GAIL Recruitment 2023: गेल गॅस लिमिटेडने इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/प्रॉडक्शन/ प्रॉडक्शनआणि इंडस्ट्रिअल मॅन्युफॅक्चरिंग/यांत्रिक आणि ऑटोमोबाईलमधील वरिष्ठ आणि कनिष्ठ सहयोगी पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना संबंधित विषयात पूर्ण वेळ दोन वर्षांची एमबीए/बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. तुम्ही १० एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी अधिकृत वेबसाइट gailgas.com ला भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकता. गेल भरती २०२३ अंतर्गत एकूण १२० पदे भरली जाणार आहे. या पदांसाठी उमेदवाराला अर्ज करण्यासाठी फक्त ३ दिवस उरले आहेत ज्या उमेदवाराला या पदांवर सरकारी नोकरी मिळवायची आहे, त्यांनी त्यापूर्वी दिलेल्या या सर्व विशेष गोष्टी काळजीपूर्वक वाचाव्यात.
गेल भरती अंतर्गत मिळाणार पगार
या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना वरिष्ठ सहयोगी पदासाठी प्रति महिना रु.६०,००० आणि कनिष्ठ सहयोगीं पदासाठी रु.४०,००० प्रति महिना वेतन मिळेल. यामध्ये वेतन, एचआरए आणि इतर भत्ते यांचा समावेश असेल.
गेलसाठी लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या तारखा
गेल भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख: १० मार्च
गेल भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० एप्रिल
हेही वाचा : NPCIL Recruitment 2023: एक्झिक्युटिव्ह ट्रेनीच्या ३२५ पदांसाठी भरती, GATE पास उमेदवार करू शकतात अर्ज
गेल भरती २०२३द्वारे भरल्या जाणार्या पदांची संख्या
वरिष्ठ सहयोगी (टेक्निकल) – ७२
वरिष्ठ सहयोगी (फायर आणि सेफ्टी)-१२
वरिष्ठ सहयोगी (मार्केटिंग)- ०६
वरिष्ठ सहयोगी (फायनान्स आणि अकाऊंटस्) – ०६
वरिष्ठ सहयोगी (कंपनी सेक्रटरी)-०२
वरिष्ठ सहयोगी (एच आर)-०६
कनिष्ठ सहयोगी (टेक्निकल)-१६
गेल भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
वरिष्ठ सहयोगी (टेक्निकल): गेल गॅस लिमिटेडने इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल / प्रॉडक्शन आणि इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग / मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल / इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / ५० % मार्कसह स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बॅचलर पदवी.
वरिष्ठ सहयोगी (फायर आणि सेफ्टी): किमान ५० % गुणांसह फायर/फायर अँड सेफ्टीमध्ये रेग्युलर इंजिनअरिंग पदवी.
वरिष्ठ सहयोगी (मार्केटिंग): किमान ५०% गुणांसह मार्केटिंग/तेल आणि वायू/पेट्रोलियम आणि ऊर्जा/ऊर्जा आणि पायाभूत सुविधा/आंतरराष्ट्रीय व्यवसायातील स्पेशलायझेशनसह पूर्णवेळ दोन वर्षांची एमबीए पदवी.
येथे सूचना आणि अर्ज लिंक पहा
गेल भरती २०२३ अधिसूचना – https://gailgaspdfdownloads.s3.ap-south-.amazonaws.com/DetailedAdvtor+FTE+GAIL+Gas+Ltd+01-03-2023-Final.pdf
गेल भरती२०२३ साठी लिंकवर क्लिक करा – https://gailgas.com/careers/careers-in
गेल भरतीसाठी अर्ज शुल्क
सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी (एनसीएल) श्रेणीच्या उम्मीदवारांचे अर्ज शुल्क-100 रुपये
अनुसूचित जाति / अनुसूचित जनजाति / पीडब्ल्यूबीडी श्रेणीच्या उम्मीदवारांसाठी अर्ज शुल्क- शून्य