Success Story of Aradhya Tripathi: जर तुमच्यात काहीतरी करण्याची जिद्द असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी जो तो आपापल्या परीनं अथक मेहनत करत असतो. स्वप्नपूर्तीसाठी रात्रंदिवस एक करावा लागतो, असं म्हणतात. पण आपल्या मेहनतीचं फळ एकेदिवशी आपल्याला नक्कीच मिळतं.

भारतात अभियांत्रिकी हा एक मजबूत करिअरचा मार्ग मानला जातो. बरेच विद्यार्थी मोठे पॅकेज मिळण्याच्या आशेने या क्षेत्रात येतात. काही लोकांना असे वाटते की आयआयटी किंवा एनआयटी सारख्या मोठ्या विद्यापीठातून शिक्षण घेणारेच मोठ्या कंपनीत जाऊ शकतात. पण उत्तर प्रदेशातील गोठवा गावातील आराध्या त्रिपाठीने या विचारसरणीच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळे केले. तिने तिचे शिक्षण पूर्ण केले आणि गुगलमध्ये चांगल्या पॅकेजसह नोकरी मिळवली. चला तर मग आराध्या त्रिपाठीची यशोगाथा जाणून घेऊया जी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल.

कुठून घेतले शिक्षण?

आराध्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, आराध्याने तिचे शालेय शिक्षण सेंट जोसेफ स्कूलमधून केले आणि नंतर गोरखपूर येथील मदन मोहन मालवीय तंत्रज्ञान विद्यापीठ (MMMUT) येथून संगणक विज्ञानात बी.टेक केले. तिला लहानपणापासूनच तंत्रज्ञानात खूप रस होता.

गुगलकडून मिळाली इतक्या लाखांची ऑफर (Google Job Opportunity)

सुरुवातीला आराध्याला स्केलर कंपनीकडून ३२ लाखांची ऑफर मिळाली होती, पण तिने ती नाकारली. नंतर गुगलने तिला ५६ लाखांचे वार्षिक पॅकेज देऊ केले आणि तिने ते स्वीकारले.

अशाप्रकारे मिळाली गुगलमध्ये नोकरी

आराध्याने तिचे कोडिंग कौशल्य बळकट करण्यासाठी १,००० हून अधिक प्रोग्रामिंग प्रश्न सोडवले आहेत. तिला ReactJS, NextJS, NodeJS, MongoDB, ExpressJS सारख्या तंत्रज्ञानात उत्तम अनुभव मिळाला आहे. तसेच, तिला स्केलेबल प्रोडक्ट्स आणि लाईव्ह प्रॉडक्शन हाताळण्याचा चांगला अनुभव आहे. आराध्याचे वडील व्यवसायाने वकील आहेत आणि तिची आई गृहिणी आहे. कुटुंबाकडून मिळालेला पाठिंबा आणि तिच्या स्वतःच्या कठोर परिश्रमामुळे ती या पदावर पोहोचली.



This quiz is AI-generated and for edutainment purposes only.