सुहास पाटील

नॅशनल टेस्टींग एजन्सी (NTA) (डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अंतर्गत एक स्वायत्त संस्था) देशभरातील ३३ आणि १९ नव्याने मान्यताप्राप्त झालेल्या सैनिक स्कूल्समधील इयत्ता ६ वी आणि ९ वीमधील सन २०२४-२५ साठी प्रवेश देण्याकरिता ऑल इंडिया सैनिक स्कूल्स एन्ट्रन्स एक्झामिनेशन (AISSEE) २०२४दि. २१ जानेवारी २०२४ रोजी घेणार आहे.

सैनिक स्कूल्स सोसायटी (SSS) (संरक्षण मंत्रालयांतर्गत एक स्वायत्ता संस्था) इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळा चालविते. या शाळा CBSE बोर्डाशी संलग्न आहेत. या सैनिक शाळांमधून नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी (NDA) खडकवासला, पुणे; इंडियन नेव्हल अॅकॅडमी (INA), इझिमाला, केरळ व इतर ट्रेनिंग अॅकॅडमीत ऑफिसर्स म्हणून भरती होण्याकरिता कॅडेट्सना तयार केले जाते. NDA मध्ये प्रत्येक परीक्षेतून निवडले जाणारे २५ टक्के कॅडेट्स या सैनिक शाळांतील असतात. नवीन मान्यताप्राप्त सैनिकी (NSS) शाळांमध्ये फक्त इ. ६ वीकरिता प्रवेश उपलब्ध असतील.

हेही वाचा >>> UPSC-MPSC : लघुउद्योगांची विकसित व अविकसित राष्ट्रांमधील भूमिका काय? त्याचे अर्थव्यवस्थेमधील महत्त्व कोणते?

महाराष्ट्र राज्यातील सैनिक शाळा :

(१) सैनिक स्कूल, सातारा २०२४-२५ करिता रिक्त जागा – ६ वीसाठी मुलगे – ९०, मुली – १०. ९ वीसाठी – १२ जागा. (महाराष्ट्रासाठी अजा – २, अज – १, इमाव – ३, सैनिक – २, खुला – ४) वेबसाईट : https://www.sainiksatara.org/

(२) सैनिक स्कूल, चंद्रपूर २०२४-२५ करिता रिक्त जागा – ६ वीसाठी – मुलगे – ९५ व मुली – १०. ९ वीसाठी – २९ जागा. (महाराष्ट्रासाठी अजा – ४, अज – ३, इमाव – ८, सैनिक – ३, खुला – ११) वेबसाईट : https://sainikschoolchandrapur.com/

(३) पद्माश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सैनिक स्कूल, गोगलगाव रोड, लोणी खुर्द, रहाटा, अहमदनगर (नवीन शाळा) ६ वीसाठी रिक्त जागा – ५०. वेबसाईट : https:// pravara. in

(४) एस.के. इंटरनॅशनल स्कूल, रेथारे धरण, वालवा, सांगली, (नवीन शाळा) ६ वीकरिता रिक्त जागा – १२०.(मुले – १००, मुली – २०) वेबसाईट : https:// skis. org. in

परीक्षा केंद्रे : अहमदनगर, बीड, जळगाव, कोल्हापूर, लातूर, सांगली, मुंबई, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, नागपूर आणि नांदेड.

कर्नाटक राज्यातील सैनिक शाळा :

सैनिक स्कूल, बिजापूर ६ वीकरिता १२० जागा (१०८ मुलगे १२ मुली) ९ वीसाठी एकूण २६ जागा आणि सैनिक स्कूल, कोंडागु. (६ वी करिता ९० जागा (८० मुलगे १० मुली) ९ वीकरिता ४० जागा (मुली ० जागा))

सांगोली रायण्णा सैनिक स्कूल, सांगोली भिल्होंगला, बेलगावी (नवीन) ६ वी करिता प्रवेश – एकूण १२० जागा (मुलगे – ८०, मुली – ४०).

विवेक स्कूल ऑफ एक्सलन्स, हांचिपूर रोड, सारूगुर तालुक, मैसूर (नवीन) – ६ वीकरिता – ७५ जागा (मुलगे – ५०, मुली – २५). वेबसाईट : https:// vivekaexcel. edu. in

गुजरात राज्यातील सैनिक शाळा :

सैनिक स्कूल, बालाचाडी. (६ वीकरिता १०० जागा (मुलगे ९० मुली १०)) (९ वीकरिता १४ जागा)

श्री ब्रह्मानंद विद्यामंदिर, छापरादा, विसावदर, जुनागड (नवीन शाळा) ६ वीकरिता – ३०० जागा (मुलगे – १८०, मुली – १२०).

श्री मोतीलाल चौधरी सागर सैनिक स्कूल, दुधसागर डेअरी कँपस, हायवे रोड, मेहसाना (नवीन) ६ वीकरिता – १२० जागा (मुलगे – १०८, मुली – १२).

