PCMC Fire Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरी करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महापालिकेतर्फे “फायरमन रेस्क्यूअर”पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरती मोहिमेअंतर्गत १५० पदांची भरती होणार आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड हे आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज २६ एप्रिल २०२४ पासून सुरू होतील. ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख १७ मे २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

PCMC Fire Recruitment 2024 : वयोमर्यादा

फायर रेस्क्यूर पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवाराची मर्यादा ३० वर्ष आहे.

RTE, Mumbai, RTE Admission, reserved seats,
मुंबई : आरटीईनुसार आरक्षित जागांसाठी २३ जुलैपासून विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू, ४ हजार ७३५ विद्यार्थ्यांची निवड
mpsc, mpsc news, mpsc latest news,
आता सरळसेवा भरती ‘एमपीएससी’मार्फत होणार, शासन निर्णयात काय आहेत तरतुदी बघा
ladki bahin yojana, ladki bahin yojana maharashtra,
लाडकी बहीण योजनेसाठी पनवेल पालिकेचे तीन फिरते मदत कक्ष
pimpri chichvad
पिंपरी: पोलीस आयुक्तालयासाठी मिळाली जागा; ‘या’ ठिकाणी होणार आयुक्तालय
14 villages, Navi Mumbai Municipal Area,
अखेर १४ गावे नवी मुंबई महापालिका क्षेत्रात, कार्यकारी अभियंत्यांकडे कामकाजाची जबाबदारी
Counseling Schedule Soon Ministry of Health Disclosure for NeetUG
समुपदेशनाचे वेळापत्रक लवकरच; ‘नीटयूजी’साठी आरोग्य मंत्रालयाचा खुलासा
free power scheme forever for farmers assurance from dcm ajit pawar
शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना कायमचीच; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
Nagpur, schedule, metro,
नागपूर : वेळापत्रकात बदल करताच मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ

PCMC Fire Recruitment 2024 : अर्ज शुल्क

मागार प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल तर खुल्या प्रर्वगातील १००० रुपये परिक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे. शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जाईल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरण्याची अंतिम मुदत २१७ मे २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे. परिक्षेच्या ०७ दिवस आधी ऑनलाई परिक्षेसाठी प्रवेशपत्र अधिकृत वेबसाईट https://www.pcmcindia.gov.in/ वर उपलब्ध होईल .

PCMC Fire Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

फायरमन रेस्क्यूर पदासाठी अर्ज करण्यासाठी माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठयक्रम उत्तीर्ण असावा. तसेच एम.एस.सी. आय.टी. परिक्षा उत्तीर्ण असावा आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे शारीरिक पात्रता असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अधिसूचना काळजीपूर्वक वाचा

हेही वाचा – बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती! ९० हजारपर्यंत मिळू शकतो पगार

PCMC Fire Recruitment 2024 : वेतनश्रेणी (Salary)

फायरमन रेस्क्यूर पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराल एस-६ नुसार १९,९००-६३,२००पर्यंत पगार मिळू शकतो.

अर्ज करण्याची थेट लिंक – https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32281/88458/Index.html

अधिकृत सुचना -https://cdn.digialm.com//per/g01/pub/726/EForms/image/ImageDocUpload/12/1112493758468076391602.pdf

हेही वाचा – India Post Jobs 2024: इंडिया पोस्टमध्ये निघाली भरती! ६३ हजारपर्यंत मिळेल पगार, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

PCMC Fire Recruitment 2024 : ऑनलाईन अर्ज सादर करण्याची पध्दत

  • ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची सुविधा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या http://www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.
  • उमेदवाराने आपला वैध ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक Online अर्जामध्ये नोंदविणे आवश्यक आहे तसेच सदर ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्जासह ऑनलाईन पध्दतीने भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत उमेदवारास परत केले जाणार नाही. ऑनलाईन अर्ज भरताना बँकेचे इतर शुल्क उमेदवाराला स्वतः भरावे लागतील.
  • ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याकरीता “New User Registration” यावर क्लिक करुन नाव, संपर्काची माहिती, भ्रमणध्वनी व ई- मेल आयडी नमूद करुन “Submit” बटन दाबावे त्यानंतर उमेदवाराच्या भ्रमणध्वनी व ई-मेल आयडी वर OTP येईल सदर OTP टाकल्यानंतर Log-in Id व Password, email id द्वारे प्राप्त होईल तद्रंतर सदर Log-in Id व Password वापरून उमेदवाराला अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू करता येईल.
  • ऑनलाईन अर्ज भरून झाल्यानंतर Save करावा. त्यानंतर Print वर क्लिक करुन संपूर्ण अर्ज तपासून पहावा, जर अर्जामध्ये काही सुधारणा करावयाची असेल तर Edit करून माहितीमध्ये आवश्यक सुधारणा करावी.
  • आवश्यकतेनुसार ऑनलाईन अर्जातील माहितीमध्ये सुधारणा करुन, तसेच छायाचित्र व स्वाक्षरी योग्य रितीने अपलोड झाल्याची व इतर माहिती अचूक असल्याची खात्री करुन “Submit & Pay” बटनवर क्लिक करून परीक्षा शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरावे.
  • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरताना योग्य ती काळजी घ्यावी. उमेदवाराने सदर अर्जात स्वतःबाबतची माहिती अचूक रितीने भरावी. तसेच विहित आकारातील स्वतःचे छायाचित्र व स्वाक्षरी योग्य त्या ठिकाणी अपलोड करावी. आपण भरलेली माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर, छायाचित्र व स्वाक्षरी योग्य त्या ठिकाणी अपलोड केल्यानंतर व आवश्यक ते शुल्क योग्य पध्दतीने भरल्यानंतर अर्ज स्वीकृत होईल. एकदा शुल्क भरणा केल्यानंतर भरलेल्या माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार