डॉ. भूषण केळकर/डॉ. मधुरा केळकर
आम्हाला तर असं वाटते की आजकालचा जमाना हा जसा डंझो, स्विगी आणि तत्सम ‘फास्ट अँड फ्यूरिअस’ झालाय, तसंच मुलांना करिअर पण तसंच नुसतं ‘फास्ट’ नकोय तर ते ब्लिंक इट सारखं ‘फ्यूरिअस’ हवंय !

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण मागच्या लेखात वर्णन केलेले ‘फ्युचर-प्रूफ’ करिअर करायचे असेल तर काही कौशल्ये ही कॉलेजमध्ये असतानाच मिळवावी लागतील, आणि ती प्रक्रिया Blinkit नसते हे आपल्याला जेवढे लवकर कळेल तेवढे उत्तम!

आमच्या एक मित्राने परवा एक किस्सा सांगितला. त्याच्या ऑफिसमधला सहकारी, नवीन नवीन इंजिनीअर बनलेला आणि नुकताच कंपनीमध्ये जॉइन झालेला. अत्यंत उत्साही. त्याच्या विषयात अतिशय प्रवीण. पण एक दिवस येऊन आमच्या मित्राला म्हणाला, अरे मला जरा मदत करशील का. ऑफिशियल ईमेल कधी लिहिलीच नाही. बोलताना काय आपली बोलीभाषा वापरली जाते. त्यामुळे लिहिताना फॉर्मल शब्द सुचतच नाहीत.

हेही वाचा: कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात : डेटा सायन्टिस्ट कसं व्हायचं?

आता हा एक वरवर छोटा दिसत असला तरी महत्त्वाचा विषय आहे. अशी कोणती महत्त्वाची कौशल्ये आहेत जी डिग्री करत असतानाच आत्मसात केली पाहिजेत याबद्दल या लेखात बोलू. याचे आम्ही २ विभाग करतो. स्वत:च्या व्यक्तिमत्व विकासासाठी असलेली, आणि व्यवसायासाठी आवश्यक असलेली.

दोन्ही विभागांसाठी शिकण्याच्या क्षमतेसाठी सर्वांनी करण्यासारखा एक सुंदर, अल्पावधीचा आणि फ्री कोर्स ऑनलाइन उपलब्ध आहे, तो म्हणजे ‘लर्निंग हाऊ टु लर्न’. सध्या कंपन्या उमेदवारांमध्ये उत्तम आणि सतत शिकण्याची क्षमता आणि तयारी याला खूप महत्व देतात. एक वेळ, डिग्री कोर्सचा सीजीपीए ‘तोडफोड’ नसला तरी चालेल, पण शिकण्याची क्षमता हवीच असते.

व्यक्तिमत्व विकासासाठी पहिलं कौशल्य म्हणजे संभाषण कौशल्य. भाषेचा आत्मविश्वास असला तरी आपले म्हणणे नीट मांडता येणे, ते समोरच्याला कळणे आणि समोरच्या व्यक्तीचा योग्य रिस्पॉन्स मिळणे, हे जमतेच असे नाही. त्यासाठी कॉलेजमध्ये असतानाच जेव्हा सार्वजनिक मंच उपलब्ध असेल, उदाहरणार्थ टोस्ट मास्टर्स सारखे क्लबस्, त्यामध्ये सहभाग घ्या, वादविवाद, लेखन स्पर्धा, गटचर्चा, यात भाग घ्या, संभाषण कौशल्य ही फक्त भाषेचा योग्य वापर एवढ्या वरच अवलंबून नसते, तर समोरच्याची देहबोली, चेहऱ्यावरचे भाव, पेहेराव आणि इतर लकबी हे ही समजून घ्यावे लागते. स्वत: संभाषणात प्रत्यक्ष भाग घेऊनच हे सर्व जास्त चांगले समजेल. तसेच लेखी संवादासाठी Grammarly, OWL सारखी टूल्स वापरता येतील.

हेही वाचा: नवउद्यमींची नवलाई: चालकविरहित ‘ऑटोनेक्स्ट’

दुसरे महत्त्वाचे कौशल्य- अनॅलिसिस व प्रॉब्लेम सॉलविंग, म्हणजेच विश्लेषण व समस्या निराकरण. यासाठी बुद्धिबळ, कोडी किंवा सिम्युलेशन गेम्स उपयुक्त ठरू शकतात. कॉलेजमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये सामील व्हा. केस स्टडी, गट चर्चा आणि समस्या सोडवण्याच्या कार्यशाळांमध्ये भाग घ्या.

तिसरे महत्त्वाचे कौशल्य म्हणजे लवचिकता. यासाठी आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन आव्हाने स्वीकारणे आवश्यक असते. कॉलेजमधील वेगवेगळे क्लब, प्रकल्प तसेच स्पर्धा यात सहभागी होऊन सर्व प्रकारची कामे करण्याचा घेतलेला अनुभव मौल्यवान ठरतो. स्पर्धेतल्या अपयशांचे विश्लेषण करा आणि शिकलेल्या धड्यांवर लक्ष केंद्रित करा आणि आपले पुढचे ध्येय सुनिश्चित करून वाटचाल सुरू करणे म्हणजेच लवचिकता. यासाठी मनाची एकाग्रता आणि खंबीरपणा जागवावा लागतो, जो सर्वांमध्ये सुप्त अवस्थेत असतोच. त्यासाठी रोज योग, प्राणायाम व ध्यान करणे आवश्यक आहे. हल्ली खूप पालक तक्रार करतात की मुलांची कोविड काळापासून मोबाइल फोन वापरायची सवय, आता व्यसन बनली आहे. मानसशास्त्रातील अनेक प्रयोगांती मिळालेले निष्कर्ष असे दाखवतात की योग प्राणायाम ध्यान यामुळे भरकटलेले मन भानावर येते. व्यक्तीला ध्येय प्राप्तीचा योग्य रस्ता दिसू लागतो व पावले उचलण्याचे बळही मिळते.

आपण व्यक्तिमत्व विकासासाठी असलेली अन्य कौशल्ये पुढील भागात बघूच.

bhooshankelkar@hotmail.com

mkelkar_2008 @yahoo. com

उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा विचार तर सुरू केला पण या साऱ्या शोधाची सुरुवात कुठून करायची? सातत्याने योग्य माहिती गोळा करणे आणि त्यातील विविध पायऱ्यांचे योग्य वेळी नियोजन करणे या प्रक्रियेमध्ये अत्यावश्यक आहे.