बनास सैनिक स्कूल, बनास डेअरी कँपस, पालनपूर, बनासकांडा ६ वीकरिता – ८० जागा (मुलगे – ७०, मुली – १०).

आंध्र प्रदेश राज्यातील सैनिक शाळा :

सैनिक शाळा, कोरूकोंडा (६ वीकरिता ७८ जागा (मुलगे ६८ मुली १०) ९ वीकरिता २२ जागा) आणि

सैनिक शाळा, कालिकिरी. (६ वीकरिता ७० जागा (मुलगे ६० मुली १०) ९ वीकरिता १० जागा).

अदानी वर्ल्ड स्कूल, कृष्णपय्यम, मुथुकूरमंडल, रढरफ नेल्लोरे (नवीन) ६ वीकरिता – ८० जागा.

मध्य प्रदेश राज्यातील सैनिक शाळा :

सैनिक स्कूल, रेवा. (६ वीकरिता ६४ जागा (मुलगे ५४ मुली १०), ९ वीकरिता ० जागा).

सरस्वती विद्यामंदिर हायर सेकंडरी स्कूल, संजीत मार्ग, मांदसौर (नवीन) ६ वीकरिता – १०० जागा (मुलगे – ९५, मुली – ५).

रिक्त जागांमध्ये बदल होऊ शकतो. शून्य जागा असलेल्या स्कूल्समध्ये प्रवेशाच्या वेळेपर्यंत जागा उपलब्ध होऊ शकतात.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता इ. ६ वीतील प्रवेशासाठी पात्रता : दि. ३१ मार्च २०२४ रोजी उमेदवाराचे वय १० ते १२ वर्षांदरम्यान असावे. (उमेदवाराचा जन्म दि. १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१४ दरम्यानचा असावा.) सर्व सैनिक स्कूल्समध्ये ६ वी इयत्तेतील प्रवेश मुलींसाठी खुला आहे.

इ. ९ वीतील प्रवेशासाठी पात्रता : दि. ३१ मार्च २०२४ रोजी उमेदवाराचे वय १३ ते १५ वर्षे दरम्यानचे असावे. (उमेदवाराचा जन्म दि. १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०११ दरम्यानचा असावा) आणि त्याने इयत्ता ८ वीची परीक्षा प्रवेश घेतेवेळी उत्तीर्ण केलेली असावी. इ. ९ वीचा प्रवेश मुलींसाठी खुला आहे (जागा उपलब्ध असल्यास).

कॅटेगरीनुसार जागांचे आरक्षण : संबंधित सैनिक शाळेतील उपलब्ध जागांपैकी ६७ टक्के जागा त्या शाळा ज्या राज्यांत आहेत तेथील उमेदवारांसाठी (होम स्टेट) करिता राखीव आहेत. उपलब्ध जागांपैकी ३३ टक्के जागा इतर राज्यांतील उमेदवारांमधून भरल्या जातात. ६७ टक्के जागांपैकी १५ टक्के जागा अजासाठी, ७.५ टक्के जागा अजसाठी व २७ टक्के जागा इमावसाठी राखीव असतात. उरलेल्या जागांच्या २५ टक्के जागा डिफेन्समधील स्टाफच्या मुलांकरिता राखीव असतात. प्रत्येक कॅटेगरीमधून १ जागा मुलींसाठी राखीव असेल. एकूण जागांच्या १० टक्के जागा किंवा १० जे अधिक असेल तेवढ्या जागा प्रत्येक शाळेत मुलींसाठी राखीव असतील.

निवड पद्धती : AISSEE-2024 परीक्षा पेपर पेन्सिल मोड डटफ उत्तर पत्रिका. दोन्ही इयत्तांमधील प्रवेशासाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील. ज्यात चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. परीक्षेनंतर ६ आठवड्यांनी https:// exams.nta.ac.in/ AISSEE/ या संकेतस्थळावर निकाल जाहीर केला जाईल.

इयत्ता ६ वीसाठी परीक्षेचे माध्यम : मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तेलगू इ. (माहितीपत्रकात दिलेल्या एकूण १३ भाषांपैकी एक) गणित – ५० प्रश्न, प्रत्येकी ३ गुण, एकूण १५० गुण. इंटेलिजन्स, लँग्वेज, जनरल नॉलेज या तीन विषयांवर आधारित प्रत्येकी २५ प्रश्न, प्रत्येकी २ गुणांसाठी प्रत्येकी एकूण ५० गुण. ४ विषयांचे मिळून एकूण १२५ प्रश्न आणि एकूण ३०० गुण, वेळ १५० मिनिटे. परीक्षेचा दिनांक २१ जानेवारी २०२४ दुपारी २.०० ते ४.३० वाजेपर्यंत. ६ वीतील प्रवेशासाठीच्या परीक्षेकरिता उमेदवारांना विभागीय भाषा निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. विभागीय भाषेचा पर्याय दिला असल्यास उमेदवारांना प्रश्नपत्रिका त्या विभागीय भाषेत आणि इंग्रजी भाषेत दिल्या जातील.

