गेल (इंडिया) लिमिटेड (GAIL) (भारत सरकारचा एक उपक्रम) तरुण होतकरू इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्सची एग्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांवर GATE-२०२७ स्कोअरवर आधारित भरती. एकूण रिक्त पदे नंतर जाहीर केली जातील. विद्याशाखांनुसार रिक्त पदांचा तपशील – (कंसात संबंधित गेट-२०२७ पेपर कोड दिलेला आहे.)
(१) एग्झिक्युटिव्ह ट्रेनी (केमिकल) (CH) –
पात्रता – केमिकल/ पेट्रोकेमिकल / केमिकल टेक्नॉलॉजी /पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी /केमिकल टेक्नॉलॉजी अँड पॉलिमर सायन्स / केमिकल टेक्नॉलॉजी अँड प्लास्टिक टेक्नॉलॉजीमधील इंजिनीअरिंग पदवी किमान ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/अपंग उमेदवारांनी ६०टक्के गुण आवश्यक.)
(२) एग्झिक्युटिव्ह ट्रेनी (इन्स्ट्रूमेंटेशन) (IN) –
पात्रता – इन्स्ट्रूमेंटेशन/इन्स्ट्रूमेंटेशन अँड कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेंटेशन/इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रूमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स विषयातील इंजिनीअरिंग पदवी किमान ६५टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/अपंग उमेदवारांसाठी ६०टक्के गुण आवश्यक)
(३) एग्झिक्युटिव्ह ट्रेनी (इलेक्ट्रिकल) (EE) –
पात्रता – इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर/ इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनीअरिंग पदवी किमान ६५टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/अपंग उमेदवारांसाठी ६०टक्के गुण आवश्यक)
(४) एग्झिक्युटिव्ह ट्रेनी (मेकॅनिकल) (ME) –
पात्रता – मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ प्रोडक्शन अँड इंडस्ट्रियल /मॅन्युफॅक्चरिंग /मेकॅनिकल अँड ऑटोमोबाईल विषयातील इंजिनीअरिंग पदवी किमान ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/अपंग उमेदवारांसाठी ६०टक्के गुण आवश्यक) काही पदांसाठी अपंग उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
सर्व पदांसाठी इंजिनीअरिंग पदवी परीक्षा २०२६ किंवा त्यानंतर उत्तीर्ण केलेली असावी (२०२६-२७ मध्ये अंतिम वर्षात शिकणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.) आणि उमेदवार संबंधित गेट -२०२७ पेपर कोडसाठी बसलेले असावेत. पदवी परीक्षा २०२५ किंवा तत्पूर्वी उत्तीर्ण करणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.
वयोमर्यादा – (दि. १८ मार्च २०२७ रोजी) २६ वर्षेपर्यंत. (इमाव – २९ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३१ वर्षेपर्यंत/अपंग ३६/३९/४१ वर्षेपर्यंत)
वेतन – १ वर्षाच्या ट्रेनिंग कम प्रोबेशन कालावधीत उमेदवारांना रु. ६०,०००/- – १,८०,०००/- या वेतन श्रेणीमधील मूळ वेतन रु. ६०,०००/- दिले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना E२ ग्रेड – वेतन श्रेणी रु. ६०,०००/- – १,८०,०००/- मध्ये इतर भत्ते यावर सामावून घेतले जाईल.
निवड पद्धती – गेट -२०२७ च्या स्कोअरनुसार उमेदवारांना शॉर्ट लिस्ट करून ग्रुप डिस्कशन आणि/किंवा पर्सोनेल इंटरव्ह्यूसाठी बोलाविले जाईल. (https://gailonline.com या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध केली जाईल.)
अपंग कॅटेगरी बी, डी, ई च्या उमेदवारांना ग्रुप डिस्कशनऐवजी केस स्टडी/लेखी परीक्षा द्यावी लागेल. इच्छुक उमेदवारांनी गेट वेबसाईटवर विलंब शुल्काशिवाय दि. २७ सप्टेंबर २०२६ पर्यंत किंवा विलंब शुल्कासह दि. ५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.
गेट २०२७ बद्दल विस्तृत माहिती https://gate२०२७.iitm.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गेट -२०२७ अर्जासोबत जोडलेल्या पासपोर्ट साईज फोटोसारखा फोटो ऑनलाइन अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक. अजा/अज /इमाव / ईडब्ल्यूएस् /अपंग उमेदवारांसाठी https://careers.gail.co.in या संकेतस्थळावरील नमुन्यामधील प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
ऑनलाइन अर्ज https://gailonline.com या संकेतस्थळावर (Careers सेक्शनमधून) दि. १७ फेब्रुवारी २०२७ (११.०० वाजे)पासून ते दि. १८ मार्च २०२७ (१८.०० वाजे)पर्यंत करावेत. (गेट -२०२७ रजिस्ट्रेशन नंबर लिहिणे अनिवार्य) ऑनलाइन अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर सिस्टीमवर युनिक रजिस्ट्रेशन नंबर जनरेट केला जाईल आणि तसा मेसेज सिस्टीमवर दाखविला जाईल व तसा ऑटो जनरेटेड ई-मेल उमेदवारांना पाठविला जाईल. FAQ मध्ये समाविष्ट न केलेल्या शंका समाधानासाठी career@gail.co.in या ई-मेल आयडीवर संपर्क करा.
