● भारत सरकार, डिपार्टमेंट ऑफ अॅटॉमिक एनर्जी (DAE), भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर (BARC) ट्रेनिंग स्कूल्स इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स आणि सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट्स यांना ‘सायंटिफिक ऑफिसर (ग्रुप-ए)’ पदांच्या भरतीसाठी OCES-२०२६ आणि DGFS-२०२६ हे दोन शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करणार आहे.
( I) OCES-२०२६ – ‘ट्रेनी सायंटिफिक ऑफिसर’ (TSO) १ वर्षाच्या ओरिएंटेशन कोर्स फॉर इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स अँड सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट्सना ( OCES-२०२६) (सन २०२६-२७) दि. ३१ जुलै २०२६ पासून सुरू होणाऱ्या प्रशिक्षणाकरिता पुढील BARC ट्रेनिंग स्कूल्समध्ये प्रवेश दिला जातो. BARC, मुंबई; अॅटॉमिक मिनरल्स डायरेक्टोरेट फॉर एक्स्पलोरेशन अँड रिसर्च (AMD), हैद्राबाद.
पात्रता – (अ) इंजिनीअरिंग विद्याशाखा – पुढील ८ पैकी एका विद्याशाखेतून इंजिनीअरिंगमधील पदवी ( B. E./ B. Tech.) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (१) मेकॅनिकल ( ME २१), (२) केमिकल ( CH २२), (३) मेटॅलर्जीकल ( MT २३), (४) इलेक्ट्रिकल ( EE २४), (५) इलेक्ट्रॉनिक्स ( EC २५), (६) कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग( CS २६), (७) इन्स्ट्रूमेंटेशन ( IN २७), (८) सिव्हील इंजिनीअरिंग (CE २८).
इंजिनीअरिंग डिसिप्लिन्स (कोड २१-२८) करिता B. E./ B. Tech.
(ब) सायन्स विद्याशाखा – संबंधित विद्याशाखेतून (एम.एस्सी.) पदव्युत्तर पदवी किमान सरासरी ६०टक्के गुणांसह उत्तीर्ण. बी.एस्सी. लासुद्धा किमान सरासरी ६०टक्के गुण आवश्यक. तसेच १२ वी मॅथेमॅटिक्स विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. (१) फिजिक्स ( PH ४१), (२) केमिस्ट्री ( CY ४२), (३) बायोसायन्सेस ( BS ४३), (४) जीऑलॉजी/अॅप्लाईड जीऑलॉजी/जीओकेमिस्ट्री ( GG ४५), जीओफिजिक्स ( GG ४६).
केमिस्ट्री डिसिप्लिन (कोड नं. ४२) करिता M. Sc. (इंडस्ट्रियल केमिस्ट्री, टेक्स्टाईल केमिस्ट्री, अॅप्लाईड केमिस्ट्री, एन्व्हिरॉन्मेंटल केमिस्ट्री, पेट्रोलियम केमिस्ट्री, नॅनोसायन्स, नॅनोटेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री इ.) उमेदवार पात्र नाहीत.
बायोसायन्सेस डिसिप्लिन (कोड नं ४३) करिता M. Sc. (फिशरिज, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, अॅग्रोनॉमी, अॅनिमल हजबंडरी, मरिन बायोलॉजी, बायो-अॅनालायटिकल सायन्सेस, होम सायन्स इ.) तसेच B. E./ B. Tech. (बायोटेक्नॉलॉजी, जनेटिक्स इंजिनीअरिंगबायो-मेडिकल इंजिनीअरिंगफूड प्रोसेस इंजिनीअरिंगतसेच B. Sc. (बायोटेक्नॉलॉजी), M. Tech. ( Food Science Technology) इ.) उमेदवार पात्र नाहीत.
GATE स्कोअर आधारित निवडीसाठी ऑप्शन दिलेल्या उमेदवारांकडे GATE-२०२४/ GATE-२०२५ चा संबंधित विषयातील व्हॅलिड स्कोअर असणे आवश्यक किंवा GATE-२०२६ परीक्षा देणारे असावेत. एम. एससी. (बाय रिसर्च) किंवा पीएच.डी. उमेदवार पात्र नाहीत.