इयत्ता ९ वीसाठी परीक्षेचे माध्यम : इंग्रजी असेल. गणित – ५० प्रश्न. प्रत्येकी ४ गुण, एकूण २०० गुण, इंटेलिजन्स, इंग्लिश, जनरल सायन्स व सोशल सायन्स या ४ विषयांवर आधारित प्रत्येकी २५ प्रश्न, प्रत्येकी २ गुणांसाठी प्रत्येकी एकूण ५० गुण. सर्व मिळून एकूण १५० प्रश्न, एकूण ४०० गुण, वेळ १८० मिनिटे. परीक्षेचा दिनांक २१ जानेवारी २०२४ दुपारी २.०० ते ५.०० वाजेपर्यंत.

पात्रतेसाठी प्रत्येक विषयात किमान २५ टक्के गुण व सर्व विषय मिळून सरासरी किमान ४० टक्के गुण मिळविणे आवश्यक.

परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम जाहिरातीतील अपेंडिक्स- II व III मध्ये उपलब्ध आहे. परीक्षेसंबंधी माहितीत काही बदल असल्यास https:// exams. nca. ac. in/ AISSEE/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल.

इतर मागासवर्गीय उमेदवारांनी OBC (NCL) दाखल्याचा नमुना (Appendix- VII) संकेतस्थळावरील जाहिरातीत दिलेला आहे, त्या नमुन्यातील असावा. शिवाय इमावच्या उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्याप्रमाणे डिक्लेरेशन/ अंडरटेकिंग द्यावयाचे आहे. (Appendix VIII) इमावच्या उमेदवारांनी आपण OBC मध्ये मोडत असल्याचे www.ncbc.nic.in या संकेतस्थळावर तपासून घ्यावे.

अजा/ अजच्या उमेदवारांनी आपला जातीचा दाखला जाहिरातीमधील अपेंडिक्स- X प्रमाणे आहे. याची खात्री करून घ्यावी.

उमेदवारांनी ठरावीक शाळेसाठी आपल्या कॅटेगरीनुसार अॅडमिशनसाठी रजिस्ट्रेशन करावे. लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्रवेश दिले जातील. ठळअ शाळानिहाय, कॅटेगरीनुसार मुला/मुलींची इ. ६ वी व ९ वी साठी गुणवत्ता यादी वेबसाईटवर प्रसिद्ध करेल.

शैक्षणिक शुल्क – अंदाजे दरवर्षी रु. १,२०,०००/- ते रु. १,३०,०००/- दरम्यानचे शैक्षणिक शुल्क भरावे लागतील.

अर्जाचे शुल्क : अजा/अज उमेदवारांसाठी रु. ५००/-, इतर उमेदवारांसाठी रु. ६५०/-.

अॅडमिट कार्ड NTA च्या https://exams.nta.ac.in/AISSEE या संकेतस्थळावर परीक्षेच्या २१ दिवस अगोदर उपलब्ध करून दिले जातील.

उमेदवारांना आपल्या OMR उत्तरपत्रिकेची स्कॅन्ड प्रत https://exams.nta.ac.in/AISSEE/ या संकेतस्थळामार्फत ऑनलाइन फी रु. १००/- भरून मागता येईल. उमेदवारांनी याच वेबसाईटवर आपली OMR शिट पाहता व डाऊनलोड करता येईल.

हेल्पडेस्क क्र. ०११-४०७५९०००/ ६९२२७७०० या क्रमांकांवर सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत. शंकासमाधानासाठी फोन करू शकतात.

NTA च्या aissee@nta.ac.in या ई-मेलवर २४×७ विचारू शकतात.

विस्तृत माहिती https://exams.nta. ac. in/AISSEE/ आणि http://www.nta.ac.in या संकेतस्थळांवर Information Bulletin मध्ये उपलब्ध आहे.

ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी कोणतेही एक सैनिक स्कूल निवडणे आवश्यक. ई-काऊन्सिलींगच्यावेळी उमेदवारांना नवीन सैनिक स्कून निवडता येईल.

AISSEE-2024 परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज https:// exams.nta.ac. in/AISSEE/ या संकेतस्थळावर दि. १६ डिसेंबर २०२३ (२३.५० वाजे) पर्यंत करू शकतात. (read information bulletin; Online registration; Fill the Online Application; upload required scanned documents) यासाठी देशभरातील उमेदवार कॉमन सर्व्हिसेस सेंटर्स (CSC) (यादी www.csc.gov.in वर उपलब्ध आहे.) ची मदत घेऊ शकतात. ऑनलाइन अर्जात काही बदल/सुधारणा दि. १८ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२३ पर्यंत करता येतील.