Success Story: सध्‍याच्या ज्ञानाच्या युगात लोकांना कमाईसाठी शारीरिक श्रम करणे गरजेचं वाटत नाही. प्रत्येक जण आपल्या पात्रतेनुसार आणि मानसिक क्षमतेवर पैसा कमवतात. पण, यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो हे बहुधा अनेक जण विसरून जातात. कारण केवळ कठोर परिश्रम, खूप मेहनत, जिद्द, चिकाटी तुमच्या स्वप्नांचे वास्तवात रूपांतर करू शकते. तसंच काहीसं सध्या करून दाखवलं आहे जमुई येथील एका तरुणाने; ज्यानी सुरुवातीपासून मेहनत करून ९७३ कोटी रुपयांचा व्यवसाय उभा करून स्वतःचे स्वप्न पूर्ण केलं आहे. चला तर पाहूयात या व्यावसायिकाची यशोगाथा.

रवी रंजन कुमार असं त्यांचे नाव आहे. बिहारमधील जमुई जिल्ह्यातील रहिवासी रवी रंजन कुमार यांचे वडील शेतकरी आहेत. तर त्यांची आई गावात अंगणवाडी केंद्र चालवते.जमुई गावात त्यांनी स्वतःचे शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते दिल्लीला गेले. शिक्षण पूर्ण करून मार्केटिंग शिकण्यासाठी शिष्यवृत्तीवर (स्कॉलरशिप) न्यूयॉर्कला गेले. न्यू यॉर्कमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना नोकरी मिळू न शकल्याने विविध क्षेत्रात नोकऱ्या कराव्या लागल्या. रवी रंजन कुमार यांनी अमेरिकेच्या ऑपरेशन एंड्युरिंग फ्रीडममध्येही भाग घेतला. त्याअंतर्गत त्यांना अफगाणिस्तानात पाठवण्यात आले. त्यानंतर त्यांनी २००९ मध्ये त्यांनी राजीनामा दिला.

astrology budha gochar 2024 mercury transit in leo these zodiac sign will be shine an happy
बुधाचा सिंह राशीत प्रवेश; २९ जुलैपासून ‘या’ तीन राशींची श्रीमंती वाढणार! व्यवसायात नफा तर नोकरीत प्रमोशनची शक्यता
Pooja Khedkar Audi
Pooja Khedkar : प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची ऑडी कार जप्त, कागदपत्र सादर करण्याचे निर्देश; ‘एवढ्या’ रुपयांचा दंडही ठोठावला!
The team of the film amhi Jarange garajvant marathyacha Ladha at the office of Loksatta
आरक्षणामागच्या समाजभावनेची गोष्ट; ‘आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा’ चित्रपटाची टीम ‘लोकसत्ता’ कार्यालयात
Rajni Bector business woman
घरी आइस्क्रीम बनवून थाटला तब्बल सहा कोटींचा व्यवसाय! कोण आहेत रजनी बेक्टर, पाहा…
Thane Police, Thane Police Rescue Three Thai Women into Prostitution, Thai Women Forced into Prostitution, Thane Police Arrest Brokers of Prostitution , protistution racket, thane police arrest Document Forgers,
थायलंडच्या तीन तरुणींची सुटका, वेश्या व्यवसायप्रकरणी ठाणे पोलिसांची कारवाई
Chandubhai Virani story of the founder of Balaji Wafer to build a small shed in the courtyard and begin making chips from his one room
Success Story: एकेकाळी चिकटवली पोस्टर्स, एका खोलीतून व्यवसायाला सुरुवात; पाहा ‘बालाजी वेफर्स’च्या निर्मात्यांचा प्रेरणादायी प्रवास…
aamir khan mahatma Gandhi
आमिर खान म्हणतोय, “गांधी विचारांचा माझ्यावर प्रभाव”; सेवाग्राम आश्रमाला भेट
Sanjeev Bikhchandani owner of Info Edge company start his business left well paying job using second hand computer must read success story
Success Story: नातेवाईक, मित्रांचे टोमणे पण पत्नीची साथ; पाहा इतरांना जोडीदार, नोकरी शोधण्यात मदत करणाऱ्या ‘त्यांचा’ प्रेरणादायी प्रवास

हेही वाचा…CCI Recruitment 2024: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू; कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या

त्यानंतर २०१३ मध्ये रवी रंजन कुमार यांनी ट्रेडिंगला सुरुवात केली. त्यांनी स्वतःचा व्यापार सुरू केला, तेव्हा त्यांच्या जीवनाला अनपेक्षित आनंददायी वळण मिळाले आणि तेव्हापासून त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. अवघ्या १० वर्षांत त्यांनी ९७३ कोटी रुपयांचा व्यवसाय उभा केला. गेल्या वर्षी रवी कुमार यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात अचूक ट्रेडर्सपैकी एक म्हणून नोंदवले गेले. रवी रंजन कुमार यांनी ५६ हून अधिक देशांमध्ये प्रवास केला आहे आणि ते तरुणांसाठी प्रेरणास्रोत बनले आहेत. तर असा आहे रवी रंजन कुमार यांचा प्रेरणादायी प्रवास…