ट्रेनी सायंटिफिक ऑफिसर (TSO) ट्रेनिंग पूर्ण करताना प्रत्येक विषयात किमान ३५टक्के गुण व सरासरी किमान ५०टक्के गुण मिळवतील अशा उमेदवारांनी ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे जाहिर केले जाईल. यशस्वी TSO- s ना ‘सायंटिफिक ऑफिसर ग्रेड-सी’ पदावर पुढीलपैकी एका DAE युनिटमध्ये तैनात केले जाईल. (१) BARC, मुंबई; (२) IGCAR, कल्पक्कम; (३) RRCAT, इंदूर; (४) VECC, कोलकाता; (५) HWB, मुंबई; (६) NFC, हैद्राबाद; (७) BRIT, मुंबई; (८) NPCIL, मुंबई; (९) BHAVINI, कल्पक्कम; (१०) AMD, हैद्राबाद; (११) UCIL, जादूगुडा, (१२) DCS EM, मुंबई.
प्रशिक्षणा दरम्यान उमेदवारांना दरमहा रु. ७४,०००/- स्टायपेंड दिले जाईल. शिवाय पुस्तकांसाठी एका वेळेला रु. ३०,०००/- दिले जातील.
वेतन – ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर सायंटिफिक ऑफिसर ग्रेड-सी पदावर रु. १,३४,०००/- दरमहा वेतन दिले जाईल.
पात्रता – इंजिनीअरिंगग्रॅज्युएट्स आणि फिजिक्स पोस्ट ग्रॅज्युएट्स (डिसिप्लिन्स २१ ते २८ आणि ४१) ज्यांनी BARC ट्रेनिंग स्कूल्स प्रोग्रामसाठीच्या सिलेक्शन इंटरव्ह्यूमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि ज्यांनी IIT Bombay किंवा IIT Madras या इन्स्टिट्यूशन्समध्ये स्वत M.Tech./ M.Chem.Engg. पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविलेला आहे.
वयोमर्यादा – (दि. १ ऑगस्ट २०२६) रोजी २६ वर्षे
अर्जाचे शुल्क – खुला गट आणि इमावचे पुरुष उमेदवारांसाठी रु. ५००/-.
निवड पद्धती – सिलेक्शन इंटरव्ह्यूसाठी निवड दोन पद्धतीने केली जाते.
(१) ऑनलाइन सिलेक्शन टेस्ट (OCES) ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ १०० प्रश्न, वेळ १२० मिनिटे, प्रत्येक बरोबर उत्तरासाठी ३ गुण दिले जातील व प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल. (८ इंजिनीअरिंगच्या शाखा (कोड क्र. २१ ते २८) आणि ५ सायन्समधील शाखांमधील प्रवेशासाठी (कोड क्र. ४१ ते ४३, ४५ आणि ४६)). देशभरातील ५२ केंद्रांवर १४ व १५ मार्च, २०२६ मध्ये घेतली जाईल. (कोल्हापूर, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, पुणे इ.) उमेदवाराने किमान ३ परीक्षा केंद्र शहर पसंतीक्रम देणे आवश्यक.
(२) GATE स्कोअर – GATE-२०२४/ GATE-२०२५/ GATE-२०२६ स्कोअरवर आधारित उमेदवार इंटरव्ह्यूसाठी निवडले जातील. GATE-२०२६ चा स्कोअर एप्रिल २०२६ च्या दुसऱ्या आठवड्यात www. barcocesexam.in या वेबसाईटवर अपलोड करावयाचा आहे.
शंकासमाधानासाठी संपर्क साधा ९१११३५४५४६९४ किंवा RAISE COMPLAINT TAB. ई-मेल आयडी webmaster@barcocesexam.in ऑनलाइन अर्ज https://www.barcocesexam.in या संकेतस्थळावर २१ जानेवारी २०२६ पर्यंत भरता येतील.
