FTII Pune Bharti 2023: पुण्यात नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे अंतर्गत मुख्य लेखाधिकारी पदाची एक रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. एम्प्लॉयमेंट न्यूज/रोजगार समाचार मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसांनी अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल. चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे भरती संबंधित अधिकची माहिती जाणून घेऊ या.
चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे
पदाचे नाव – मुख्य लेखाधिकारी
एकूण पदसंख्या – १
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून यासाठी भरतीची मूळ जाहिरात अवश्य पाहा.
नोकरीचे ठिकाण – पुणे
अर्जाची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसांनी.
अधिकृत वेबसाईट – ftii.ac.in
भरती संबंधित अधिकची माहिती पाहण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1QSZ_SRum5O3lTP0yQC5ib0aDuGrDrkWe/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Great job opportunity at ftii pune recruitment for chief accounts officer post is open know how to apply jap