FCI Recruitment 2023: भारतीय अन्न महामंडळातर्फ भरतीची घोषणा करण्यात आली आहे. जाहीर केलेल्या सूचनापत्रकानुसार, या संस्थेमध्ये ४६ रिक्त पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या संबंधित सविस्तर माहिती fci.gov.in या महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. नोकरी करण्याची इच्छा असणारे उमेदवार ३ एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. ही भरती प्रतिनियुक्तीवर आधारित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फूड कॉरपोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एफसीआयद्वारे होणाऱ्या या भरतीमध्ये एकूण ४६ जागा रिक्त आहेत. यातील असिस्टंट जनरल मॅनेजर पदासाठी (AE) २६ जागा आणि असिस्टंट जनरल मॅनेजर पदासाठी (EM) २० जागा उपलब्ध आहेत. भरती होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना या संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.

असिस्टंट जनरल मॅनेजर (AE) होण्यासाठीची पात्रता –
या जागांसाठी अर्ज करायचे असल्यास उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी असणे आवश्यक आहे. E-3 किंवा L-11 च्या ग्रेडमध्ये संबंधित पद धारण करण्याचा किंवा असिस्टंट इंजिनिअर म्हणून काम करण्याचा कमीत कमी ५ वर्षांचा अनुभव असावा.

असिस्टंट जनरल मॅनेजर (EM) होण्यासाठीची पात्रता –
या जागांसाठी अर्ज करायचे असल्यास उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल किंवा मॅकेनिकल इंजिनीअरिंगची पदवी असणे आवश्यक आहे. E-3 किंवा L-11 च्या ग्रेडमध्ये संबंधित पद धारण करण्याचा किंवा असिस्टंट इंजिनिअर म्हणून काम करण्याचा कमीत कमी ५ वर्षांचा अनुभव असावा.

आणखी वाचा – १० वी पास आणि ITI उमेदवारांना CRPF मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ९२१२ कॉन्स्टेबल पदांसाठी मेगाभरती, आजच अर्ज करा

या संस्थेद्वारे सुरु असलेल्या भरतीच्या प्रक्रियेसाठी अर्ज केल्यानंतर निवड प्रक्रियेला सुरुवात होईल. लेखी परीक्षा आणि मुलाखत यांच्यामार्फत उमेदवारांची निवड करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, जयपूर, लखनऊ, अमरावती, भोपाल, पटना, भुवनेश्वर अशा देशातील विविध शहरांमध्ये नियुक्ती करण्यात येईल. त्यांना ६० हजारांपासून ते १.८० लाख रुपयांपर्यंतचे वेतन देण्यात येईल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fci recruitment 2023 apply for 46 posts 3 april 2023 last date to apply yps
First published on: 17-03-2023 at 17:57 IST