महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील (ज्या जातींना कोणत्याही शासकीय विभाग, संस्था, महामंडळे यांचे योजनेचा लाभ मिळत नाही अशा) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या, अमृतलक्षित गटातील युवक-युवतींसाठी पूर्ण वेळ, निवासी/ अनिवासी, निशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रवेश. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत, पुणे (महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) व एमएसएमई टेक्नॉलॉजी सेंटर, इंडो जर्मन टूल रुम (IGTR), औरंगाबाद (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्याम मंत्रालयांतर्गत भारत सरकारची संस्था) यांचेद्वारे पुढील कोर्सेससाठी एकूण प्रवेश – ७५०.

(I) १० वी उत्तीर्ण पात्रता असलेले सर्टिफिकेट कोर्सेस (NSQF लेव्हल-४, ३.५, ३) –

Pink e-rickshaw, Nashik, women Pink e-rickshaw nashik,
नाशिक : जिल्ह्यातील ७०० महिला गुलाबी इ रिक्षाच्या लाभार्थी
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Non-Creamy Layer, income proof OBC, OBC,
ओबीसींसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द, शासन निर्णय काय सांगतो?
Loksatta sarva karyeshu sarvada Review of 11 organizations working for society
सर्वकार्येषु सर्वदा : भटक्या जमातींना रस्ता शोधून देण्यासाठी धडपड
Contract recruitment continues through service provider company in government various departments
कंत्राटी भरतीचा पुन्हा धडाका, तीन वर्षे नियमित भरतीची शक्यता धूसर
Important observations in the hearing letter of the National Green Tribunal regarding development works by blocking drains
नाले बंदिस्त करून विकासकामे करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना चपराक; राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाच्या सुनावणी पत्रात महत्वाची निरीक्षणे
confusion regarding CBSE Pattern
‘सीबीएसई पॅटर्न’बाबत संभ्रमाची स्थिती
sant gadgebaba sevabhavi sanstha ambajogai
सर्वकार्येषु सर्वदा: विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘आधार माणुसकीचा’!

(१) CNC टर्निंग मिलिंग – औरंगाबाद येथे २५ जागा (कालावधी १२ महिने).

(२) ज्युनियर टेक्निशियन टूल अँड डायमेकर (कंडेन्स्ड कोर्स इन टूल अँड डायमेकींग) – कालावधी – १२ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५.

(३) असिस्टंट ऑपरेटर CNC टर्निंग – टूल रुम (सर्टिफिकेट कोर्स इन CNC टर्निंग) – कालावधी – ६ महिने, प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५, नागपूर – २५.

(४) असिस्टंट ऑपरेटर CNC मिलिंग – टूल रुम (सर्टिफिकेट कोर्स इन CNC मिलिंग) – कालावधी – ६ महिने. प्रवेश क्षमता – औरंगाबाद – २५, वाळुज – २५.

(II) आयटीआय उत्तीर्ण (टर्नर/ फिटर/ मशिनिस्ट/ ग्राईंडर/ टूल अँड डाय मेकर) पात्रता असलेले कोर्सेस (NSQF लेव्हल-५)

(५) अॅडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन CNC मशिनिंग – औरंगाबाद २५ (कालावधी १२ महिने).

(६) सर्टिफिकेट कोर्स इन मशिन मेंटेनन्स – औरंगाबाद २५, नागपूर – २५, वाळुज – २५ (कालावधी ६ महिने).

(III) आयटीआय उत्तीर्ण (फिटर/ इलेक्ट्रिशियन/ MMTM/ MMTR/ इलेक्ट्रिकल/ वायरमन) पात्रता असलेले कोर्सेस (NSQF लेव्हल-५)

(७) अॅडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन मशिन मेंटेनन्स – औरंगाबाद – २५ (कालावधी – १२ महिने).

(IV) डिग्री/ डिप्लोमा (मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग) पात्रता असलेले कोर्सेस (NSQF Level ६) –

(८) पोस्ट डिप्लोमा इन टूल डिझाईन अँड CAD/ CAM – औरंगाबाद – २६, कोल्हापूर – २५, नागपूर – २५, पुणे – २५ (कालावधी १२ महिने).

(९) पोस्ट डिप्लोमा इन टूल अँड डाय मॅन्युफॅक्चरिंग – औरंगाबाद – २५ (कालावधी १२ महिने).

(१०) ज्युनियर डिझायनर CAD/ CAM (मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन CAD/ CAM) – औरंगाबाद – २५, नागपूर – २५, पुणे – २५, कोल्हापूर – २५, वाळुंज – २५ (कालावधी ६ महिने).

(११) मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन CNC टेक्नॉलॉजी – औरंगाबाद – २५, वाळुज – २५ (कालावधी – ६ महिने).

(V) डिग्री/ डिप्लोमा (मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनीअरिंग) पात्रता असलेले कोर्सेस –

(१२) पोस्ट डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स – औरंगाबाद – २५ (कालावधी १२ महिने) (NSQF Level ४.५).

(VI) डिग्री (मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनीअरिंग) पात्रता असलेले कोर्स –

(१३) सिनियर टेक्निकल मेकॅट्रॉनिक्स (मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन मेकॅट्रॉनिक्स) – औरंगाबाद – २५ जागा (कालावधी ६ महिने) (NSQF Level ४.५).

(१४) सिनियर टेक्निशियन मेंटेनन्स अँड ऑटोमेशन (अॅडव्हान्स डिप्लोमा इन मशिन मेंटेनन्स अँड ऑटोमेशन) – औरंगाबाद – २५ (कालावधी ६ महिने) (NSQF Level ४.५).

