, National Testing Agency Instructions, Admit Card Requirements, Exam Center Entry, students, neet students, college students, neet exam news, marathi news,
…तर नीटच्या परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही, ही खबरदारी घ्या
jobs
नोकरीची संधी
tiss marathi news, tata institute of social sciences marathi news
लोकसभा निवडणूक होईपर्यंत संकुलात आंदोलन, मोर्चा, कार्यक्रमास बंदी; ‘टिस’कडून परिपत्रकाद्वारे नियमावली जाहीर

( I) १ वर्ष कालावधीची ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंग –

(१) इलेक्ट्रिशियन – ४० पदे (अजा – ४, अज – ४, इमाव – ८, खुला – २४). (२) इलेक्ट्रोप्लेटर – १ पद (खुला). (३) फिटर – ५० पदे (अजा – ५, अज – ५, इमाव – १०, खुला – ३०). (४) फाऊन्ड्री मॅन – १ पद (खुला). (५) मेकॅनिक डिझेल – ३५ पदे (अजा – ४, अज – ३, इमाव – ७, खुला – २१). (६) इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक – ७ पदे (अजा – १, अज – १, इमाव – १, खुला – ४). (७) मशिनिस्ट – १३ पदे (अजा – १, अज – १, इमाव – ३, खुला – ८). (८) MMTM – १३ पदे (अजा – १, अज – १, इमाव – ३, खुला – ८).

(९) पेंटर (जनरल) – ९ पदे (अजा – १, अज – १, इमाव – २, खुला – ५). (१०) पॅटर्न मेकर (कारपेंटर) – २ पदे (खुला). (११) पाईप फिटर (प्लंबर) – १३ पदे (अजा – १, अज – १, इमाव – ३, खुला – ८). (१२) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – २६ पदे (अजा – ३, अज – २, इमाव – ५, खुला – १६). (१३) मेकॅनिक रेफ्रिजरेटर अॅण्ड एसी – ७ पदे (अजा – १, अज – १, इमाव – १, खुला – ४). (१४) शीट मेटल वर्कर – ३ पदे (खुला). (१५) शिपराईट (वुड) (कारपेंटर) – १८ पदे (अजा – २, अज – २, इमाव – ३, खुला – ११). (१६) टेलर (जनरल) – ३ पदे (खुला).

(१७) वेल्डर (जी ॲण्ड ई) – २० पदे (अजा – २, अज – २, इमाव – ४, खुला – १२). (१८) मेसॉन (बीसी) – ८ पदे (अजा – १, अज – १, इमाव – २, खुला – ४). (१९) I & CTSM ( IT & ESM) – ३ पदे. (२०) शिपराईट (स्टील) (फिटर) – १६ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ३, खुला – १०).

१ ते २० पदांसाठी पात्रता – १० वी आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.

( II) २ वर्षं कालावधीची ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंग –

(२१) रिग्गर (फ्रेशर कॅटेगरी) – १२ पदे (अजा – १, अज – १, इमाव – २, खुला – ८).

पात्रता – ८ वी उत्तीर्ण. स्टायपेंड – दरमहा रु. ६,०००/- पहिल्या वर्षी, रु. ६,६००/- दुसऱ्या वर्षी.

(२२) फोर्जर ॲण्ड हीट ट्रीटर – १ पद (खुला).

पात्रता – प्रेशर (१० वी उत्तीर्ण). स्टायपेंड – दरमहा रु. ६,०००/- पहिल्या वर्षी, रु. ६,६००/- दुसऱ्या वर्षी.

वयोमर्यादा – १४ ते २१ वर्षे. (उमेदवाराचा जन्म जून २०१० नंतरचा असावा.) शारीरिक मापदंड चाचणी (PST) – उंची – १५० सें.मी., वजन – किमान ४५ कि.ग्रॅ. छाती – किमान ५ सें.मी. फुगविता येणे आवश्यक. दृष्टी – (चष्म्यासह) ६/६ ते ६/९.

निवड पद्धती – शॉर्ट लिस्टेड उमेदवारांची दोन तास कालावधीची (ओएमआर आधारित) लेखी परीक्षा मुंबई येथे मे २०२४ मध्ये आयोजित केली जाईल. ज्यात १०० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न (जनरल सायन्स – ३५ , जनरल अवेअरनेस – ३० आणि गणित (न्यूमरिकल ॲप्टिट्यूड) – ३५ या विषयांवर आधारित) विचारले जातील. परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

परीक्षा केंद्र – मुंबई असेल. परीक्षेची तारीख, वेळ उमेदवारांना त्यांच्या रजिस्टर्ड ई-मेल द्वारे कळविण्यात येईल. लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्राथमिक गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांना इंटरह्यूसाठी बोलाविले जाईल. अंतिम निवड यादी लेखी परीक्षा आणि इंटरह्यूमधील एकत्रित गुणवत्तेनुसार बनविली जाईल. जी https:// dasapprenticembi. recttindia. in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

मेडिकल एक्झामिनेशन – गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये वैद्याकीय तपासणी घेतली जाईल. ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंगची सुरूवात जुलै २०२४ मध्ये केली जाईल. ऑनलाइन अर्जासोबत पांढऱ्या बॅकग्राऊंडवरील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो (३.५ बाय ४.५ cm. upto २०० kb JPEG/ JPG format) व इतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून ( A४ size in pdf format – file size upto २०० kb) अपलोड करणे आवश्यक.

ऑनलाइन अर्ज https:// dasapprenticembi. recttindia. in या संकेतस्थळावर दि. ५ एप्रिल २०२४ (२३.५० वाजे) पर्यंत करावेत.

शंकासमाधानासाठी ई-मेल – navaldockmumbais @gmail. com, हेल्पडेस्क नंबर – ०३३-२४१४००४७.