BSF Recruitment 2023: सीमा सुरक्षा दलामध्ये नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लष्कराच्या या विभागामध्ये लवकरत भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. बीएसएफद्वारे या संबंधित सूचना पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रकामध्ये हेड कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीविषयीची सविस्तर माहिती सीमा सुरक्षा दलाच्या rectt.bsf.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

सीमा सुरक्षा दलात २४७ हेड कॉन्स्टेबल पदांसाठी होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. एकूण २४७ पैकी २१७ रेडिओ ऑपरेटर आणि ३० रेडिओ मॅकेनिक या जागांसाठी योग्य उमेदवारांची बीएसएफच्या अधिकाऱ्यांद्वारे निवड केली जाणार आहे. उमेदवार २२ एप्रिल २०२३ पासून भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मे २०२३ आहे. हे अर्ज बीएसएफच्या वेबसाइटमधून मिळवता येतील.

Central Bureau of Investigation Bharti various vacant posts of Consultants job location is Mumbai
CBI Bharti 2024 : सल्लागार पदासाठी सीबीआयमध्ये पदभरती; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख
NLC Recruitment Notification Apply Online for Industrial Worker Clerical Assistant and Junior Engineer Vacancies
NLC Recruitment 2024: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! विविध पदांसाठी भरती सुरु; अर्ज करण्यासाठी फक्त चार दिवस शिल्लक
UPSC
UPSC Recruitment 2024 : वैद्यकीय अधिकारीसह विविध पदांसाठी होणार भरती! जाणून घ्या पात्रता निकष
TCS Recruitment 2024
TCSमध्ये होणार पदवीधर उमेदवारांची भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख अन् प्रक्रिया

शिक्षणाची अट

  • बीएसएफमधील या जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार किमान ६० टक्के मिळवून बारावीची परीक्षा पास झालेला असावा.
  • बारावीमध्ये त्याचे विषय Physics, Chemistry आणि Mathematics असणे आवश्यक आहे.
  • या व्यतिरिक्त दोन वर्षांचा आयटीआयचा कोर्स करणारी व्यक्ती देखील या पदांसाठी अर्ज करु शकते.

आणखी वाचा – चौथी पास उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयात काम करण्याची सुवर्णसंधी! फक्त ‘एवढं’ काम जमायला हवं

वयाची अट

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे १८ ते २५ असणे गरजेचे आहे. आरक्षित गटातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात येईल.

(टीप – बीएसएफच्या भरतीशी निगडीत अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी या विभागाची वेबसाइट सतत चेक करत राहावी.)