(VII) डिग्री/डिप्लोमा] सिव्हील इंजिनीअरिंग पात्रता असलेले कोर्स –

(१५) फ्रंटलाईन ज्युनियर सुपरवायझर – कन्स्ट्रक्शन (अॅडव्हान्स डिप्लोमा इन स्ट्रक्चरल डिझाईन अँड अॅनालिसिस) – प्रवेश क्षमता – १०० (औरंगाबाद – २५, कोल्हापूर – २५, नागपूर – २५) (कालावधी ६ महिने) (NSQF Level ४.५).

अ.क्र. १०, ११, १३ व १४ वरील कोर्सेससाठी संबंधित डिग्री/ डिप्लोमाच्या अंतिम परीक्षेस बसलेले उमेदवारसुद्धा पात्र आहेत.

वरील सर्व कौशल्य विकास प्रशिक्षण हे निशुल्क असून ते आयजीटीआर, औरंगाबाद या राष्ट्रीय पातळीवरील भारत सरकारच्या संस्थेद्वारे औरंगाबाद व या संस्थेच्या पुणे, नागपूर, कोल्हापूर व वाळुज उपकेंद्रात देण्यात येईल.

सदर प्रशिक्षण हे निवासी/अनिवासी (non- residential) असून निवासी प्रशिक्षणा दरम्यान राहणे व जेवण्याची व्यवस्था अमृत पुणे मार्फत करण्यात येईल.

वयाची अट : १८ ते ४० वर्षे.

निवड पद्धती : प्राप्त अर्जांमधून निकषांच्या आधारे अर्जाची छाननी करून निवडक उमेदवारांना पात्रता प्रवेश परीक्षा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल. पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

उमेदवारांनी ज्या प्रशिक्षण केंद्राची निवड केली आहे. त्याच प्रशिक्षण केंद्रावर त्यांची पात्रता प्रवेश परीक्षा, मुलाखत व कागदपत्र पडताळणी दि. १२ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात येईल. पात्रता प्रवेश परीक्षा इंग्रजी, गणित व सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित राहील.

प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी अमृतच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. http:// www. igtr- aur. org

प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर उमेदवारांस प्रशिक्षणास गैरहजर राहता येणार नाही अथवा प्रशिक्षण मध्येच सोडून जाता येणार नाही.

ज्या उमेदवाराकडे जातीचे प्रमाणपत्र नसेल अशा उमेदवारांची जात ही शाळा/ महाविद्यालय सोडल्याच्या दाखल्यावरून (T.C./ L.C.) ग्राह्य धरण्यात येईल.

अर्जासोबत जोडावयाची/ अपलोड करावयाची कागदपत्रे : (१) विहीत नमुन्यातील व फोटोसहीत पूर्ण भरलेला अर्ज, (२) विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र, (३) प्रशिक्षणानुसार आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्र (१० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा, डिग्री इ.), (४) खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील जातीचा असल्याबाबत पुरावा पुठ्यार्थ शाळा सोडल्याचा दाखला किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा कोणताही शासकीय दस्तऐवज ज्यावर जातीचा सुस्पष्ट उल्लेख असेल, (५) जन्म दाखला, (६) महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र, (७) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबत चालू वर्षाचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा EWS प्रमाणपत्र, (८) आधारकार्ड, (९) स्वतचा फोटो, (१०) स्वतची सही, (११) मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट.

Academy of Maharashtra Research, Upliftment and Training (AMRUT), Maharaja Sayajirao Gaikwad Udyog Bhavan, Aundh, Pune – 411067.

Website – www. mahaamrut. org. in

E- mail : amrut.gom@gmail.com

Contact – 9730151450

प्रशिक्षण ठिकाण : (१) IGTR औरंगाबाद संस्थेचा पत्ता – MSME Technology Center, Indo German Tool Room, Aurangabad.

P- 31, MIDC, Chikhalthan Industrial Area, Aurangabad – ४३१ ००६. Phone No. ०२४० – २६१०१०० Ext. ४११, ४३०, ४३१, ४३२, Mobile No. ९३७३१६१२५२, ९३७३७६१२५३

(२) पुणे उपकेंद्र – IGTR Extension Centres – IGTR – MSME DI CAD/ CAM Training Centre, Pune- I, Near PMT Workshop, Sakarshet Road, Swargate, Pune – ४११ ०३७, Phone No. ००९१-०२० २४४४०८६१, Mobile No. ९३७३०५०१०१.

(३) नागपूर उपकेंद्र – Indo German Tool Room, Aurangabad, Extension Centre, Nagpur P-१४२, MIDC Hingna, Nagpur – ४४० ०२८, Phone No. ०७१०४ – २९७१३६, Mobile No. ९०७५०९५५५२.

(४) कोल्हापूर उपकेंद्र – Advanced Technology Centre, IGTR, Aurangabad Extension Centre, Kolhapur, Shivaji University, Vidya Nagar, Kolhapur – ४१६ ००४. Mobile No. ९४२३८०१३७०, ८८०६६१५९२५.

(५) वाळुज उपकेंद्र – IGTR Aurangabad Extension Centre (Waluj), Plot No. P-१७९, MIDC Industrial Area, Waluj – 431136. Aurangabad. Mobile No. 9373161256, 9881718393.

ज्या उमेदवारांना आयजीटीआर, औरंगाबाद, पुणे, नागपूर, कोल्हापूर व वाळुज यापैकी जिथे प्रशिक्षण घ्यायचे आहे, त्यांनी त्याच सेंटरच्या खाली दिलेल्या QR Code किंवा संस्थेच्या http:// www. igtr- aur. org या संकेतस्थळावर दि. ७ सप्टेंबर २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत. प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख १७ सप्टेंबर २०२४.