प्रविण निकम
आपण शिष्यवृत्त्यांची माहिती घेत असताना सर्वसाधारण शाखेतील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांसाठी काही पदव्युत्तर शिष्यवृत्त्या आहेत का असा प्रश्न नक्कीच असू शकतो. याच प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी या लेखात प्रयत्न करणार आहे. युनायटेड किंगडममधील तीन प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये पदव्युत्तर शिक्षण सुरू ठेवण्यासाठी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पात्र विद्यार्थ्यांना फेलिक्स शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ, लंडनचे रडअर विद्यापीठ आणि University of Reading यांचा समावेश आहे. तथापि, हे केवळ भारतासारख्या विकसनशील देशांना लागू ही शिष्यवृत्ती आहे. फेलिक्स शिष्यवृत्ती, या शिष्यवृत्तीच्या पात्रता, निकष आणि अर्ज प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेऊ या.

शिष्यवृत्तीचे पात्रता निकष :

१. विद्यार्थ्यांनी त्यासाठी पात्र होण्यासाठी प्रथम श्रेणी पदवी असणे आवश्यक आहे.

२. अर्जदार भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे.

३. तिने/ त्याने वर नमूद केलेल्या कोणत्याही विद्यापीठातून पूर्णवेळ पोस्ट-ग्रॅज्युएशन प्रोग्राम निवडलेला असावा.

४. उमेदवारांनी भारतातील कोणत्याही प्रतिष्ठित विद्यापीठातून त्यांच्या अंडर ग्रॅज्युएशनमध्ये प्रथम श्रेणी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, अर्जदारांना भारतात परतणे आवश्यक आहे.

५. तथापि, ज्या उमेदवारांनी मास्टर्समध्ये प्रवेश घेतला आहे त्यांचा शिष्यवृत्तीसाठी विचार केला जाणार नाही. या व्यतिरिक्त, उमेदवारांनी भारताबाहेर एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ अभ्यास केलेला नसावा.

६. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहे.

शिवाय, उमेदवारांनी इंग्रजी प्रवीणता परीक्षा पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्यामध्ये कएछळर अंतर्गत एकूण ६.५ बँड मिळवणे आवश्यक आहे.

फेलिक्स शिष्यवृत्ती योजनेंतर्गत, दरवर्षी २० शिष्यवृत्ती दिल्या जातात. या शिष्यवृत्तीचे विविध फायदे विद्यार्थ्यांना मिळतात त्यातील विद्यापीठानुसार असणाऱ्या स्टायपेंडविषयी सांगायचे तर यामध्ये शिक्षण आणि निवास शुल्क समाविष्ट असते. विद्यापीठानुसार शैक्षणिक व निवासी खर्चाविषयी सांगायचे झाल्यास –

१. ऑक्सफर्ड विद्यापीठाचा राहण्याचा खर्च : USD १७,५००/- ट्यूशन फी : USD ३७,२००/- ते ४२,१००

२. SOAS युनिव्हर्सिटी ऑफ लंडन राहण्याचा खर्च: USD १७,५००; ट्यूशन फी : USD २५,९०० ते २९,४००

३. युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग राहण्याचा खर्च : USD १८,०००; ट्यूशन फी : USD २०,६०० ते २९,४००

फेलिक्स स्कॉलरशिप ट्रस्टने आतापर्यंत ४२८ शिष्यवृत्ती दिल्या आहेत. यापैकी ४० शिष्यवृत्ती भारताव्यतिरिक्त इतर देशांतील विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. निवड प्रक्रियेबाबत बोलायचे झाले तर सर्व उमेदवारांचे त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आणि आर्थिक गरजेनुसार त्यांचे मूल्यांकन केले जाते. ज्याद्वारे निवडलेल्यांनी मुलाखतीला येण्यापूर्वी प्रथम प्रश्नावली भरणे आवश्यक आहे. या प्रश्नावलीत उमेदवाराच्या आर्थिक गरजा, शैक्षणिक उत्कृष्टता आणि व्यक्तिमत्त्वाचे मूल्यांकन केले जाते.

अर्जाची प्रक्रिया काय आहे?

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना अंतिम मुदतीबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. वर नमूद केलेल्या तीन विद्यापीठांची अर्ज प्रक्रिया वेगवेगळी आहे. ती पुढीलप्रमाणे –

स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज (SOAS)

या विद्यापीठात उमेदवारांनी रडअर येथे संशोधन किंवा मास्टर प्रोग्रामसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. तथापि, त्यांना त्यांचे स्वीकृती पत्र त्या विद्यार्थ्याला प्राप्त झाले असावे, त्यानंतर ते अर्ज भरू शकतात.

University of Reading

या विद्यापीठात अर्ज करताना उमेदवारांनी प्रथम पदव्युत्तर कार्यक्रमातून प्रवेश पत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. त्याला किंवा तिला ते मिळाल्यानंतर, तीच उमेदवार व्यक्ती हा शिष्यवृत्ती फॉर्म भरू शकतो/ शकते.

ऑक्सफर्ड विद्यापीठ

या विद्यापीठात अर्जदारांना वेगळा अर्ज सादर करण्याची गरज नाही. त्याऐवजी, त्यांना फक्त ऑक्सफर्ड पदव्युत्तर अर्जाचा फॉर्म भरणे आवश्यक आहे. त्यानंतर, ऑक्सफर्ड विद्यापीठ अधिकारी ‘फेलिक्स स्कॉलरशिप ऑक्सफर्ड फॉर्म’ विभागांमध्ये विद्यार्थ्यांचा अर्ज भरतात.

नॉन-इंडिया शिष्यवृत्ती

ऑक्सफर्ड विद्यापीठ भारताबाहेरील विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती देते. दरवर्षी, इतर कमी-उत्पन्न असलेल्या देशांचा किंवा सर्वात कमी विकसित देशांचा रहिवासी या शिष्यवृत्तीसाठी पात्र मानला जातो.

अर्थात ही शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी उमेदवारांनी काही कागदपत्रांची पूर्तता करणे देखील आवश्यक आहे. ज्यात

१. Statement of Purpose (शिष्यवृत्ती उद्देश)

२. A valid passport (वैध पासपोर्ट)

३. Contact details of two academic references. (दोन शैक्षणिक संदर्भांचे संपर्क तपशील) यांचा समावेश आहे.

लेखमालेच्या मागच्या अनेक लेखांमधून अभियांत्रिकी क्षेत्र, कला क्षेत्र, वैद्याकीय क्षेत्र अशा विविध क्षेत्रासाठी असणाऱ्या शिष्यवृत्तीबाबत जाणून घेतले, त्याच वेळी विचार आला की सर्वसाधारण पदवी प्राप्त करणाऱ्या अनेक युवक-युवतींना परदेशी शिक्षण घेण्यासाठी सहाय्य करणाऱ्या शिष्यवृत्तीबद्दल नक्कीच माहिती देणे आवश्यक आहे, या फेलिक्स शिष्यवृत्तीच्या निमित्ताने अनेकांना उपयुक्त ठरणारी माहिती देऊ शकलो आहे असे वाटते.