Success Story: सध्‍याच्या ज्ञानाच्या युगात लोकांना कमाईसाठी शारीरिक श्रम करणे गरजेचं वाटत नाही. प्रत्येक जण आपल्या पात्रतेनुसार आणि मानसिक क्षमतेवर पैसा कमवतात. पण, यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो हे बहुधा अनेक जण विसरून जातात. कारण केवळ कठोर परिश्रम, खूप मेहनत, जिद्द, चिकाटी तुमच्या स्वप्नांचे वास्तवात रूपांतर करू शकते. तसंच काहीसं सध्या करून दाखवलं आहे जमुई येथील एका तरुणाने; ज्यानी सुरुवातीपासून मेहनत करून ९७३ कोटी रुपयांचा व्यवसाय उभा करून स्वतःचे स्वप्न पूर्ण केलं आहे. चला तर पाहूयात या व्यावसायिकाची यशोगाथा.

रवी रंजन कुमार असं त्यांचे नाव आहे. बिहारमधील जमुई जिल्ह्यातील रहिवासी रवी रंजन कुमार यांचे वडील शेतकरी आहेत. तर त्यांची आई गावात अंगणवाडी केंद्र चालवते.जमुई गावात त्यांनी स्वतःचे शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते दिल्लीला गेले. शिक्षण पूर्ण करून मार्केटिंग शिकण्यासाठी शिष्यवृत्तीवर (स्कॉलरशिप) न्यूयॉर्कला गेले. न्यू यॉर्कमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना नोकरी मिळू न शकल्याने विविध क्षेत्रात नोकऱ्या कराव्या लागल्या. रवी रंजन कुमार यांनी अमेरिकेच्या ऑपरेशन एंड्युरिंग फ्रीडममध्येही भाग घेतला. त्याअंतर्गत त्यांना अफगाणिस्तानात पाठवण्यात आले. त्यानंतर त्यांनी २००९ मध्ये त्यांनी राजीनामा दिला.

हेही वाचा…CCI Recruitment 2024: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू; कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या

त्यानंतर २०१३ मध्ये रवी रंजन कुमार यांनी ट्रेडिंगला सुरुवात केली. त्यांनी स्वतःचा व्यापार सुरू केला, तेव्हा त्यांच्या जीवनाला अनपेक्षित आनंददायी वळण मिळाले आणि तेव्हापासून त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. अवघ्या १० वर्षांत त्यांनी ९७३ कोटी रुपयांचा व्यवसाय उभा केला. गेल्या वर्षी रवी कुमार यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात अचूक ट्रेडर्सपैकी एक म्हणून नोंदवले गेले. रवी रंजन कुमार यांनी ५६ हून अधिक देशांमध्ये प्रवास केला आहे आणि ते तरुणांसाठी प्रेरणास्रोत बनले आहेत. तर असा आहे रवी रंजन कुमार यांचा प्रेरणादायी प्रवास…